शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

करडी परिसरात २५१ पॉझिटिव्ह, तर १० जणांनी गमावले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 05:00 IST

करडी परिसरातील ३५ हजार लोकसंख्येसाठी एकमेव प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. केंद्रापासून भंडारा व तुमसर, साकोली शहराचे अंतर २५ ते ३० किमीचे असल्याने नागरिकांना आरोग्य सुविधेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रावर अवलंबून राहावे लागते. शासनाच्या वतीने कोराेनावर प्रतिबंधात्मक उपचार म्हणून लसीकरणास प्रारंभ करण्यात आले. करडी परिसरात कोव्हॅक्सिनचा पहिला डोस ८ मार्चपासून सुरू करण्यात आला.

ठळक मुद्दे४,३९७ नागरिकांचे लसीकरण : पुरूषांपेक्षा महिलांचा समावेश अधिक

युवराज गोमासे लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील करडी परिसरातील २५ गावात लॉकडाऊन असला तरी कोरोनाचा संसर्ग वाढता आहे. शासनाच्या आदेशानुसार प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत सहा उपकेंद्रात ८ मार्चपासून कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड लसीचे दोन टप्प्यात ४,३९७ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. तर ९४ शिबिराचे माध्यमातून ९ एप्रिलपर्यंत २,९०० नागरिकांची अँटीजेन तपासणी करण्यात आली. तपासणीत २५१ रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. आतापर्यंत १० जणांनी कोरोनामुळे प्राण गमाविले आहे. करडी परिसरातील ३५ हजार लोकसंख्येसाठी एकमेव प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. केंद्रापासून भंडारा व तुमसर, साकोली शहराचे अंतर २५ ते ३० किमीचे असल्याने नागरिकांना आरोग्य सुविधेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रावर अवलंबून राहावे लागते. शासनाच्या वतीने कोराेनावर प्रतिबंधात्मक उपचार म्हणून लसीकरणास प्रारंभ करण्यात आले. करडी परिसरात कोव्हॅक्सिनचा पहिला डोस ८ मार्चपासून सुरू करण्यात आला. आतापर्यंत नऊ टप्प्यात परिसरातील उपकेंद्र व केंद्रस्तरावर २,५४३ नागरिकांना कोव्हॅक्सिनचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला. यात १,०७० पुरूष तर १,४७२ महिलांचा समावेश आहे. यात महिला आघाडीवर आहेत. केंद्र व उपकेंद्र स्तरावर कोविशिल्ड लसीचे लसीकरण करण्यात आले. आतापर्यंत १,८५४ नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला. यात ८३४ पुरूष तर १,०१० स्त्रियांचा समावेश आहे. करडी परिसरात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आरोग्य केंद्र व उपकेंद्रात कर्मचाऱ्यांचे पद रिक्त कोरोना महामारी सतत वाढत असून जीवघेणी ठरली असल्याने आरोग्य विभागावर कामाचा ताण वाढला आहे. केंद्रांतर्गत पालोरा, जांभोरा, करडी, निलज, मुंढरी, देव्हाडा आदीसह उपकेंद्र असून लसीकरण, ॲंटीजेन तपासणी तसेच इतर तपासण्या करण्याकरिता मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. केंद्रात ३ आरोग्य सेवकांच्या जागा रिक्त आहेत. तसेच सहा उपकेंद्रावर ६ नर्सेसची पदे रिक्त आहेत. त्यामुळे शासनाने आरोग्य सेवेचा प्रश्न गांभीर्याने सोडविण्याची गरज आहे.लसींच्या तुटवड्याने लसीकरण बंद परिसरात कोरोना लसीकरणाचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. तीन दिवसांपासून कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लस संपल्याने लसीकरण बंद पडले आहे. शासन-प्रशासनाकडून लस उपलब्धतेसाठी उशीर झाल्याने लसीकरण थांबविण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगितले जात आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून व्हॅक्सिनसाठी नागरिकांना वाट पाहावी लागत आहे.

आरोग्य केंद्रात नागरिकांसाठी पर्याप्त औषधसाठा उपलब्ध असून नागरिकांनी न घाबरता आरोग्य केंद्र व उपकेंद्रात येऊन लसीकरण तसेच अँटीजेन तपासणी व आरोग्य संबंधित इतर आवश्यक तपासण्या वेळेत कराव्या. -डॉ. पी.जी तलमले,                वैद्यकीय अधिकारी करडी

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या