आज जग एका अत्यंत नाजूक वळणावर उभे आहे. ठिकठिकाणी सुरू असलेली युद्ध, विनाकारण वाढणारे वाद आणि त्यात ओढले जाणारे देश पाहून सर्वसामान्यांच्या मनात भीती निर्माण होणे स्वाभाविक आहे. मात्र, ज्योतिष अभ्यासक यशदा क्षीरसागर यांनी आरजे अधिश यांना दिलेल्या मुलाखतीत युद्धपरिस्थितीबाबत(War Prediction 2026) म्हटले आहे, की या सर्व विद्ध्वंसक घटनांमागे ग्रहांची विशिष्ट चाल कारणीभूत आहे आणि सुदैवाने त्या दोन ग्रहांची 'युती' तुटायचा दिवस जवळ येतोय! नववर्षाच्या सुरुवातीला आहे की नाही ही आनंदाची बातमी? सविस्तर वाचा...
१. अंगारक योग: दोन हट्टी ग्रहांची युती
ज्योतिषशास्त्रात मंगळ हा 'अग्नी' आणि 'ऊर्जेचा' कारक आहे, तर राहू हा 'भ्रम' आणि 'विचित्र घटना' घडवून आणणारा ग्रह मानला जातो. जेव्हा हे दोन्ही ग्रह एकत्र येतात, तेव्हा 'अंगारक योग' निर्माण होतो.
विचित्र स्वभाव: हे दोन्ही ग्रह अत्यंत हट्टी आणि अनाकलनीय आहेत.
मानसिकतेवर परिणाम: ही युती थेट मानवी मानसिकतेवर प्रहार करते, ज्यामुळे विचार करण्याची क्षमता कमी होऊन आक्रमकता वाढते.
गुढीपाडवा २०२६: जन्मतारखेनुसार नववर्षातील यशाचा मार्ग; करा 'हे' छोटे बदल आणि मिळवा अफाट यश
२. जागतिक युद्धावर युतीचे पडसाद
यशदा क्षीरसागर यांनी सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीचे अत्यंत चपखल विश्लेषण केले आहे. त्या म्हणतात-
अकारण संघर्ष: सध्या सुरू असलेले युद्ध हे कोणत्याही मोठ्या कारणाशिवाय सुरु आहेत.
विकोपाला जाणारे वाद: चर्चेने सुटू शकणारे प्रश्नही केवळ हट्टीपणामुळे युद्धापर्यंत पोहोचले आहेत.
विस्तार: एका देशापुरता मर्यादित असलेला वाद आता इतर देशांच्या सहभागामुळे जागतिक रूप धारण करत आहे. ही सर्व लक्षणे मंगळ-राहूच्या नकारात्मक प्रभावाचेच प्रतिबिंब आहेत.
३. एक आशेचा किरण
या सर्व नकारात्मकतेमध्ये यशदा क्षीरसागर यांनी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक शब्द सांगितला आहे— तो म्हणजे 'बदल'.
"२ एप्रिल नंतर हे चित्र बदलेल."
ज्योतिषीय गणितानुसार, २ एप्रिलनंतर या ग्रहांच्या युतीचा प्रभाव ओसरू लागेल. याचा अर्थ असा की:
>> जागतिक स्तरावर सुरू असलेल्या संघर्षात शिथिलता येईल.
>> युद्धावर चर्चेच्या माध्यमातून तोडगा निघण्याची शक्यता निर्माण होईल.
>> लोकांच्या मनातील भीती आणि आक्रमकता कमी होऊन शांततेचे वातावरण तयार होईल.
४. आपण काय करावे?
जोपर्यंत ही युती प्रभावी आहे, तोपर्यंत स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवणे आणि संयम बाळगणे हाच सर्वात मोठा उपाय आहे. अकारण वादात पडणे टाळावे आणि सकारात्मक विचारांची कास धरावी.
Web Summary : Astrologers predict the end of war is near, citing a shift in planetary alignment. The Mars-Rahu conjunction, blamed for global conflicts, is expected to weaken after April 2nd, bringing peace and de-escalation of tensions. People should control anger until then.
Web Summary : ज्योतिषियों के अनुसार, ग्रहों की चाल में बदलाव से युद्ध जल्द खत्म होगा। मंगल-राहु की युति, जिसे वैश्विक संघर्षों का कारण माना जा रहा है, 2 अप्रैल के बाद कमजोर होने की उम्मीद है, जिससे शांति और तनाव कम होगा। लोगों को तब तक क्रोध पर नियंत्रण रखना चाहिए।