शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसात कोरोनाचे ६६ पॉझिटिव्ह रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 05:01 IST

जिल्हा आरोग्य यंत्रणेकडूनही वाढती रुग्णसंख्या पाहता अधिक जबाबदारी घेतली जात आहे. स्थिती नियंत्रणात असली तरी वाढत्या रुग्णसंख्येने चिंतेत भर घातली आहे. भंडारा शहरातही गत आठवड्याभरात रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर भंडारा शहरात शनिवार व रविवार असे दोन दिवस जनता कर्फ्यू लावण्यात आला होता.

ठळक मुद्देसंख्या पोहोचली ५४२ वर : सर्वाधिक रुग्ण भंडारा तालुक्यात, साकोली व मोहाडीत ५९ तर तुमसरात ६८ व्यक्ती बाधीत

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाने परिस्थिती गंभीर केली आहे. शनिवारी ३६ तर रविवारी ३० रुग्ण बाधीत आढळल्यानंतर जिल्ह्यात एकुण बाधीतांची संख्या ५४२ वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे १३ आॅगस्ट रोजी भंडारा तालुक्यातील एका ६५ वर्षीय महिलेला नागपूर येथे खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. तिचा १४ आॅगस्ट रोजी मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या पाच झाली आहे. संसर्ग बाधीतांची संख्या सातत्याने वाढत असल्याचेही दिसून येत आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधीतांच्या संख्येवर नजर घातल्यास सर्वाधिक रुग्ण भंडारा तालुक्यात दिसून येत आहे. आतापर्यंत भंडारा तालुक्यात १८९, साकोली ६७, लाखांदूर २५, तुमसर ८१, मोहाडी ९२, पवनी ४० तर लाखनी तालुक्यात ४८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. रविवारी आढळलेल्या ३० रुग्णांपैकी भंडारा तालुक्यात १०, साकोली ०२, तुमसर तालुक्यात ०३, मोहाडी तालुक्यात ०८, पवनी तालुक्यात ०४ तर लाखनी तालुक्यात ०३ रुग्ण बाधीत आढळले आहे.
जिल्हा आरोग्य यंत्रणेकडूनही वाढती रुग्णसंख्या पाहता अधिक जबाबदारी घेतली जात आहे. स्थिती नियंत्रणात असली तरी वाढत्या रुग्णसंख्येने चिंतेत भर घातली आहे. भंडारा शहरातही गत आठवड्याभरात रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर भंडारा शहरात शनिवार व रविवार असे दोन दिवस जनता कर्फ्यू लावण्यात आला होता. याला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसादही दिला. जिल्ह्यात आतापर्यंत १ लक्ष १४ हजार २९१ नागरिकांनी आरोग्य सेतु अ‍ॅप डाऊनलोड करुन त्याचा उपयोग केला आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने १०२७८ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुणे तपासणीसाठी नागपूर येथे पाठविले आहे. आजघडीला २०३ व्यक्ती पॉझिटिव्ह असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. आतापर्यंत आयसोलेशन वॉर्डातून ९३५ व्यक्तींना सुटी देण्यात आली आहे. या वॉर्डात आता १८१ व्यक्ती भरती आहेत. जिल्ह्यात अ‍ॅन्टीजेन टेस्ट कीटद्वारे ४०४४ व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये आतापर्यंत १०८ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले आहेत. ३९३६ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

६५ वर्षीय महिलेचा मृत्यू
भंडारा तालुक्यातील रहिवासी असलेल्या एका ६५ वर्षीय महिला रुग्णाला मेंदू आघात झाल्याने १३ आॅगस्टच्या मध्यरात्री नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. सदर वृध्द महिलेचा उपचारादरम्यान १४ आॅगस्टला मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या ०५ झाली आहे. शनिवारी ३६ रुग्ण आढळले असून त्यात भंडारा तालुक्यातील २०, साकोली ०५, मोहाडी तालुक्यातील १० तर लाखनी तालुक्यातील ०१ रुग्णाचा समावेश आहे. रविवारी १४५ जणांचे नमुणे तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आले आहेत. रविवारी २१ जणांना आयसोलेशन वॉर्डातून सुटी देण्यात आली आहे.

३३४ रुग्णांना मिळाली सुटी
२७ एप्रिल रोजी पहिला कोरोनाबाधीत रुग्ण आढळल्यानंतर आजपर्यंत एकुण रुग्ण संख्या ५४२ इतकी झाली आहे. आठवड्याभरापूर्वी ३००च्या घरात असलेल्या या संख्येने आठ दिवसांच्या कालावधीत पाचशेचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत ३३४ व्यक्तींना सुटी देण्यात आली आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या