शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

१७,२०९ विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2016 00:31 IST

उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा १८ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.

१८ पासून परीक्षा   दहावीचे २२,२६१ परीक्षार्थीइंद्रपाल कटकवार भंडाराउच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा १८ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या परीक्षेसाठी ५७ केंद्रावर एकूण १७ हजार २०९ विद्यार्थी बसणार आहेत. परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी दक्षता समितीसह भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली असली गैरमार्गाशी लढा देणारे भयमुक्त वातावरणावरच चिंता व्यक्त केली जात आहे. हे पथक परीक्षेदरम्यान केंद्रांवर होणाऱ्या कॉपी व अनुचित प्रकारावर करडीनजर ठेवणार आहेत. विभागिय शिक्षण मंडळाच्या दिशानिर्देशानुसार जिल्हा परिषद शिक्षण विभाग बारावीच्या परीक्षेसाठी सज्ज झाला आहे. यासंदर्भात शिक्षणाधिकारी (माध्यमिक) किसन शेंडे म्हणाले, मागीलवर्षीप्रमाणे यावर्षीसुध्दा बारावीची परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्र प्रमुख, अतिरिक्त केंद्र प्रमुख तथा परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवरील गैरप्रकार थांबविण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात राहणार आहे. परीक्षा केंद्रापासून १०० मीटरपर्यत प्रतिबंधीत क्षेत्र व या क्षेत्रात संचालित झेराक्स केंद्र बंद ठेवण्याचे आदेश देण्यात येणार आहे. भरारी पथकात शिक्षणाधिकारी, महसूल विभागाचे प्रमुख, संबंधित तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी, मुख्याधिकारी यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांचा समावेश राहणार आहे. परीक्षेच्या तयारीसंदर्भात मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली जाणार आहे. काही परीक्षा केंद्रांवर चित्रीकरण करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.५७ केंद्रावर होणार परीक्षाभंडारा जिल्ह्यात बारावीची परीक्षा एकूण ५७ केंद्रांवर होत आहे. यावर्षी १७,२०९ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. यात नियमित तथा पुनर्परीक्षार्थीचा समावेश आहे. दहावीची परीक्षा १ मार्चपासून ८७ केंद्रातून २२ हजार २६१ विद्यार्थी देणार असून मंडळाकडून परीक्षेची तयारी अंतिम टप्प्यात आहे.संवेदनशील केंद्र नाहीभंडारा जिल्ह्यातील कॉपी बहाद्दरांचा रिकॉर्ड पाहता बोर्डातर्फे अशा परीक्षा केंद्रांचा समावेश संवेदनशील केंद्रात करण्यात येत होता. मात्र यावर्षी शिक्षण मंडळाने कोणतेही केंद्र संवेदनशील नाही, असे सांगितले. म्हणजेच प्रत्येक केंद्रावर चोख बंदोबस्त ठेऊन कॉपी होणार नाही, याची पूर्वसूचना दिल्याचे म्हटले जात आहे. कॉपी बहाद्दरांचा कलंक पुसण्यासाठी ही धडपड आहे, की अन्य बाबीसाठी हे लवकर कळेलच.