शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
4
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
5
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
6
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
7
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
8
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
9
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
10
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
11
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
12
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
13
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
14
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
15
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
16
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
17
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
18
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
19
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
20
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

मनरेगातून ४२ लाख मनुष्यनिर्मित दिवस

By admin | Updated: February 11, 2016 00:48 IST

मागेल त्याला काम, या उद्देशानुसार राज्य शासनाने ग्रामीण तथा शहरी भागातील मजुरांना काम उपलब्ध करून देण्यासाठी मनरेगाची निर्मिती केली आहे.

२५ हजार मजुरांच्या हाताला काम : दुष्काळाच्या सावटावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन लागले कामालाभंडारा : मागेल त्याला काम, या उद्देशानुसार राज्य शासनाने ग्रामीण तथा शहरी भागातील मजुरांना काम उपलब्ध करून देण्यासाठी मनरेगाची निर्मिती केली आहे. यातून जिल्ह्यात यावर्षी २५ हजार २८५ मजुरांच्या माध्यमातून ४१ लाख ९७ हजार मनुष्यनिर्मित दिवसातून जिल्हा प्रशासनाने मजुरांना रोजगार उपलब्ध करून दिला. एक मजूर, एक मनुष्यनिर्मिती दिवस अशी परिभाषा मजुरांच्या कामाला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत करण्यात आली आहे. जिल्ह्यात रोहयो व ५० टक्के ग्रामपंचायत स्तर व अन्य एजंसीच्या माध्यमातून जिल्ह्यातील मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्ह्यात ५ लाख ६० हजार नोंदणीकृत (जॉब कार्ड धारक) मजुरांची नोंदणी आहे. त्यातील २ लाख ४५ हजार मजुरांची आतापर्यंत कामावर वर्णी लागली आहे. ७७ कोटी ३१ लाख कुशल व अकुशल कामांसाठी निधी प्राप्त झाला असून त्यापैकी ५८ कोटी ८० लाख मजुरीवर खर्च करण्यात आला असून हा खर्च अकुशल कामगारांवर करण्यात आला असून उर्वरीत खर्च कुशल कामगारांवर करण्यात आला आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून वृक्ष संगोपन, शौचालय बांधकाम, मुरुम सिमेंट रस्ते नालीबांधकाम, मामा तलाव गाळ काढणे व बोडी खोलीकरण, पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून नहर दुरुस्ती, नाला सरळीकरण करणे, बंधाऱ्यातील गाळ काढणे, सिंचन विहिर, मत्स्य संवर्धन तळी, बांधकाम व शेततळ्यांची कामे, मैदान सपाटीकरण, मजगी, गुरांचे शेड, शेळी पालन शेड, कुक्कुटपालन, पांदन रस्ते व कच्ची नाली, घरकुल आदींची कामे यातून करण्यात येत आहेत. ग्रामपंचायत व विविध विभागाच्या माध्यमातून ही सर्व कामे करण्यात येत आहेत. यात सध्या जिल्ह्यातील ५४० ग्रामपंचायतींच्या माध्यमातून ४२४ कामे सुरु आहेत. तर अन्य विभागाच्या माध्यमातून १३१ असे ५५५ कामे सुरु आहेत.मागीलवर्षी ५२.५० लाखांची कामे करण्यात आली. त्या तुलनेत १ एप्रिल २०१५ पासून आजपर्यंत करण्यात आलेली कामे उद्दीष्टपूर्तीपेक्षा जास्त कामाकडे वाटचाल सुरु आहे. (शहर प्रतिनिधी)