पूरग्रस्तांसाठी ४३ कोटी निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 05:00 AM2020-10-01T05:00:00+5:302020-10-01T05:00:31+5:30

मध्यप्रदेशातील संजय सरोवर प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग केल्याने वैनगंगा, बावनथडी, चुलबंद या नद्यांना असलेल्या महापूराचा फटका जिल्ह्यातील १०४ गावांना फटका बसला. चार जणांचा महापूरात मृत्यू झाला होता. ८२५१ कुटुंबाना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. महापुराचा ३७८ गावातील शेतीलाही फटका बसला. २६ हजार ८१२ हेक्टरवरील पीक उद्ध्वस्त झाले. ३८ हजार ९२१ शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांना फटका बसला होता.

43 crore fund sanctioned for flood victims | पूरग्रस्तांसाठी ४३ कोटी निधी मंजूर

पूरग्रस्तांसाठी ४३ कोटी निधी मंजूर

Next
ठळक मुद्देराज्य शासनाचा निर्णय : १०४ गावांना बसला होता महापुराचा फटका, निधी अपुरा असल्याची पूरग्रस्तांची भावना

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरात उद्ध्वस्त झालेल्या नागरिकांना मदत देण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीतून जिल्ह्यासाठी ४३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. महापूराचा जिल्ह्यातील १०४ गावांना फटका बसला होता. कोट्यवधीचे नुकसान झाले असून हा निधी अपूरा असल्याची पूरग्रस्तांची भावना आहे.
भंडारा जिल्ह्यात २७ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत अतिवष्टी आणि महापूर आला. मध्यप्रदेशातील संजय सरोवर प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग केल्याने वैनगंगा, बावनथडी, चुलबंद या नद्यांना असलेल्या महापूराचा फटका जिल्ह्यातील १०४ गावांना फटका बसला. चार जणांचा महापूरात मृत्यू झाला होता. ८२५१ कुटुंबाना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. महापुराचा ३७८ गावातील शेतीलाही फटका बसला. २६ हजार ८१२ हेक्टरवरील पीक उद्ध्वस्त झाले. ३८ हजार ९२१ शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांना फटका बसला होता.
जिल्ह्यात १९९५ साली ओढवलेल्या पुरापेक्षाही मोठी पूरपरिस्थिती उद्भवली होती. अनेक गावात, शेतामध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. महाविकास आघाडी सरकार पुरग्रस्तांच्या पाठीशी असल्याचे आश्वासन दिले होते. दौऱ्यादरम्यान ना. वडट्टीवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजीत पवार यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. तातडीने मदतीची विनंती केली होती. त्याअनुषंगाने बुधवारी महसूल व वनविभागाने निधी मंजूरी शासन निर्णय निर्गमित केला. मात्र हा निधी अपूरा असल्याची भावना जिल्ह्यातील पूरग्रस्तांची आहे. निधी वाढून देण्याची मागणी आहे.

अशी दिली जाणार पूरग्रस्तांना मदत
मत्स्यबोटी, जाळ्यांसाठी तसेच मत्स्यबीज, शेतीसहाय, मृत व जखमी व्यक्तींच्या कुटुंबाला मदत, पुर्णत: घरांची क्षती झाली असल्यास कपडे, भांडे, घरगुती वस्तुकरिता शेती पिकांचे नुकसान, मृत जनावरे, घरांची अशंत: पडझड झालेली कच्ची किंवा पक्की घरे, नष्ट झालेल्या झोपड्या यासोबतच पुराने शेतात साचलेली वाळू चिकन माती, क्षार काढून टाकण्यासाठी शेतकऱ्यांना सहाय तसेच नदीच्या रुपांतरामुळे झालेल्या जमीनीच्या नुकसानीसाठी सहाय, मोफत रॉकेल आदींसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. नागपूर विभागातील भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर या जिल्ह्यांसाठी १६२ कोटी ८१ लाख ७ हजारांचा निधी मंजूर झाला आहे. त्यातील भंडारा जिल्ह्याच्या वाट्याला ४३ कोटी आले आहे.

Web Title: 43 crore fund sanctioned for flood victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.