शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
6
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
7
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
8
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
9
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
10
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
11
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
12
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
13
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
14
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
15
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
16
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
17
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
18
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
19
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
20
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
Daily Top 2Weekly Top 5

२३५ शेतकरी आत्महत्या मदतीस अपात्र

By admin | Updated: February 25, 2015 01:12 IST

निसर्गाच्या लहरीपणामुळे सततची नापिकी व वाढणाऱ्या कर्जाच्या डोंगरामुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी न होता वाढतच असून, ...

देवानंद नंदेश्वर भंडारानिसर्गाच्या लहरीपणामुळे सततची नापिकी व वाढणाऱ्या कर्जाच्या डोंगरामुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी न होता वाढतच असून, गत १५ वर्षात भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत ३६१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मात्र शासनाच्या निकषावर यातील २३५ शेतकरी आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्या आहेत.शेतात केलेला लागवडीचा खर्च. हाती आलेले उत्पन्न आणि मिळणारा दर. यात प्रचंड तफावत असून, यासोबतच सिंचनाअभावी बारमाही पीक घेता येत नाही, शेतीला जोडधंदा नसल्याने हातात पैसा खेळत नाही. परिणामी, वाट्याला आलेल्या कर्जबाजारीपणामुळे आलेल्या नैराश्यापोटीच जीवनाचा डाव हरलो, या भावनेपोटी जिल्ह्यात मागील १५ वर्षात ३६१ शेतकऱ्यांनी सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्या आहेत. त्यापैकी राज्य शासनाच्या निकषाप्रमाणे पात्र ठरलेल्या १२२ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात आली. २३५ शेतकऱ्यांचा मृत्यू आजारपणा, व्यसनाधिनता, अपघात, बेरोजगारी, घरगुती भांडण आदी कारणांमुळे झाला असल्याचे निष्कर्ष शासनाकडून लावण्यात आले. यामुळे अशा शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत नाकारण्यात आलेली आहे.जानेवारी २०१५ मध्ये शेतकऱ्यांच्या तीन आत्महत्या झाल्या आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात आली नाही. त्यांना मदतीसंदर्भात लवकरच जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. याकडे लाभार्थ्यांचे लक्ष लागले आहे.२०१४ मध्ये २४ प्रकरणे अपात्र नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे अन्नदाता शेतकरी कंगाल झाला. भिकेला लागला. यामुळे आत्महत्येचे सत्र सुरु आहे. २०१४ जानेवारी ते डिसेंबर या वर्षभरात जिल्ह्यात ३६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या नोंदविल्या गेल्या. यापैकी ११ प्रकरणं पात्र ठरुन त्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात आली. तर २४ प्रकरणं अपात्र ठरली; मात्र विविध कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचे एक प्रकरणं लालफितशाहीत अडकली असून, शासन दरबारी प्रलंबित आहेत.