शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

दहा महिन्यात 243 अपघातात जिल्ह्यात 117 जणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 05:00 IST

भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासह इतर राज्यमार्गावर दररोज कुठे ना कुठे अपघाताची नोंद होते. जिल्ह्यात सर्वाधिक अपघात दुचाकीचे असल्याचे दिसून येते. बहुतांश अपघात समोरील वाहनांना ओव्हरटेक करताना झाल्याचे दिसून येते. नियमांचे पालन न करता अनियंत्रीत वेगाने वाहन चालविणेही अपघाताचे मुख्य कारण आहे. दुचाकीच्या अपघातात हेल्मेट नसणे आणि मोबाईलवर बोलणे हे मुख्य कारण आहे.

ठळक मुद्दे२२३ जखमी : लाॅकडाऊननंतर अपघातांची संख्या घटली

  लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :  अनियंत्रीत वेगाने वाहन चालविणे आणि नियमांचे उल्लंघन केल्याने जिल्ह्यात दहा महिन्यात २४३ अपघातांची नोंद झाली असून त्यात ११७ जणांना आपला जीव गमवावा लागला तर २२३ जण गंभीर जखमी झाले. विशेष म्हणजे कोरोना लाॅकडाऊननंतर जिल्ह्यात अपघातांची संख्या घटली असुन एप्रिल महिन्यात तर केवळ ९ अपघातांची नोंद झाली होती.
भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासह इतर राज्यमार्गावर दररोज कुठे ना कुठे अपघाताची नोंद होते. जिल्ह्यात सर्वाधिक अपघात दुचाकीचे असल्याचे दिसून येते. बहुतांश अपघात समोरील वाहनांना ओव्हरटेक करताना झाल्याचे दिसून येते. नियमांचे पालन न करता अनियंत्रीत वेगाने वाहन चालविणेही अपघाताचे मुख्य कारण आहे. दुचाकीच्या अपघातात हेल्मेट नसणे आणि मोबाईलवर बोलणे हे मुख्य कारण आहे. जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यात जिल्ह्यात २४३ अपघाताची नोंद झाली. त्यात तब्बल १२० अपघात दुचाकीचे आहेत. या अपघातात ११७ व्यक्तींचा बळी गेला. तर २२३ व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत. 
जिल्हा पोलीस दलासह वाहतूक शाखेच्या वतीने अपघात टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. अपघात प्रवण स्थळांची ओळख पटुन ब्लॅकस्पाॅट तयार करण्यात आले आहेत. जिल्ह्यात ३६ ब्लॅकस्पाॅट असून या ठिकाणी अपघात होऊ नये म्हणून उपाययोजना केल्या जात आहेत. वर्दळीच्या ठिकाणी आणि शाळा महाविद्यालयांसमोर गतीरोधकांची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र यानंतरही नागरिक नियमांचे पालन करताना दिसत नाही. त्यामुळे प्रामुख्याने अपघात होतात. मद्य प्राशन करुन वाहन चालविल्याने अपघाताचे प्रमाणही मोठे आहे. 
जिल्ह्यात जानेवारी, फेब्रुवारी या दोन महिन्यात ७१ अपघातांची नोंद झाली आहे. मात्र मार्च महिन्यापासून कोरोना संसर्ग वाढायला लागला. एप्रिल महिन्यापासून लाॅकडाऊन सुरु झाले. तेव्हापासुन अपघातांची संख्या घटल्याचे दिसते. एप्रिल महिन्यात तर संपुर्ण लाॅकडाऊन होते. या महिन्यात केवळ नऊ अपघात होऊन चौघांचा मृत्यू झाला आणि सात जण जखमी झाले. मे, जून, जुलै या महिन्यातही अपघाताचे प्रमाण कमी दिसून येत आहे. नागरिकांनी नियमांचे पालन केले तर अपघात टाळता येऊ शकतात. परंतु वाहन चालविताना सर्वांनाच विसर पडतो. स्वत:सोबतच इतरांचाही जीव धोक्यात घालतात.

अनियंत्रीत वेगच अपघाताला कारणीभूत
जिल्ह्यात आतापर्यंत घडलेल्या अपघाताला अनियंत्रीत वेगच कारणीभूत असल्याचे पुढे आले आहे. राष्ट्रीय महामार्गावरुन सुसाट वेगाने वाहन चालविले जाते. उजव्या बाजूऐवजी डाव्या बाजूने ओव्हरटेक केले जाते. त्यामुळेही अपघात होतात. दुचाकीच्या अपघातात मोबाईलवर बोलणे आणि हेल्मेटचा वापर न करणे कारण आहे.
 

 

टॅग्स :Accidentअपघात