शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

११६ कोटींमधून होणार ८६ गावांचा कायापालट

By admin | Updated: March 4, 2015 00:55 IST

आगामी पाच वर्षात महाराष्ट्र राज्य टंचाईमुक्त करुन सर्वांसाठी पाणी उपलब्ध करण्याबरोबर

जलयुक्त शिवार अभियान : जिल्हाधिकाऱ्यांची माहितीभंडारा : आगामी पाच वर्षात महाराष्ट्र राज्य टंचाईमुक्त करुन सर्वांसाठी पाणी उपलब्ध करण्याबरोबर सिंचन क्षेत्रात वाढ व इतर उद्देश हाती घेण्यात आले आहे. यासाठी जलयुक्त शिवार अभियानातून जिल्हयातील ८६ गावांमधील दुष्काळे परिस्थिती निवारणासाठी ११६ कोटींचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली.जलयुक्त शिवार अभियानातून टंचाईग्रस्त गावांना मुक्त करण्यासाठी हा उपक्रम सुरु केला आहे. या अभियानातून पावसाचे पाणी गावशिवारात अडविणे, भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे, बंद पडलेल्या पाणी पुरवठा योजनेचे पुनर्जीवन करुन विकेंद्रीत पाणी साठे निर्माण करणे, पाणी साठवण क्षमतेची नविन कामे हाती घेणे, वृक्ष लागवडील प्रोत्साहन अशा उद्देशाने हे अभियान राबविले जाणार आहे. त्या अंतर्गत ग्रामपंचायत, वनविभाग, कृषी, पाटबंधारे, जलसंपदा व सामाजिक वणिकरण विभागामार्फत ही कामे केली जाणार आहे.भंडारा तालुक्यातील १५, तुमसर तालुक्यातील १९, मोहाडी १५, पवनी १२, साकोली १०, लाखनी ९ व लाखांदूर तालुक्यातील ६ अश्या ८६ गावांची निवड करण्यात आली आहे. पुढील आर्थिक वर्षात संबंधित विभागाकडून ही कामे करण्यासाठी ११६ कोटी २१ लाख ४४ हजार रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला. त्याअंतर्गत पवनी तालुक्यात ६४९ कामे केली जाणार असून २२ कोटी ४९ लाख २८ हजार रुपयांचा निधी दिला जाणार आहे. भंडारा तालुक्यातील २६५ कामांसाठी १८ कोटी ९९ लाख ६४ हजार तर तुमसर २८४ कामांसाठी १७ कोटी ५६ लाख ७१ हजार, मोहाडी २६२ कामासांठी १५ कोटी ५ लाख ८४ हजार, साकोली ४८९ कामांसाठी १६ कोटी २ लाख ३५ हजार, लाखनी ३१७ कामांसाठी १८ कोटी ७७ लाख ८५ हजारांचा निधी उपलब्ध होणार आहे. लाखांदूर ३३८ कामांसाठी ७ कोटी २० लाख ७७ हजारांची तरतुद करण्यात आली आहे. ११६ कोटी २१ लाख ४४ हजार निधीतून जिल्हयातील ८६ गावात २६०४ कामे हाती घेतली जाईल. अभियानांतर्गत कृषी विभागाला ११२७ कामासांठी २८ कोटी ३९ लाख ३२ हजारांचा तर ग्राम पंचायतस्तरावर ८३३ कामांसाठी ४१ कोटी ३३ लाख ६९ हजारांचा निधी दिला जाईल. ७ कोटी ३३ लाख २१ हजारांच्या निधीतून वन विभागाला ३७८ कामे तर ३२ कोटी ९३ लाख ८४ हजारातून लघू पाटबंधारे विभागाला २२८ कामे करावयाची आहेत. जलसंपदा विभागाला १ कोटी ४८ लाख ५० हजारातून १० कामे व सामाजिक वनिकरण विभागाला १ कोटी ४० लाख २६ हजारातून २० कामे करावयाची आहेत. (शहर प्रतिनिधी)