शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
3
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
4
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
5
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
6
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
7
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
8
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
9
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
10
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
11
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
12
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

वास्तुशास्त्र : छोट्या मोठ्या शारीरिक, मानसिक समस्यांवर खात्रीशीर ठरतील 'या' वास्तूटिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 5:20 PM

घरातील अस्वच्छता रोगराईला कारणीभूत ठरते. एवढेच नाही, तर किरकोळ आजारापासून गंभीर दुखण्यांपर्यंत सारेकाही वास्तूच्या ठेवणीवर अवलंबून असते. 

वास्तुशास्त्रानुसार, अशा अनेक सवयी आहेत ज्या तुम्ही लगेच बदलल्या पाहिजेत. या सवयी रोगांचे कारण बनू शकतात आणि तुम्हाला त्रास सहन करावा लागू शकतो. छोटे छोटे आजार, दुखणी जर तुमचा पाठलाग सोडत नसतील, तर वास्तू शास्त्रात दिलेले किरकोळ बदल करून बघा, तुम्हाला फायदा होईल. 

आपली वास्तू हा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतो. तुम्हाला टापटीप राहायला आवडत असेल तर तुम्ही वास्तू देखील नीटनेटकी आणि स्वच्छ ठेवाल. याउलट तुमची वृत्ती गोंधळलेली असेल, तर तुमचे घर अस्ताव्यस्त, वस्तूंनी गजबजलेले आणि चैतन्यहीन दिसते. घरात आपला वावर प्रसन्न व्हावा, यासाठी ते स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे आहे. घरातील अस्वच्छता रोगराईला कारणीभूत ठरते. एवढेच नाही, तर किरकोळ आजारापासून गंभीर दुखण्यांपर्यंत सारेकाही वास्तूच्या ठेवणीवर अवलंबून असते. 

निद्रानाश : आजच्या काळात निद्रानाश ही अनेकांसाठी मोठी समस्या बनली आहे. लोकांकडे डोक्यावर छत आहे पण डोळ्यावर झोप नाही. त्यामागे दैनंदिन व्यवहारातील अनेक कारणे असू शकतात. परंतु त्यावर प्रसन्न वास्तू हा उतारा आहे. बेडरूम नीटनेटकी, स्वच्छ चादर पांघरलेली, मंद दिव्यांनी सजवलेली असेल तर दिवसभराचा ताण कुठल्याकुठे पळून जाईल व शांत झोप लागेल. यासाठी स्वच्छतेला आणि नीटनेटकेपणाला प्राधान्य द्या. त्याचबरोबर पूर्व दिशेला डोकं ठेवून झोपा. घरातला नळ गळत असेल तर तो वेळीच दुरुस्त करून घ्या. पाण्याचा अपव्यय हे घरातील अशांततेस कारणीभूत ठरते. घरात अशांतता असेल तर निद्रानाश संभवतो. 

डोकेदुखी : घरात पसारा आणि अडगळ ठेवू नका. विशेषतः घराच्या ईशान्य भागात जुन्या वस्तू ठेवणे वास्तुदोषाला कारणीभूत ठरते. घर आवरणे, कपाट लावणे, अनावश्यक वस्तू बाद करणे, नवीन वस्तूंना जागा देणे, या कामांसाठी पंधरा दिवसातून दोन तास राखीव ठेवा. हे काम स्ट्रेस बस्टर सारखे परिणाम करेल आणि कामाबरोबर घराची स्वच्छता होऊन डोकेदुखीचा त्रास होणार नाही. याचप्रमाणे गार्डनिंग हेही डोकेदुखीवर रामबाण इलाज ठरू शकते. घरच्या छोट्याशा बागेत घालवलेला वेळ तुम्हाला नक्कीच आनंद देईल. 

उच्च रक्तदाब : राग, ताणतणाव रक्तदाब वाढण्याला किंवा कमी होण्याला कारणीभूत ठरते. आजच्या काळात फार कमी वयात लोकांना रक्तदाबाचा त्रास होताना आढळतो. यावर उपाय म्हणजे आपल्या घराला प्रयोगशाळा बनवा. छान रंगसंगतीचे पडदे, चादरी, फुले यांनी घराची सजावट करा. लिव्हिंग रूम मध्ये शांत नदीचे किंवा निसर्गाचे सुंदर चित्र लावा. देवघराची आटोपशीर खोली बनवून रोज ध्यानधारणा करा. घरात मंद संगीत सुरू ठेवा. झोपण्यापूर्वी कोणतेही गॅझेट पाहू नका. दक्षिण दिशेला पाय करून झोपू नका. रोज सूर्योदयापूर्वी उठा आणि सूर्यदर्शन घ्या. 

वाढते वजन : घर छोटे असो नाहीतर मोठे, ते स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपण घेतली, की त्यासाठी केलेली प्रत्येक कृती वजन नियंत्रित ठेवायला मदत करेल. त्यासाठी अत्याधुनिक मशीनचा कमीत कमी वापर करा. त्यामुळे शारीरिक हालचाली वाढतील. लिफ्ट ऐवजी जिन्याचा वापर करा. रोज उकिडवे बसून घराचा केर काढा, जमल्यास एका तरी खोलीची नाहीतर स्वयंपाक घराची फरशी ओणवे उभे राहून पुसा. दर आठवड्याला स्वच्छता मोहीम राबवा आणि कानाकोपऱ्यातील जाळी जळमटे काढून टाका. रोज टेबल खुर्ची ऐवजी भारतीय बैठक घालून जेवायला बसण्याचा सराव करा. भारतीय शौचालयाला प्राधान्य द्या. जास्तीच जास्त कामे जमिनीवर बसून करा. उठ बस केल्यामुळे आपोआप व्यायाम होईल आणि लवचिक पणा वाढेल. 

अशा रीतीने आपली वास्तू आपले आरोग्य सांभाळेल, त्यासाठी आपणही आपलया वास्तूची काळजी घेतली पाहिजे. एरव्ही लोक म्हणतात, मनस्थिती बदला, म्हणजे परिस्थिती बदलेल, पण वास्तूच्या बाबतीत सांगायचे, तर परिस्थिती बदला म्हणजे मनस्थिती बदलेल, नाही का? 

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र