शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

तीन व्यापाऱ्यांना ४० हजारांचा दंड

By admin | Updated: September 30, 2015 00:47 IST

कमी दर्जा व लेबलदोषचे अन्नपदार्थ विक्री करणााऱ्या तीन व्यावसायीकांना ४० हजारांचा दंड ठोठावण्यात आला.

आयुक्तांची कारवाई : कमी दर्जाचे पदार्थ विक्री प्रकरणभंडारा : कमी दर्जा व लेबलदोषचे अन्नपदार्थ विक्री करणााऱ्या तीन व्यावसायीकांना ४० हजारांचा दंड ठोठावण्यात आला. हा निर्णय अधिकारी व सह आयुक्त (अन्न) शिवाजी देसाई यांनी दिला. यात भंडारा येथील दोन तर गोंदिया येथील एका व्यापाऱ्याचा समावेश आहे.भंडारा येथील तकिया वॉर्डातील लक्ष्मी बेकरी, मोहाडी येथील श्री जगदंबा किराणा अ‍ॅण्ड जनरल स्टोअर्स तर गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथील बिकानेर स्विट अ‍ॅण्ड रेस्टॉरेंटचा समावेश आहे. अन्न सुरक्षा अधिकारी व्ही. पी. धवड यांनी दोन कारवाई केल्यात. त्यात मोहाडी येथील शिवाजी चौकातील श्री जगदंबा किराणा अ‍ॅण्ड जनरल स्टोअर्समधून सुरेश वडतकर हे दिपक ब्राण्डचे फिल्टर्ड शेंगदाणा तेलची विक्री करीत होते. या खाद्यतेलाचा साठा जप्त करून तपासणी केली होती. यात नमुना कमी दर्जाचा आढळून आला होता. तर भंडारा शहरातील तकीया वॉर्डातील लक्ष्मी बेकरीची तपासणी केली असता, बेकरी मालकाकडून विक्री करण्यात येत असलेली लक्ष्मी ब्राण्ड पाव यात लेबलवर पोषक तत्वाची माहिती नसल्याने लेबलदोष आढळून आला. हे दोन्ही प्रकरण धवड यांनी न्यायदानासाठी न्यायनिर्णय अधिकारी नागपूर यांच्याकडे दाखल केले होते.तिसरे प्रकरण गोंदिया जिल्ह्यातील आमगांव येथील नारायणसिंग नरसिंग राजपुरोहित यांचे बिकानेर स्विट अ‍ॅण्ड रेस्टॉरेंटचे आहे. अन्न सुरक्षा अधिकारी प्र. नि. काळे यांनी बिकानेरच्या 'नमकीन' या खाद्यपदार्थाची तपासणी केली असता त्यात दोष आढळून आला. हे तिन्ही प्रकरण नागपूरचे न्यायनिर्णय अधिकारी व सहआयुक्त शिवाजी देसाई यांनी दिला. त्यांनी तिन्ही व्यावसायीकांना अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत दोषी ठरविले. यात बिकानेर व बेकरी मालकाला प्रत्येकी १० हजारांचा तर मोहाडी येथील वडतकर यांना २० हजारांचा द्रव्यदंड ठोठावल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त बी. जी. नंदनवार यांनी दिली. (शहर प्रतिनिधी)