भंडारा : रानडुक्करांच्या तस्करी प्रकरणी १२ आरोपींना हत्यार, जाळे व वाहनांसह ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई गस्ती दरम्यान तुमसर वनविभागाने १९ फेब्रुवारी रोजी झंझेरिया बिटात केली.
तुमसर वनपरिक्षेत्र अधिकारी छगनलाल रहांगडाले, वनरक्षक दीपक भिवगडे व के. ए. मांढरे हे १९ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ वाजता शासकीय वाहनाने गस्त घालत असतांना त्यांना झंझेरिया बिटातील वाघसांध्या तलाव परिसरात संशयास्पद हालचाली दिसल्या. कक्ष क्रमांक ७४ अ राखीव वनाजवळील तलावाकाठावर महिंद्रा बोलेरो पिकअप (एमएच ४९ बीझेड ७१०४) आढळून आले. पाहणीत वाहनात एक रानडुक्कर सापडले, तर आजूबाजूला १० ते १२ संशयित दिसून आले. चौकशीअंती संशयितांनी कबूल केले की, ते जंगल व शेतात रानडुक्कर पकडतात आणि ते नागपूर किंवा छत्तीसगढ राज्यात विकतात. वन्यजीव कायद्याचे उल्लंघन प्रकरणी १२ जणांना ताब्यात घेण्यात आले.
अंशु बबलू गोंडाने (२१, नागपूर), महेश शामराव मेश्राम (२६, मकरधोकडा), प्रदिप हरिचंद्र शेंडे (२३, अर्जुनी), सचिन देवदास मेश्राम (२९, पचखेडी), रोहित नंदेश्वर कुंडले (२५, झारली), मनिष सुनिल मारबते (२३, कारधा), रोशन रमेश शेंडे (२५, अर्जुनी), खेमराज उमराव बोंडरे (२९, अर्जुनी), योगेश डोडकू शेंडे (२९, अर्जुनी), राम नंदेश्वर उईके (२३, भंडारा), मंगेश गुलाब मारबते (२३, मोहाडी), सतिश कोठीराम शेंडे (२८, रोहा), असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पुढील तपास उपवनसंरक्षक योंगेंद्र सिंह व गडेगाव प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी रितेश भोंगाडे यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी छगनलाल रहांगडाले, क्षेत्र सहायक आर. डी. पाल्हेवार, झंझेरिया बिटरक्षक के. ए. मांढरे व कर्मचारी करीत आहेत.
मुद्देमाल जप्त, न्यायालयासमोर केले हजर
याप्रकरणी वनाधिकाऱ्यांनी हत्तीमार जाळी (१३ नग), लोखंडी कुऱ्हाड (१), सुरा (१), बांबू काठ्या (४० नग), कंबळ (१० नग), अँड्रॉईड मोबाइल (१२ नग) व बोलेरो पिकअप वाहन, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.१२ आरोपींविरुद्ध भारतीय वन कायदा १९२७ चे कलम २६ (१)(आय) व वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ (सुधारित २०२३) चे कलम ९, ४३, ४९, ५० व ५१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना मोहाडी येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
Web Summary : Forest officials arrested twelve individuals in Bhandara for illegal wild boar poaching. They were caught with weapons, nets, and a vehicle near Zanjharia beat. The suspects confessed to selling the boars in Nagpur and Chhattisgarh. Authorities seized equipment and presented the accused in court.
Web Summary : भंडारा में वन विभाग के अधिकारियों ने जंगली सूअर का अवैध शिकार करने के आरोप में बारह लोगों को गिरफ्तार किया। झंझेरिया बीट के पास हथियार, जाल और एक वाहन के साथ पकड़े गए। आरोपियों ने नागपुर और छत्तीसगढ़ में सूअरों को बेचने की बात कबूल की। अधिकारियों ने उपकरण जब्त कर आरोपियों को अदालत में पेश किया।