शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

मॉईलचे २७० कामगार मेडिकल ‘अनफिट’

By admin | Updated: November 27, 2014 23:28 IST

सार्वजनिक उपक्रमाअंतर्गत मॅग्नीज खाणीत मागील अनेक वर्षापासून स्थानिक बेरोजगारांना संधी दिली जात नाही. याउलट संबंधितांना स्थापत्य व खाणीतील विविध कामांची कंत्राटे दिली जात आहे.

तुमसर : सार्वजनिक उपक्रमाअंतर्गत मॅग्नीज खाणीत मागील अनेक वर्षापासून स्थानिक बेरोजगारांना संधी दिली जात नाही. याउलट संबंधितांना स्थापत्य व खाणीतील विविध कामांची कंत्राटे दिली जात आहे. खाणीत सध्या कार्यरत कामगारांना मेडिकल अनफीट दाखवून त्यांच्या पाल्यांना येथे नौकरीत सामावून घेण्याचा प्रकार सुरू आहे. नागपूर विभागातील नऊ खाणीत सुमारे २७० कर्मचाऱ्यांनी मेडीकल अनफिटचे अर्ज सादर केल्याची माहिती आहे.तुमसर तालुक्यात भारत सरकारच्या चिखला भूमिगत व बाळापूर खुली तर जवळील मध्यप्रदेशातील तिरोडी येथे ब्रिटीशकालीन मॅग्नीज खाणी आहेत. जगप्रसिद्ध या खाणीत मात्र अनेक बाबतीत विसंगती दिसून येत आहे. मागील एका वर्षात येथे खाण प्रशासनात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या जवळचे संबंध असलेल्यांना कंत्राट दिले आहेत. यात स्थापत्य विभागात सदनिका दुरूस्ती, रंगरंगोटी करणे, मॅग्नीज तोडणे, साईजमध्ये करणे या कामांचा समावेश आहे. ५० वर्षे खाणीत कार्यरत कामगार येथे मेडिकल अनफीट होतात व त्यांच्या पाल्यांना त्यांच्या जागेवर येथे भरती करण्याचा प्रकार सुरू आहे. नागपूर येथे या खाणीचे मुख्य कार्यालय आहे. या कार्यालयाअंतर्गत नऊ खाणींचा समावेश आहे.यावर्षी २७० कामगार येथे मेडिकल अनफीट झाल्याची माहिती आहे. मागील अनेक वर्षापासून कामगारांच्या पाल्यांनाच येथे नौकरी लागते इतरांना येथे प्रवेश मिळत नाही.येथे दहा वर्षापासून एकाच खाणीत काम करणारे कर्मचारी येथे आहेत. मागील एक वर्षात या खाणीत सुमारे सहा कोटींचे बांधकामे करण्यात आली. खाण कायद्यानुसार ५०० मीटर परिसरात ब्लास्टींग झोन बांधकाम करता येत नाही. परंतु येथे ती करण्यात आलेली आहेत.भूमी अधिग्रहण कायदा जानेवारी २०१४ मध्ये पारीत झाला. या कायद्याअंतर्गत ज्यांची शेती खाणीत गेली त्यांच्या पाल्यांना नौकरी व रॉयल्टी देण्याचा नियम असतांनी येथे तो कायदा पायदळी तुडविण्यात आला आहे. या दोन्ही खाणीत बिहार, छत्तीसगड, बंगाल या प्रदेशातील कामगारांचा भरणा अधिक आहे. त्यांची संख्या अनेक वर्षापासून जैसे थे आहे. स्थानिकांना येथे प्राधान्याची गरज असताना खाण प्रशानाने ते सौजन्य दाखविले नाही. खाण प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काही महिन्यापुर्वी कारवाईची तयारी करून केसेस तयार केल्या होत्या. परंतु कारवाई झाली नाही. उलट त्या कर्मचाऱ्यांना खाण प्रशासनाने पदोन्नती दिली. या प्रकरणाच्या चौकशी करिता खासदार नाना पटोले व आमदार चरण वाघमारे यांनी केंद्र व राज्य शासनाकडे हा विषय गांर्भियाने घेण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. (तालुका प्रतिनिधी)