शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

महिला रूग्णालयासाठी ४३ कोटींचा प्रस्ताव

By admin | Updated: September 22, 2016 00:31 IST

जिल्हा पातळीवरील गाजत असलेला महिला रूग्णालयाच्या बांधकामाच्या संदर्भाने जिल्हा प्रशासनाने एक पाऊल टाकले आहे.

कासवगती कायम : जलशुद्धीकरण केंद्रामागील जागा ‘फिक्स’ इंद्रपाल कटकवार भंडाराजिल्हा पातळीवरील गाजत असलेला महिला रूग्णालयाच्या बांधकामाच्या संदर्भाने जिल्हा प्रशासनाने एक पाऊल टाकले आहे. शंभर खाटांचे महिला रूग्णालय बांधकामासाठी ४३ कोटी ६० लक्ष रूपयांचा खर्च होणार असल्याचा प्राथमिक प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या संदर्भात प्रशासकीय मंजुरीची प्रतीक्षा आहे. निर्णयावर अजुनपर्यंत ठोस निर्णय झालेला नाही. रूग्णालय बांधकाम संबंधी कासवगतीने सुरू असलेल्या या ्रकारभाराने शासन-प्रशासनाची ‘इमेज’ दावणीला टांगली आहे.विशेष म्हणजे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी १६ महिन्यांपूर्वी घोषणा केली होती. यात १५ आॅगस्ट २०१५ रोजी महिला रूग्णालयाच्या कामाचे भूमिपुजन करू अशी घोषणा केली होती. सव्वा वर्षांचा कालावधी लोटुनही साधे भुमिपुजन झालेले नाही. महिला रूग्णालयाचे बांधकाम जलशुध्दीकरण केंद्राच्या मागील बाजूस होणार आहे. महिला रूग्णालय ज्या जागेत बांधण्यात येणार आहे, त्या जागेच्या संदभार्तील सर्व ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्याची माहिती तत्कालीन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी १ मे २०१६ रोजी दिली होती. या जागेची पाहणी पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केली होती. मात्र या जागेच्या सातबाराबात तांत्रिक अडचणी कायम आहेत. महिला रूग्णालयाच्या मुद्यावर आंदोलने झालीत, जिल्हा परिषदेसह विविध ठिकाणी झालेल्या अभेतही रूग्णालयाचा मुद्दा तापला गेला. परंतु याप्रकरणाच्या ‘प्रगती’ची कासवगती आजही कायम आहे, हे येथे उल्लेखनीय.रस्त्यांचेही होणार विस्तारीकरण!कित्येक वर्षांपासून जिल्हा मुख्यालय स्थळी महिला रूग्णालय व्हावे, ही मागणी हळूहळू पूर्ण होण्याच्या प्रशासकीय तयारीच्या अंतिम टप्प्यात आहे. ज्या ठिकाणी सदर रूग्णालय बांधण्यात येणार आहे, त्या जागा परिसरात अतिक्रमणाचीही समस्या आहे. यावरही आरोग्य प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले आहे. आता असलेल्या जिल्हा सामाण्य रूग्णालय ते बसस्थानकाकडे जाणारा रस्ता जलशुद्धीकरण केंद्र व शासकीय अन्नधान्य गोदाम असलेल्या रस्त्याचे विसञतारीकरण करण्याचा मानस आहे. जिल्हा सामान्य रूग्णालय तथा जिल्हा महिला रूग्णालयाची इमारत आमोरासमोर होणार असल्याने याचा फायदा रूग्णांना होईल. मोठा बाजार परिसराला हा भाग लागुन असल्याने भविष्यात येथे रहदारी निश्चितपणे वाढणार आहे, यात तिळमात्र शंका नाही. महिला रूग्णालयासाठी पालकमंत्र्यांनी पाहणी केलेली जागा निश्चित झाली आहे. रूग्णालय बांधकामासाठी ४३ कोटी ६० लक्ष रूपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. प्रशासकीय मंजुरीच्या प्रतीक्षा आहे. रूग्णालयाच्या जागेसंबधी तांत्रिक अडचणी दुर होताच बांधकामाचा मार्ग सुकर होऊ शकेल. .रवी धकाते,जिल्हा शल्य चिकित्सक, भंडारा.