जिल्ह्यात रविवारी ३४ पाॅझिटिव्ह; ३१ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 05:00 IST2021-06-07T05:00:00+5:302021-06-07T05:00:25+5:30

जिल्ह्यात आजपर्यंत ५९ हजार १९८ व्यक्ती बाधित झाल्या असून, त्यापैकी ५७ हजार ३२३ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत १,०५५ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण ३ लाख ९४ हजार ९५ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. रविवारी १ हजार ७५ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी ३४ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळल्या. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८३ टक्के असून जिल्ह्याचा मृत्यूदर ०१.७८ इतका आहे. 

34 positive in the district on Sunday; 31 coronal free | जिल्ह्यात रविवारी ३४ पाॅझिटिव्ह; ३१ कोरोनामुक्त

जिल्ह्यात रविवारी ३४ पाॅझिटिव्ह; ३१ कोरोनामुक्त

ठळक मुद्देएकही मृत्यू नाही : सक्रिय रुग्ण ८२०

लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या घटत असल्याचे दिसून येत आहे. रविवारी ३४ व्यक्ती बाधित आढळल्या असून, ३१ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. उल्लेखनीय म्हणजे रविवारी कोरोनामुळे कुणाचाही मृत्यू झालेला नाही. 
जिल्ह्यात आजपर्यंत ५९ हजार १९८ व्यक्ती बाधित झाल्या असून, त्यापैकी ५७ हजार ३२३ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत १,०५५ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण ३ लाख ९४ हजार ९५ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. रविवारी १ हजार ७५ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी ३४ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळल्या. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८३ टक्के असून जिल्ह्याचा मृत्यूदर ०१.७८ इतका आहे. 
जिल्ह्यात सक्रिय रुग्णसंख्या ८२० आहे. रविवारी पाॅझिटिव्ह आलेल्यांमध्ये भंडारा तालुक्यातील ११, मोहाडी ४, पवनी, लाखनी प्रत्येकी १, तर साकोली व लाखांदूर तालुक्यातील प्रत्येकी ७ व्यक्तिंचा समावेश आहे. सक्रिय रुग्णसंख्येत भंडारा तालुक्यात ११८, मोहाडी ४१, तुमसर ४२, पवनी २५, लाखनी ५८, साकोली ४९१, तर लाखांदूर तालुक्यातील ४५ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू भंडारा तालुक्यात झाले आहेत.

Web Title: 34 positive in the district on Sunday; 31 coronal free