शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

12 हजाराहून ॲक्टिव्ह रुग्ण 147 वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 05:00 IST

जिल्हा काेराेनामुक्त हाेण्याच्या वाटेवर असून, मंगळवारी तर केवळ पाच जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख पाच हजार ७८६ व्यक्तींची काेराेना चाचणी करण्यात आली. त्यात ५९ हजार ३११ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या अधिक हाेती. एकट्या एप्रिल महिन्यात ३३ हजारावर रुग्ण भंडारा जिल्ह्यात आढळून आले हाेते.

ठळक मुद्देजिल्हा काेराेनामुक्तीच्या वाटेवर : मंगळवारी ३३ काेराेनामुक्त, केवळ ५ पाॅझिटिव्ह

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : काेराेना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत एप्रिल महिन्यात जिल्ह्यात हाहाकार उडविला हाेता. ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १२ हजाराच्या वर पाेहाेचली हाेती. गावागावात काेराेनाचे ॲक्टिव्ह रुग्ण हाेते. समाजमन भयभीत झाले हाेते. आता काेराेना संसर्गाची लाट ओसरली असून, दाेन महिन्यात १२ हजाराहून ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १४७ वर पाेहाेचली आहे. जिल्हा काेराेनामुक्त हाेण्याच्या वाटेवर असून, मंगळवारी तर केवळ पाच जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख पाच हजार ७८६ व्यक्तींची काेराेना चाचणी करण्यात आली. त्यात ५९ हजार ३११ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या अधिक हाेती. एकट्या एप्रिल महिन्यात ३३ हजारावर रुग्ण भंडारा जिल्ह्यात आढळून आले हाेते. भंडारा शहरासह गावागावात काेराेना रुग्ण दिसत हाेते. १८ एप्रिल राेजी जिल्ह्यात १२ हजार ४४७ ॲक्टिव्ह रुग्णांची नाेंद झाली हाेती. ही सर्वाधिक नाेंद हाेती. मात्र मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून काेराेना रुग्णांची संख्या कमी व्हायला लागली. जून महिन्यात तर अगदी बाेटावर माेजण्याइतके रुग्ण आढळून येऊ लागले. जिल्ह्यात मंगळवारी केवळ पाच जण पाॅझिटिव्ह आढळून आले. त्यात भंडारा, साकाेली येथे प्रत्येकी एक तर पवनी तालुक्यात तीन व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळले. विशेष म्हणजे, सध्या जिल्ह्यात १४७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या वेगाने कमी हाेत असून, रुग्णालयावरील ताणही कमी झाला आहे. एप्रिल महिन्यात जिल्ह्यात काेणत्याही रुग्णालयात बेड मिळणे कठीण झाले हाेते. आता पूर्णत: परिस्थिती नियंत्रणात आली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.

सर्वात कमी ॲक्टिव्ह रुग्ण माेहाडीत- जिल्ह्यात सध्या १४७ ॲक्टिव्ह रुग्ण असून, त्यात सर्वात कमी ९ रुग्ण माेहाडी तालुक्यात आहेत. विशेष म्हणजे माेहाडी तालुक्यात रुग्णांची संख्या अचानक वाढायला लागली हाेती. या तालुक्यात ४ हजार ३५१ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले हाेते. त्यापैकी ४,२४७ व्यक्तींनी काेराेनावर मात केली असून, ५५ जणांचा मृत्यू झाला. सध्या भंडारा तालुक्यात ॲक्टिव्ह रुग्ण ५४ आहेत. तुमसर ११, पवनी १७, लाखनी १६, साकाेली २६, लाखांदूर १४ असे ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी हाेत असल्याने आराेग्य यंत्रणेवरील ताण कमी हाेण्यास मदत हाेत आहे.

१५ दिवसात एक मृत्यूएप्रिल महिन्यात काेराेना मृत्यूचे तांडव अनुभवणाऱ्या भंडारा जिल्ह्याला माेठा दिलासा दिला आहे. ४ जून राेजी एका व्यक्तीचा काेराेनाने मृत्यू झाला. अपवाद वगळता १५ दिवसात जिल्ह्यात कुठेही काेराेनाने मृत्यू झाला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत १,०५५ व्यक्तींचा काेराेनाने मृत्यू झाला असून, आता मृत्यूसंख्या नियंत्राणात असल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या