शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘गोसेखुर्द’ चे २९ दरवाजे अर्धा मीटरने उघडले

By admin | Updated: September 14, 2016 00:27 IST

मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. या पावसामुळे वैनगंगा नदी भरून वाहत असून गोसेखुर्द धरणाचा जलस्तर वाढला आहे.

धरणाचा जलस्तर २४१.५०० मीटरवर स्थिर : १ लाख ४,५३२ क्युसेस पाण्याचा विसर्ग भंडारा : मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. या पावसामुळे वैनगंगा नदी भरून वाहत असून गोसेखुर्द धरणाचा जलस्तर वाढला आहे. धरणाचा जलस्तर २४१.५०० मीटरवर स्थिर ठेवण्यासाठी धरण विभागाने ३३ पैकी २९ दरवाजे अर्धा मीटरने सुरू केले आहे. या दरवाजामधून १ लाख ४,५३२ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या धरणामुळे गडचिरोली जिल्ह्यात पूर येण्याची शक्यता बळावली आहे. वैनगंगा नदीच्या वरच्या भागात शनिवारपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे सीमावर्ती भागात नदी-नाले आणि धरणाचा जलस्तर वाढला आहे. संभावित पूरस्थिती नियंत्रित करण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील पुजारीटोला, कालीसराड आणि सिरपूर जलाशयाचे दरवाजे सुरू केल्यामुळे पाणी वैनगंगा नदीत सोडण्यात आले आहे. कालीसराड धरणाचे दोन दरवाजे १.६० मीटर, पुजारीटोला धरणाचे १० दरवाजे १.२० मीटर तर सिरपूर धरणाचे ६ दरवाजे ०.३० मीटरने सुरू केले आहे. त्यामुळे वैनगंगा नदीचा जलस्तर वाढत असून गोसेखुर्द धरणाचा जलस्तर वाढत आहे. गोसेखुर्द धरणाचा वाढता जलस्तर लक्षात घेता ३३ दरवाजांपैकी २९ दरवाजे सोमवारच्या रात्री ११ वाजता अर्धा मीटरने सुरू करण्यात आले. या दरवाजांमधून १ लाख ४.५३२ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मंगळवारला सकाळी कारधा नदी पुलावर वैनगंगा नदीचा जलस्तर ४.९७ मीटर नोंदविण्यात आला असून ९ मीटर या धोक्याच्या पातळीपासून ४ मीटरने खाली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)यावर्षी ७० टक्केच पावसाची नोंदभंडारा जिल्ह्यात शनिवार रात्रीपासून पाऊस सुरू आहे. मागील २४ तासात २९.७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. १ जूनपासून १२ सप्टेंबरपर्यंत ११५०.७ मि.मी. सरासरी पावसाची गरज असताना त्यातुलनेत ८००.६ मि.मी. पाऊस पडला असून हा आतापर्यंत ७० टक्केच पाऊस पडला आहे. तीन दिवसांपासून पाऊस पडत असल्यामुळे पावसाची टक्केवारी वाढली आहे. हा पाऊस नसता तर यावर्षी ५५ टक्के पावसाची नोंद झाली असती. पावसामुळे शेतकरी सुखावला मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी सुखावला आहे. एका पाण्याअभावी हातचे पीक जाणार असल्यामुळे भीतीमुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसाने नवसंजिवनी दिली आहे. त्यामुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.