Vastu Tips: आर्थिक चणचण असो नाहीतर वास्तू दोष; तुरटीचा छोटा तुकडा बदलेल तुमचे नशीब
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 13:28 IST2026-01-02T13:27:36+5:302026-01-02T13:28:45+5:30
Vastu Tips: घरोघरी फिल्टर आल्यामुळे तुरटीचा वापर आता कोणी फारसा करत नाही, मात्र वास्तू शास्त्रात तुरटीला आजही तेवढेच महत्त्व आहे, त्याचा वापर वाचा.

Vastu Tips: आर्थिक चणचण असो नाहीतर वास्तू दोष; तुरटीचा छोटा तुकडा बदलेल तुमचे नशीब
वास्तू शास्त्रात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्या आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात. त्यापैकीच एक म्हणजे 'तुरटी'. जर तुमच्या आयुष्यात वारंवार आर्थिक अडचणी येत असतील किंवा घरात कटकटी होत असतील, तर तुरटीचे हे सोपे तोडगे तुम्हाला मोठा दिलासा देऊ शकतात.
१. आर्थिक समृद्धी आणि धनलाभासाठी
जर पैसा टिकत नसेल किंवा कर्ज वाढत असेल, तर हा उपाय प्रभावी ठरतो:
एका काळ्या कपड्यात तुरटीचा एक तुकडा बांधा.
हा कपडा घराच्या किंवा दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आतल्या बाजूने लटकवा.
यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही आणि धनागमनाचे मार्ग मोकळे होतात.
२. घरातील कलह आणि वास्तू दोष दूर करण्यासाठी
घरात विनाकारण भांडणे होत असतील किंवा वास्तू दोष जाणवत असेल तर:
घराच्या खिडकीजवळ एका काचेच्या बाऊलमध्ये थोडी तुरटी भरून ठेवा.
दर महिन्याला ही तुरटी बदलून नवीन तुकडा ठेवा.
यामुळे घरातील नकारात्मकता शोषली जाते आणि कौटुंबिक सौहार्द वाढते.
Astro Tips: २०२६ मध्ये प्रगतीचे शिखर गाठायचे आहे? शेंदरी हनुमानाची 'ही' उपासना सुरु करा!
३. व्यवसायातील यशासाठी
जर व्यवसाय मंदावला असेल किंवा गिऱ्हाईक कमी येत असेल तर:
ऑफिस किंवा दुकानाच्या कोपऱ्यात तुरटीचा एक खडा ठेवा.
शनिवारी किंवा मंगळवारी हा उपाय करणे अधिक फलदायी मानले जाते. यामुळे कामातील अडथळे दूर होऊन प्रगती होते.
४. भीतीदायक स्वप्ने किंवा मुलांच्या आरोग्यासाठी
जर कोणाला रात्री दचकून जाग येत असेल किंवा वाईट स्वप्ने पडत असतील:
पांढऱ्या कपड्यात तुरटी बांधून ती उशीखाली ठेवावी.
यामुळे मन शांत राहते आणि शांत झोप लागते.
Vastu Tips: २०२६ मध्ये नशीब सोन्यासारखं चमकेल, फक्त कॅलेंडरच्या प्रत्येक पानावर करा 'हा' छोटा बदल!
५. लादी पुसताना करा वापर
नकारात्मकता घालवण्यासाठी हा सर्वात सोपा मार्ग आहे:
घरात किंवा ऑफिसमध्ये लादी पुसताना (Mop) पाण्यात थोडं मीठ आणि तुरटी पावडर टाका.
यामुळे वातावरणातील जंतूंसोबतच नकारात्मक लहरींचाही नाश होतो.
टीप : सदर माहिती सामान्य गृहीतकांवर आधारित असून, अधिक महितीसाठी त्या विषयातील तज्ञांचे मार्गदर्शन घेणे उचित ठरेल.