शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

Vastu Tips: केवळ शोभेसाठीच नाही, तर नशिबासाठीही! घराच्या भिंतीवर कोणतं चित्र असावं? वाचा वास्तू गुपित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 16:38 IST

Vastu Shastra: सकारात्मकता दूर करून घरात येईल प्रसन्नता! जाणून घ्या घरासाठी ९ महत्त्वाच्या वास्तू पेंटिंग्स

आपल्या घरामध्ये केवळ भिंती आणि फर्निचर नसतं, तर तिथे एक ऊर्जा वास करत असते. वास्तू शास्त्रानुसार, भिंतीवर लावलेली चित्रे किंवा पेंटिंग्स केवळ शोभेच्या वस्तू नसून त्या घराच्या ऊर्जेवर (Vibrations) मोठा प्रभाव टाकतात. योग्य दिशेला लावलेले एक छोटेसे चित्र देखील तुमच्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल घडवू शकते. 

१. धबधबा (Waterfall) - उत्तर दिशावाहते पाणी हे पैशाच्या आणि संधीच्या ओघाचे प्रतीक आहे. घराच्या उत्तर दिशेला धबधब्याचे चित्र लावल्याने घरामध्ये शांतता वाढते आणि आर्थिक मार्ग मोकळे होतात.

२. उगवता सूर्य (Rising Sun) - पूर्व दिशासूर्य हा उर्जेचा स्रोत आहे. पूर्व दिशेला उगवत्या सूर्याचे चित्र लावल्याने घरामध्ये नवीन उत्साह आणि सकारात्मकता येते. यामुळे समाजात मान-सन्मानही वाढतो.

Numeroloy: अंकशास्त्र सांगतंय तुमच्या जन्मतारखेचं गुपित; तुमचं मॅजिकल गिफ्ट तुम्हाला माहित आहे का?

३. सात धावणारे घोडे (Seven Horses) - दक्षिण दिशाधावणारे घोडे हे प्रगती आणि यशाचे प्रतीक आहेत. व्यवसायात किंवा करिअरमध्ये गती हवी असेल, तर दक्षिण भिंतीवर सात घोड्यांचे पेंटिंग लावावे.

४. बांबू (Bamboo) - पूर्व दिशाबांबूचे झाड हे दीर्घायुष्य आणि सातत्यपूर्ण विकासाचे प्रतीक आहे. पूर्व दिशेला बांबूचे चित्र लावल्याने घरातील सदस्यांची प्रगती आणि वैयक्तिक विकास वेगाने होतो.

५. मंडला आर्ट (Mandala) - पश्चिम दिशामंडला आर्ट हे विश्वातील समतोलाचे दर्शन घडवते. पश्चिम दिशेला हे चित्र लावल्याने मनाला स्थिरता मिळते आणि आयुष्यात ताळमेळ (Harmony) राखण्यास मदत होते.

Ram Navami 2026: रामनवमीला मनगटावर बांधा ११ गाठींचा 'हा' धागा; तुमचे आणि कुटुंबाचे होईल संरक्षण!

६. मोर (Peacock) - दक्षिण-पूर्व (आग्नेय)मोर हा सौंदर्यासोबतच समृद्धी आकर्षित करण्यासाठी ओळखला जातो. घराच्या आग्नेय कोपऱ्यात मोराचे चित्र किंवा पिसे लावल्याने ऐश्वर्य आणि संपत्ती वाढते.

७. पर्वत (Mountain) - दक्षिण दिशापर्वत हे स्थिरतेचे प्रतीक आहेत. जीवनात वारंवार येणारे चढ-उतार थांबवण्यासाठी आणि वैभव टिकवून ठेवण्यासाठी दक्षिण दिशेला पर्वताचे चित्र लावणे अत्यंत शुभ मानले जाते.

Chankya Niti: जगात फसवणूक टाळायचीय? मग चाणक्य नीतीनुसार चतुर व्यक्तीची 'ही' १० लक्षणे नक्की शिकून घ्या!

८. बुद्ध (Buddha) - उत्तर-पूर्व (ईशान्य)ईशान्य कोपरा हा देवाचा कोपरा मानला जातो. येथे भगवान बुद्धांचे चित्र किंवा मूर्ती ठेवल्याने मानसिक शांती मिळते आणि घरातील नकारात्मक विचार नष्ट होतात.

९. कुटुंबाचे चित्र (Family Photo) - उत्तर दिशानात्यांमध्ये प्रेम आणि जिव्हाळा टिकवून ठेवण्यासाठी घराच्या उत्तर भिंतीवर कुटुंबाचा हसता-खेळता फोटो लावावा. यामुळे घरातील सदस्यांचे एकमेकांशी असलेले संबंध अधिक घट्ट होतात.

.............................

Lokmatbhakti.com हे Lokmat Media Group द्वारे चालवले जाणारे एक आध्यात्मिक प्लॅटफॉर्म असून येथे कुंडली, अंकशास्त्र, जुळवणी अहवाल आणि वास्तु सल्ला यांसारख्या सेवा उपलब्ध आहेत. या सेवांमधील अहवाल पारंपरिक वैदिक पद्धतींवर आधारित असून ते अनुभवी तज्ञांकडून तपासून तयार केले जातात. त्यामुळे दिल्या जाणाऱ्या माहितीची अचूकता आणि विश्वासार्हता सुनिश्चित केली जाते. याशिवाय, प्लॅटफॉर्मवर प्रकाशित होणारे धार्मिक आणि ज्योतिष विषयक लेख देखील विश्वसनीय संदर्भांवर आधारित असल्याने वाचकांचा विश्वास कायम राखला जातो. 

English
हिंदी सारांश
Web Title : Vastu Tips: Which Pictures on Which Walls for Luck?

Web Summary : Vastu Shastra says pictures impact home energy. Waterfalls in the north boost finances. Sunrise in the east brings positivity. Seven horses in the south enhance career progress. Buddha in the northeast promotes peace. Family photos in the north strengthen bonds.
टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्रHomeसुंदर गृहनियोजन