शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

करडीत २१ पैकी १२ पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 06:00 IST

जिल्हा परिषद हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय वर्ग ५ ते १२ पर्यंत करडी, निलज खुर्द, मुंढरी खुर्द, मुंढरी बुज., बोरी, मोहगाव, निलज बुज, मोहगाव, नवेगाव, दवडीपार आदी गावातील विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत. विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांची मोठी पटसंख्या आहे. परंतु कला शाखेत तीन पदांपैकी दोन पदे रिक्त, तर एक पद भरलेला आहे. विज्ञान शाखासाठी एकही कायमस्वरुपी शिक्षक नाही. कंत्राटी शिक्षकांवर विज्ञान शाखा चालविली जात आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद शाळा : रिक्त पदांमुळे कामाचा ताण, पदभरती करण्याची मागणी

युवराज गोमासे।लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील करडी जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात रिक्त पदांमुळे शिक्षक व कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. शाळेत एकुण २१ मंजूर पदे असतांना केवळ नऊ पदे भरलेली आहेत. १२ पदे रिक्त असल्याने शाळा चालवायची कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा परिषद सदस्य निलीमा इलमे यांनी या संबंधाने शिक्षकांची अनेकदा मागणी केली. परंतु शिक्षकांची कमतरता असल्याचे कारण नेहमी सांगितले जात असल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांवर निभवून न्यावे लागत आहे.जिल्हा परिषद हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय वर्ग ५ ते १२ पर्यंत करडी, निलज खुर्द, मुंढरी खुर्द, मुंढरी बुज., बोरी, मोहगाव, निलज बुज, मोहगाव, नवेगाव, दवडीपार आदी गावातील विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत. विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांची मोठी पटसंख्या आहे. परंतु कला शाखेत तीन पदांपैकी दोन पदे रिक्त, तर एक पद भरलेला आहे. विज्ञान शाखासाठी एकही कायमस्वरुपी शिक्षक नाही. कंत्राटी शिक्षकांवर विज्ञान शाखा चालविली जात आहे.वर्ग ९ ते १० साठी मंजूर पदांची संख्या पाच असून दोन पदे भरलेली असून तीन पदे रिक्त आहेत. वर्ग ५ ते ८ पर्यंत सात पदे असतांना केवळ दोन पदे भरलेली आहेत, तर पाच पदे रिक्त आहेत. कनिष्ठ लिपीकांचे दोन पदे मंजूर असतांना १ पद भरलेले आहे परिचरांच्या मंजूर चार पदांपैकी तीन पदे भरलेली असून एक पद रिक्त आहे. असे एकुण मंजूर २१ पदांपैकी १२ पदे रिक्त आहेत तर फक्त ९ पदे भरलेली आहेत. कायमस्वरुपी शिक्षक नसल्याने शाळेत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.विज्ञान शाखेला २० टक्के अनुदानतत्कालीन जिल्हा परिषद सदस्य महेंद्र शेंडे यांच्या कार्यकाळाच्या पहिल्याच वर्षी त्यांनी करडी महाविद्यालयात विज्ञान शाखा विना अनुदानावर सुरु केली होती. मात्र, त्यावेळी शिक्षकांची कमतरता असल्याचे सांगत जिल्हा परिषदेने कायमस्वरुपी शिक्षक देण्यास नकार दिला होता. तेव्हापासून विज्ञान शाखा कंत्राटी शिक्षकांच्या भरवश्यावर चालविली जात आहे. यावर्षी विज्ञान शाखेला २० टक्के अनुदान प्राप्त झाल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका जे. एम. अजवर यांनी दिली आहे.पालोरा शाळेत शिक्षकांची सहा पदे रिक्तजिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पालोरा येथे सुध्दा वर्ग ५ ते ८ पर्यंत तीन पदे रिक्त आहेत. वर्ग ९ ते १० पर्यंत एक पद, तर कनिष्ठ कला महाविद्यालयात व्याख्याताची एक जागा रिक्त आहे. मुख्याध्यापकाचे पद सुध्दा रिक्त असल्याने कामाचा ताण वाढला आहे. शिक्षकांच्या कमतरतेचा प्रश्न तातडीने सोडविण्यात यावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या चौरागडे यांनी केली आहे.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळा