चारचाकीने महिलेसह दुचाकीला उडविले, तीन ठार; चारचाकीतील व्यक्ती ट्रकने झाले पसार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 09:00 PM2023-07-16T21:00:31+5:302023-07-16T21:00:41+5:30

कोंढा येथील घटना : तिन्ही मृतक कोंढा येथील

A four-wheeler hits two-wheeler with a woman, killing three | चारचाकीने महिलेसह दुचाकीला उडविले, तीन ठार; चारचाकीतील व्यक्ती ट्रकने झाले पसार

चारचाकीने महिलेसह दुचाकीला उडविले, तीन ठार; चारचाकीतील व्यक्ती ट्रकने झाले पसार

googlenewsNext

कोंढा/अड्याळ (भंडारा) : शेतातून काम करून परत येणाऱ्या एका ६० वर्षीय महिलेसह दुचाकीस्वार दोन तरूणांना चारचाकी वाहनाने अक्षरश: उडविले. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर तरूणांचा उपचारादरम्यान भंडारा येथील खासगी रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुमित्रा नामदेव बावनकर (६०), दीपक मंगल जुमळे (२४) व रोहित आनंदसिंग यादव (२४) सर्व रा. कोंढा अशी मृतांची नावे आहेत. ही घटना रविवार दुपारी ४ वाजताच्या सुमारास भंडारा - पवनी मार्गावरील कोंढा येथील चर्चसमोर घडली.

माहितीनुसार, कोंढा परिसरात रोवणीचे काम सुरू आहे. शेतातील काम आटोपून सुमित्रा बावनकर या घरी पायी येत होती. तर दीपक मंगल जुमळे व त्याचा मित्र रोहित यादव हे दुचाकी क्र. ३६ बी ४१९ ने कोंढा गावाकडे येत होते. कोंढयाकडून अडयाळकडे जाणाऱ्या चारचाकी वाहन क्र. एम. एच.४० ए. सी. ७१७० गाडीच्या चालकाने भरधाव वेगाने येत पायी चालणाऱ्या महिलेला धडक दिली. त्यानंतर तरूणांचञया दुचाकीला धडक दिली. महिला व मोटार सायकलस्वार असलेले दोन्ही तरुण रस्त्याच्या बाजूला असलेल्या नालीमध्ये पडले. तर चारचाकी गाडी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतात जाऊन वाहन उलटले.

या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला तर तरुण दीपक जुमळे त्याचा मित्र रोहित आनंदसिंग यादव हे गंभीररीत्या जखमी झाले. दोघांनाही भंडारा येथील एका हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. उपचारादरम्यान दिपक जुमळे, रोहित यादव या दोघांचाही मृत्यू झाला. घटनेची तक्रार अड्याळ पोलीस स्टेशन येथे करण्यात आली आहे. घटनास्थळी ठाणेदार प्रशांत मिसाळे तसेच महामार्ग वाहतूक शाखा गडेगाव येथील ८ पोलीस कर्मचाऱ्यांनी भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली.

चारचाकीतील व्यक्ती ट्रकने झाले पसार

महिला व दुचाकीला धडक दिल्यानंतर चारचाकी वाहन शेतात जाऊन उलटले. यात बसलेले एक पुरूष व महिला हे बाहेर आले. तसेच संधी साधून हे टोघेही एका ट्रकमध्ये बसून भंडाराच्या दिशेने पसार झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. याच मार्गावर १३ जुलै रोजी ट्रॅक्टरच्या धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता. ३ दिवसातील ही दुसरी घटना आहे.

Web Title: A four-wheeler hits two-wheeler with a woman, killing three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.