शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Vastu Tips: हो! घराला कान असतात आणि मनही! वास्तू खरेदी करताना लक्षात ठेवा 'या' गोष्टी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 11:05 IST

Vastu Shastra: भिंतीला कान असतात, हे खरंय का? वास्तू निवडीपासून त्यात वास्तव्य कारण्यापर्यंत अनेक प्रकारचे खुलासे जाणून घ्या. 

आपण ज्या घरात राहतो, ते घर केवळ विटा-सिमेंटचे बांधकाम नसते, तर ती एक जिवंत उर्जित रचना असते. वास्तुशास्त्रानुसार, घर हे आपल्या प्रत्येक विचाराचा, भावनेचा आणि कृतीचा साक्षीदार असते. घराच्या अवकाशात आपण जे पेरतो, तेच घर आपल्याला परत करत असते. म्हणूनच म्हणतात, घर सतत एकच शब्द उच्चारत असते— “तथास्तू.”

Karmayoga: ज्यांनी तुम्हाला रडवलंय, त्यांना काळ उत्तर देईल; वाचा भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेला कर्मसिद्धांत!

स्पंदने: घराचा अदृश्य श्वास

माणसाच्या मनात निर्माण होणारे क्लेश, वाद किंवा भीती यांतून जड आणि नकारात्मक स्पंदने निर्माण होतात, जी घराच्या कोपऱ्यात साठून राहतात. याउलट, जिथे भक्ती, कृतज्ञता आणि आनंदाचे वातावरण असते, तिथे सूक्ष्म आणि प्रवाही सकारात्मक ऊर्जा खेळती राहते. घरातील वस्तू (फर्निचर, भांडी, कपडे) ही स्पंदने शोषून घेतात, म्हणूनच अनेकदा जुन्या वस्तूंसोबत जुनी अस्वस्थताही नवीन जागी प्रवास करते.

अग्नी आणि मंत्र: ऊर्जा शुद्धीची साधने

वास्तुशास्त्रात होम, हवन आणि यज्ञाला केवळ धार्मिक विधी मानलेले नाही, तर ते ऊर्जा-रूपांतरणाचे सर्वोच्च तंत्र आहे.

अग्नी: हा नकारात्मकतेला सकारात्मकतेत रूपांतरित करणारा स्रोत आहे.

मंत्रोच्चार: हे केवळ शब्द नसून विशिष्ट ध्वनी-तरंग (Sound Frequencies) आहेत, जे घरातील जड स्पंदनांना तोडून टाकतात.

साधना: जिथे नियमित नामस्मरण आणि दीपप्रज्वलन होते, तिथे जडता टिकत नाही. पूजा ही देवासाठी नसून ती वास्तूच्या शुद्धीसाठी असते.

Lord Buddha: तुमचं मन तुमच्या ताब्यात नाही? भगवान बुद्धांचे 'हे' ९ नियम तुमच्यासाठीच आहेत!

कर्म, वास्तू आणि तुमचा सहवास

आपल्याला वाटते की आपण वास्तू निवडतो, मात्र वास्तव तसे नसून ती जागा माणसाला निवडते. ज्या जागेची स्पंदने आपल्या कर्माशी सुसंगत असतात, तिथेच आपल्याला प्रगती आणि शांती मिळते.

कर्मभोग: काही वेळा आपण पूर्वकर्मामुळे विशिष्ट वास्तूत प्रवेश करतो. तिथे मिळणारे त्रास हे कर्मक्षयाचे साधन असू शकतात.

धर्माचा आधार: साधना किंवा जप-तप तुमचे कर्म पूर्णपणे टाळू शकत नाहीत, पण त्या कर्माची धार कमी करतात. ते तुम्हाला भोग सहन करण्याची शक्ती देतात.

Holika Dahan 2026: यंदा होळीत द्या 'या' ८ वस्तूंची आहुती; दारिद्र्य, रोगराई, गृहक्लेशातून मिळेल मुक्ती

घर आनंदी ठेवण्यासाठी ३ सुवर्णनियम

१. भिंती नाही, स्पंदने स्वच्छ ठेवा: केवळ रंगरंगोटीने घर सुंदर होत नाही, घरातील संवाद प्रेमळ असावा.

२. वस्तू नाही, विचार शुद्ध ठेवा: घरातील वस्तूंकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्या वापरण्याची पद्धत सात्त्विक असावी.

३. उपाय नाही, साधना ठेवा: वेळोवेळी केलेले तोडगे तात्पुरते असतात, पण रोजची साधना घराला जिवंत आणि चैतन्यमय ठेवते.

English
हिंदी सारांश
Web Title : Vastu Tips: Home has ears and a mind! Buy wisely.

Web Summary : Home's energy impacts us. Clear negativity with fire rituals and mantras. Harmonize actions with the space for peace. Keep thoughts pure for a lively home.
टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्रHomeसुंदर गृहनियोजनHome Decorationगृह सजावट