12 हजाराहून ॲक्टिव्ह रुग्ण 147 वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 05:00 AM2021-06-16T05:00:00+5:302021-06-16T05:00:28+5:30

जिल्हा काेराेनामुक्त हाेण्याच्या वाटेवर असून, मंगळवारी तर केवळ पाच जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख पाच हजार ७८६ व्यक्तींची काेराेना चाचणी करण्यात आली. त्यात ५९ हजार ३११ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या अधिक हाेती. एकट्या एप्रिल महिन्यात ३३ हजारावर रुग्ण भंडारा जिल्ह्यात आढळून आले हाेते.

147 to 147 active patients | 12 हजाराहून ॲक्टिव्ह रुग्ण 147 वर

12 हजाराहून ॲक्टिव्ह रुग्ण 147 वर

Next
ठळक मुद्देजिल्हा काेराेनामुक्तीच्या वाटेवर : मंगळवारी ३३ काेराेनामुक्त, केवळ ५ पाॅझिटिव्ह

लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : काेराेना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत एप्रिल महिन्यात जिल्ह्यात हाहाकार उडविला हाेता. ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १२ हजाराच्या वर पाेहाेचली हाेती. गावागावात काेराेनाचे ॲक्टिव्ह रुग्ण हाेते. समाजमन भयभीत झाले हाेते. आता काेराेना संसर्गाची लाट ओसरली असून, दाेन महिन्यात १२ हजाराहून ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १४७ वर पाेहाेचली आहे. 
जिल्हा काेराेनामुक्त हाेण्याच्या वाटेवर असून, मंगळवारी तर केवळ पाच जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख पाच हजार ७८६ व्यक्तींची काेराेना चाचणी करण्यात आली. त्यात ५९ हजार ३११ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या अधिक हाेती. एकट्या एप्रिल महिन्यात ३३ हजारावर रुग्ण भंडारा जिल्ह्यात आढळून आले हाेते. भंडारा शहरासह गावागावात काेराेना रुग्ण दिसत हाेते. १८ एप्रिल राेजी जिल्ह्यात १२ हजार ४४७ ॲक्टिव्ह रुग्णांची नाेंद झाली हाेती. ही सर्वाधिक नाेंद हाेती. मात्र मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून काेराेना रुग्णांची संख्या कमी व्हायला लागली. जून महिन्यात तर अगदी बाेटावर माेजण्याइतके रुग्ण आढळून येऊ लागले. 
जिल्ह्यात मंगळवारी केवळ पाच जण पाॅझिटिव्ह आढळून आले. त्यात भंडारा, साकाेली येथे प्रत्येकी एक तर पवनी तालुक्यात तीन व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळले. विशेष म्हणजे, सध्या जिल्ह्यात १४७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या वेगाने कमी हाेत असून, रुग्णालयावरील ताणही कमी झाला आहे. एप्रिल महिन्यात जिल्ह्यात काेणत्याही रुग्णालयात बेड मिळणे कठीण झाले हाेते. आता पूर्णत: परिस्थिती नियंत्रणात आली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.

सर्वात कमी ॲक्टिव्ह रुग्ण माेहाडीत
- जिल्ह्यात सध्या १४७ ॲक्टिव्ह रुग्ण असून, त्यात सर्वात कमी ९ रुग्ण माेहाडी तालुक्यात आहेत. विशेष म्हणजे माेहाडी तालुक्यात रुग्णांची संख्या अचानक वाढायला लागली हाेती. या तालुक्यात ४ हजार ३५१ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले हाेते. त्यापैकी ४,२४७ व्यक्तींनी काेराेनावर मात केली असून, ५५ जणांचा मृत्यू झाला. सध्या भंडारा तालुक्यात ॲक्टिव्ह रुग्ण ५४ आहेत. तुमसर ११, पवनी १७, लाखनी १६, साकाेली २६, लाखांदूर १४ असे ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी हाेत असल्याने आराेग्य यंत्रणेवरील ताण कमी हाेण्यास मदत हाेत आहे.

१५ दिवसात एक मृत्यू
एप्रिल महिन्यात काेराेना मृत्यूचे तांडव अनुभवणाऱ्या भंडारा जिल्ह्याला माेठा दिलासा दिला आहे. ४ जून राेजी एका व्यक्तीचा काेराेनाने मृत्यू झाला. अपवाद वगळता १५ दिवसात जिल्ह्यात कुठेही काेराेनाने मृत्यू झाला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत १,०५५ व्यक्तींचा काेराेनाने मृत्यू झाला असून, आता मृत्यूसंख्या नियंत्राणात असल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

 

Web Title: 147 to 147 active patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.