Vidurneeti : मोठ्या पदावर जायचे असेल तर विदुरनीतीनुसार 'हे' चार गुण अंगी बाळगा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 07:00 IST2025-11-14T07:00:00+5:302025-11-14T07:00:01+5:30

Vidurneeti: हुशारी असेल तर प्रगती होतेच, पण ती टिकवून त्यात वाढ व्हावी असे वाटत असेल तर चार गुण अंगी बाळगले पाहिजे, असे विदुरनीतीत म्हटले आहे. 

Vidurneeti: If you want to rise to a higher position, adopt these four qualities according to Vidurneeti! | Vidurneeti : मोठ्या पदावर जायचे असेल तर विदुरनीतीनुसार 'हे' चार गुण अंगी बाळगा!

Vidurneeti : मोठ्या पदावर जायचे असेल तर विदुरनीतीनुसार 'हे' चार गुण अंगी बाळगा!

एकसारखे काम, एकसारखी मेहनत, एकसारखा विचार असूनही काही लोक आपल्यापेक्षा पुढे निघून जातात, मग तो अभ्यास, नोकरी असो वा व्यवसाय किंवा अन्य कोणतेही क्षेत्र! सामान्य वाटणारी व्यक्ती असामान्य पदाला जाते, तिथे टिकून राहते आणि उत्तरोत्तर तिची प्रगती होते, ते पाहून तिच्याबद्दल असूया न बाळगता ती व्यक्ती त्यासाठी काय करते ते विदुरांच्या दृष्टिकोनातून जाणून घेऊ. 

Vastu Tips: तिजोरीत स्थिर लक्ष्मी हवी? घरात करा हे ६ बदल, पैसा टिकेल आणि वाढेलही!

महाभारतातील धृतराष्ट्र यांचे अमात्य विदुर यांचे विचार विदुरनीती म्हणून ओळखले जातात. एका अध्यायात त्यांनी पुरुषार्थ जपावा कसा याचे मार्गदर्शन केले आहे. ते एका श्लोकात म्हणतात-

क्रोधो हर्षश्च दर्पश्च ह्रीः स्तम्भो मान्यमानिता।
यमर्थान्नपकर्षन्ति स वै पण्डित उच्यते।। 

सामान्य व्यक्ती ज्या कारणांमुळे असामान्य पदाला जाते, त्या तत्त्वाला पुरुषार्थ म्हणतात. तो जपण्यासाठी मनुष्याला आपल्या स्वभावावर आणि वागणुकीवर नियंत्रण मिळवावे लागते. त्या चार बाबी कोणत्या, तर विदुर सांगतात, रागाच्या भरात आणि आनंदाच्या भरात चुकीचे निर्णय घेतले जातात. ज्याला या चुका टाळायच्या असतील, त्याने मनावर नियंत्रण ठेवून सम दुःख सुखक्षमी अर्थात सुख आणि दुःखात एकसारखी तटस्थ स्थिती ठेवण्याची कला आत्मसात केली पाहिजे. 

कोणत्या देवाची उपासना ठरते शीघ्र फलदायी? प्रेमानंद महाराजांनी दिले चपखल उत्तर!

ह्रीः अर्थात नम्रता. विनम्र व्यक्तीचे काम कधीच अडत नाही. याउलट अहंकारीत व्यक्ती सगळे काही गमावून बसते. म्हणून स्वभावात नम्रपणा आणून आपले काम करवून घेण्याचे कसब अंगी बाणले पाहिजे. परंतु यासाठी लाचारी पत्करणे योग्य नाही. लाचार व्यक्ती कोणत्याही क्षणी लाथाडली जाऊ शकते. जे काम नम्रपणे होऊ शकते ते खुशमस्करी करून पदरात पाडून घेणे योग्य नाही. 

स्वतःबद्दल आत्मविश्वास जरूर बाळगावा, परंतु दुराभिमान नको. स्वतःला श्रेष्ठ समजणे योग्य नाही. मी म्हणेन ती पूर्व असे म्हणत राहिलो तर आपोआप इतरांबद्दल कमीपणा वाटून स्वतः मधील अहंकाराला खतपाणी घातले जाईल. ते टाळले पाहिजे. यासाठी स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवा, स्वतःला कमी लेखू नका पण स्वतःला सर्वेसर्वा समजण्याची चूक करू नका. 

विदुर नीती प्रमाणे या चार गोष्टी लक्षात आचरणात आणून मानाने जगू शकतो आणि जे उच्च स्थान हवे ते प्राप्त करू शकतो.  

Web Title : विदुर नीति: उच्च पद पाने के लिए इन चार गुणों को अपनाएं!

Web Summary : उच्च पद पाने के लिए क्रोध और खुशी को नियंत्रित करें, विनम्र रहें और अहंकार से बचें। अपनी मेहनत पर विश्वास रखें, लेकिन खुद को अधिक न आंकें। ये विदुर नीति सिद्धांत सफलता और सम्मान की ओर ले जाते हैं।

Web Title : Vidur Neeti: Adopt these four qualities for a higher position!

Web Summary : To attain a high position, control anger and happiness, be humble, and avoid arrogance. Believe in your hard work, but don't overestimate yourself. These Vidur Neeti principles lead to success and respect.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.