शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

परसोडीच्या तान्हा पोळ्यात ८२२ नंदीबैलांची हजेरी

By admin | Updated: September 4, 2016 00:33 IST

मागील ३७ वर्षापासून परसोडी येथील हनुमान मंदिरासमोर मखराचा तान्हा तान्हा पोळा उत्साहात पार पडला.

३७ वर्षाची परंपरा कायम : विदेशी पर्यटकाकडून वह्या नोटबुकाचे वितरणजवाहरनगर : मागील ३७ वर्षापासून परसोडी येथील हनुमान मंदिरासमोर मखराचा तान्हा तान्हा पोळा उत्साहात पार पडला. यावेळी महिलांकरिता विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विदेशी पर्यटकाकडून बक्षीस वितरण करण्यात आले.परसोडी येथील घरोघरी बालगोपाल पालकांसोबत नंदी बैल सजावटीत व्यस्त होते. पाडव्याच्या दिवशी पहाटेपासून या परिसरात रिमझिम पाऊस होता. पावसाने विश्रांती दिल्यानंतर बालगोपाल आनंदी झाले. यावेळी हनुमान मंदीर परिसरात ८२२ लाकडी नंदीबैलांनी हजेरी लावली. मंचावरून तान्हा पोळ्याच्या झडती सुरू होत्या. यात दादाराव वंजारी, किसना वंजारी, भाऊराव वंजारी, राजकपूर राऊत, मोतीलाल येळणे यांच्यात झडतीची स्पर्धा लागल्याची प्रचिती येत होती. यावेळी आमदार रामचंद्र अवसरे यांच्या अध्यक्षतेखाली नंदीबैल सजावट स्पर्धाचे निरीक्षण करण्यात आले. नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर, माजी सभापती टेकचंद सावरकर, पोळा पंच कमेटीचे अध्यक्ष मारोतराव हटवार माजी सभापती राजकपूर राऊत, माजी सभापती कल्पना मोटघरे, पंकज सुखदेवे, दर्शन फंदे, होमदेव चकोले, जिजा बावनकुळे, श्यामकला चकोले, कौशल्या हटवार, कुंदा हटवार, प्रमिला हटवार, प्रमिला फंदे, छाया हटवार, विजया वंजारी, पुष्पा बांते, मंजुळा वंजारी उपस्थित होते. पाहुण्याच्या हस्ते वॉटर फिल्टर, गोदरेज आलमारी, सायकल, टेबल फॅन असे २५ पारितोषिक बालगोपालांना देण्यात आले.यात शिवाजी वॉर्ड परसोडी, अनुप अटारकर, नितीन हटवार, अरणव सुरजाडे गडचिरोली, जान्हवी वंजारी, येदिका साखरवाडे, हितांशु मालाधरे, रूबल मोटघरे, सुरेश वंजारी, अरन्य हटवार, साहिल हटवार, साहिल साखरवाडे, श्रावणी हटवार, प्राजल वंजारी, प्रदीप गजभिये, दक्ष कांबळे, टिकेट चकोले, रोहित हटवार, सारंग दादुरवाडे, आर्या फंदे, आकाश वंजारी, टिकेश हटवार, आदेश कांबळे, निलेश हटवार, प्रेम हटवार, साहिल गैर यांचा व उपस्थित सर्व बाल कास्तकारांना पोळा पंच कमेटीतर्फे प्रोत्साहनपर ट्रे भेट म्हणून देण्यात आले. तत्पुर्वी दुपारी आम कुस्त्याचे दंगल आयोजित करण्यात आले होते. नामांकित कुस्तिगीरांना मोठ्या संख्येने हजेरी लावली. सकाळपासून महिला तरूणीनी आकाश झोपाळाचा आस्वाद घेतला. याप्रसंगी महिलाचे विविध स्पर्धा घेण्यात आले. विजयी स्पर्धकांना बक्षीस देण्यात आले. यात चमचा गोळी स्पर्धेत जानवी मोटघरे, स्मृती हटवार, सपना हटवार, समा हटवार, बटाटा रेस स्पर्धेत अर्चना हटवार, मंदा हटवार, भूमिका हटवार, पुष्पा कुंडले, पपीता गजभिये, प्रौढ महिला कबड्डी स्पर्धेत बारू दादुरवाडे, कमला वंजारी, रेणुका साखरवाडे, सत्यभामा शहारे, वच्छला समरीत, तरूण मुलीमध्ये उर्मिला चकोले, मंदा हटवार, अर्चना हटवार, सपना हटवार, गीता हटवार, भूमिका हटवार, शालिनी वंजारी, पाण्याचा घागर दौड स्पर्धेत भारती वंजारी, शालु वंजारी, सुनिता साखरवाडे, दुर्गा निरगुळकर, मंदा हटवार, छाया हटवार, प्रमिला फंदे, पगबाधा दौड स्पर्धेत सुनिता निरगुळकर, माधुरी हटवार, भूमिका हटवार यांचा समावेश होता. प्रास्ताविक मारोतराव हटवार यांनी केले. संचालन मोतीलाल येळणे यांनी तर आभार राजकपूर राऊत यांनी मानले.कार्यक्रमासाठी पोळा पंचकमेटी, ग्रामपंचायत पदाधिकारी सदस्य, तंटामुक्त गाव समिती पदाधिकारी सदस्य, ठणठण पार्टी परसोडी तेली पंचकमेटी यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)