शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

१० पैकी एकाला होतो मधुमेहाचा आजार

By admin | Updated: November 13, 2014 22:57 IST

जागतिक मधुमेह संस्था यांच्या आकडेवारीनुसार जगामध्ये ३८२ दशलक्ष लोक हे मधुमेहामुळे पिडीत आहेत. २०३५ पर्यंत ५९२ दशलक्ष लोक किंवा दहा व्यक्तीमागे एक लोकांना मधुमेह होण्याची शक्यता आहे.

भंडारा : जागतिक मधुमेह संस्था यांच्या आकडेवारीनुसार जगामध्ये ३८२ दशलक्ष लोक हे मधुमेहामुळे पिडीत आहेत. २०३५ पर्यंत ५९२ दशलक्ष लोक किंवा दहा व्यक्तीमागे एक लोकांना मधुमेह होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत ३१६ दशलक्ष लोक हे प्रकार २ मधुमेहापासून पीडीत होण्याच्या मार्गावर आहेत व एकुण ५०० दशलक्ष लोकांना मधुमेह होण्याची शक्यता आहे. प्रकार २ मधुमेह टाळता येऊ शकतो, योग्य व सकस आहार घेतल्यास आजार आटोक्यात ठेवता येतो.दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिन म्हणून जगभर साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा जागतिक मधुमेह दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार २०१४-१६ या कालावधीत मधुमेह व आरोग्यदायी जीवन यावर लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. यावर्षी आरोग्यदायी आहार, मधुमेह व त्यामुळे उत्पन्न होणाऱ्या समस्यांचा प्रतिबंध यावर भर देण्यात आला आहे. जेणे करून मधुमेहामुळे होणारे नुकसान टाळता येईल. वाढलेल्या आयुर्मानासोबत मधुमेह रुग्णांच्या समस्या वाढत आहेत. या अनुषंगाने शासनाने राष्ट्रीय असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रम सुरु केलेला आहो. त्या अंतर्गत रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, हृदयविकार, पक्षाघात, मोतीबिंदू यांचे निदान व उपचार केले जातात. या आजाराविषयी असलेल्या विविध योजनांची माहिती सुद्धा दिली जाते.जागतिक मधुमेह दिनानिमित्त दि. १४ नोव्हेंबरला सकाळी ८.३० वाजता रॅलीचे आयोजन केलेले आहे. सदर रॅलीचे उद्घाटन डॉ.देवेंद्र पातुरकर, जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय भंडारा यांच्या हस्ते होणार आहे. तसेच सामान्य रुग्णालय, भंडारा येथे शाहीर ब्रम्हानंद हुमणे बहुउद्देशिय कला पथक, धामणी, जिल्हा भंडारा यांचे जागतिक मधुमेह दिवस संबंधित जनजागृती व कलापथक व चलचित्राद्वारे मधुमेहाविषयी तज्ज्ञ लोकांचे मार्गदर्शन व माहिती दाखविण्यात येतील.जागतिक मधुमेह दिनानिमित्त मधुमेह रुग्णांची तपासणी व त्यामुळे होणारे धोके यावर मार्गदर्शन व उपचार तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून केले जातील तसेच सूरज नेत्र चिकित्सा नागपूर यांच्या वतीने रुग्णांची विशेष तपासणी करण्यात येणार आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे दि. १४ नोव्हेंबर रोजी आयोजित केलेले आहे. मधुमेह रुग्णांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे जिल्हा शल्य चिकित्सक देवेंद्र पातुरकर यांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)