Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 16:49 IST2025-06-09T16:48:20+5:302025-06-09T16:49:12+5:30
Vat Purnima 2025 Puja Vidhi, Sahitya, Shubh Muhurat: अनेक नववविवाहितांना वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी कशी करावी हे माहीत नसते, त्यांच्यासाठी ही सविस्तर माहिती.

Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
Vat Purnima 2025 Puja Vidhi: ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वट सावित्री व्रत केले जाते. तिलाच वटपौर्णिमेचे व्रत असेही म्हणतात. सौभाग्यवती हे व्रत आयुष्यभर करतात. आपल्या पतीला, मुलांना निरोगी, दीर्घायुष्य लाभावे ही त्यामागे भावना असते. वटवृक्षाची दाट सावली ज्याप्रमाणे सर्वांना आश्वासक वाटते, तशी आपल्या पतीच्या प्रेमाच्या छायेत आयुष्यभर निर्धास्तपणे राहावे अशी प्रत्येक महिलेची अपेक्षा असते. नवरा बायकोचे प्रेम वाढावे यासाठी हे व्रत केले जाते. अलीकडे तरुणींबरोबर तरुणांचाही यात समावेश दिसतो. आपला पती साताजन्माचा सोबती असावा ही जशी पत्नीची अपेक्षा असते, तशीच हीच पत्नी सात जन्म मिळावी म्हणून पतीही वडाची पूजा करतात. नात्यातला हा समजूतदारपणाच धर्म संस्कृतीला अपेक्षित आहे.
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
तर हे व्रत पहिल्यांदा करणाऱ्या सुवासिनींसाठी या व्रताची सविस्तर माहिती जाणून घेऊया. यंदा १० जून रोजी वटपौर्णिमा(Vat Purnima 2025) आहे. हे व्रत करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या महिलांनी पुढीलप्रमाणे तयारी करावी. व्रताला लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे -
व्रतासाठी लागणारे साहित्य(Vat Purnima Puja List):
काळे मणी , सूतगुंडी (पांढरा सुती धागा), आरतीचे ताट, त्यामध्ये धूप, निरांजन, अगरबत्ती, तांदूळ, हळद-कुंकू, खोबऱ्याची वाटी, सुपारी, फुले व पाच फळे, विड्याची पाने, नैवेद्यासाठी गूळ खोबरे, पंचामृत (दूध, दही, तूप, मध, साखर), पाण्याने भरलेला कलश, व्रतकथेची पोथी
शुभ मुहूर्त(Vat Purnima Shubh Muhurta 2025) :
यंदा ज्येष्ठ पौर्णिमा तिथी १० जून रोजी सकाळी ११ वाजून ३५ मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे ११ जून रोजी दुपारी १ वाजून १३ मिनिटांनी संपेल. मात्र व्रताचरणासाठी १० जून रोजी सकाळी ६. ३३ ते १०. २१ हा शुभ मुहूर्त दिला आहे.
व्रत विधी(Vat Purnima Pujavidhi 2025):
- वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. त्यानंतर देवपूजा करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे.
- साडी नेसून सौभाग्य अलंकार घालावेत.
- दिलेले साहित्य घेऊन घराजवळील वटवृक्षाजवळ पूजेसाठी जावे.
- सुपात विड्याची पाच पाने आणि फळं ठेवावीत.
- वडाच्या झाडाजवळ बसून पूजा करावी.
- वडाला हळद कुंकू वाहून वाण ठेवावे आणि सूतगुंडी वडाला बांधून प्रदक्षिणा घालाव्यात.
- पूजा पूर्ण करून पुढील श्लोक म्हणावा -
- वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन:।
- वटाग्रे तु शिवो देव: सावित्री वटसंश्रिता ।।
- तिथे उपस्थित असलेल्या महिलांना हळद कुंकू लावून वाण द्यावे.
- गोरगरिबांना अन्न, वस्त्र किंवा पैसे दान द्यावेत.
- पूर्ण दिवस उपास शक्य नसेल तर निदान पूजा होईपर्यंत काही खाऊ नये आणि पूजा झाल्यावर फळं खावी किंवा फराळ करावा.
- वडाला नमस्कार करून घरातल्या ज्येष्ठ मंडळींना नमस्कार करा.
- तिथे बसून पोथी वाचणे शक्य नसेल तर घरी आल्यावर देवासमोर बसून वटसावित्रीची कथा वाचा.
- वृक्ष लागवडीचा संकल्प करून एखादे तरी रोप लावा.