शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या वेतनाचे १३.५० कोटी अडले

By admin | Updated: November 29, 2014 23:15 IST

जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत कार्यरत जिल्ह्यातील सुमारे तीन हजार शिक्षकांचे आॅक्टोंबर महिन्याचे १३ कोटी ४९ लाख २२,७५० रूपये अडले आहे. वेतन अडल्याने शिक्षकांमध्ये शिक्षक विभागाबाबत रोष व्यक्त होत आहे.

आंदोलनाचा इशारा : शिक्षक संकटातभंडारा : जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत कार्यरत जिल्ह्यातील सुमारे तीन हजार शिक्षकांचे आॅक्टोंबर महिन्याचे १३ कोटी ४९ लाख २२,७५० रूपये अडले आहे. वेतन अडल्याने शिक्षकांमध्ये शिक्षक विभागाबाबत रोष व्यक्त होत आहे. थकीत वेतन त्वरीत द्यावे, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिक्षक संघाने जिल्हा परिषद प्रशासनाला दिला आहे.विद्यार्जनाचे पवित्र कार्य करून आदर्श विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षकांची महत्वाची भुमिका असते. जिल्ह्यात सुमारे तीन हजार शिक्षक कार्यरत आहेत. नोव्हेंबर महिना संपत असतानाही माहे आॅक्टोंबरचे वेतन देण्यात जिल्हा परिषद असमर्थ ठरली आहे. तीन हजार शिक्षकांच्या वेतनाचे सुमारे १३ कोटी ५० लाख रूपये अडले आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने वेळोवेळी जिल्हा परिषद शिक्षण विभागाला साकडे घातले. मात्र नोव्हेंबर अखेरपर्यंत त्यांचे वेतन देण्यात आले नाही. त्यामुळे श्निक्षकांना सोसायटीच्या अतिरिक्त व्याजाचा भुर्दंड पडत आहे. यासह अनेक अडचणींचा सामना शिक्षकांना करावा लागत असल्याने संघाचे जिल्हाध्यक्ष मुबारक सैय्यद यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात त्यांनी आॅक्टोंबरचे प्रलंबीत वेतन त्वरीत द्यावे, वेतन देयक नियमित द्यावे, प्रलंबीत देयके निकाली काढण्यासाठी रकमेची तरतुद करावी, आंतरजिल्हा बदलीच्या शिक्षकांना सामावून घ्यावे, शिक्षकांची सेवाजेष्ठता यादी पदनिहाय प्रकाशित करावी, रिक्त पदे त्वरीत भरावी, चटोपाध्याय व निवळश्रेणी प्रस्तावाला त्वरीत मंजुरी देवून वेतननिश्चिती करावी, पोषण आहाराचा धान्यसाठा वेळेवर द्यावा. आदी मागण्यांचा समावेश आहे. या मागण्यांची पूर्तता त्वरीत करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. ६ डिसेंबरला धरणे देण्यात येणार असून मागण्या पूर्ण न झाल्यास त्यानंतर साखळी उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. (शहर प्रतिनिधी)