Vastu Tips: केवळ शोभेसाठीच नाही, तर नशिबासाठीही! घराच्या भिंतीवर कोणतं चित्र असावं? वाचा वास्तू गुपित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 16:38 IST2026-03-24T16:37:00+5:302026-03-24T16:38:26+5:30

Vastu Shastra: सकारात्मकता दूर करून घरात येईल प्रसन्नता! जाणून घ्या घरासाठी ९ महत्त्वाच्या वास्तू पेंटिंग्स

Vastu Tips: Not only for beauty, but also for luck! Which wall of the house should have which picture? Read Vastu Gupit | Vastu Tips: केवळ शोभेसाठीच नाही, तर नशिबासाठीही! घराच्या भिंतीवर कोणतं चित्र असावं? वाचा वास्तू गुपित

Vastu Tips: केवळ शोभेसाठीच नाही, तर नशिबासाठीही! घराच्या भिंतीवर कोणतं चित्र असावं? वाचा वास्तू गुपित

आपल्या घरामध्ये केवळ भिंती आणि फर्निचर नसतं, तर तिथे एक ऊर्जा वास करत असते. वास्तू शास्त्रानुसार, भिंतीवर लावलेली चित्रे किंवा पेंटिंग्स केवळ शोभेच्या वस्तू नसून त्या घराच्या ऊर्जेवर (Vibrations) मोठा प्रभाव टाकतात. योग्य दिशेला लावलेले एक छोटेसे चित्र देखील तुमच्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल घडवू शकते. 

१. धबधबा (Waterfall) - उत्तर दिशा
वाहते पाणी हे पैशाच्या आणि संधीच्या ओघाचे प्रतीक आहे. घराच्या उत्तर दिशेला धबधब्याचे चित्र लावल्याने घरामध्ये शांतता वाढते आणि आर्थिक मार्ग मोकळे होतात.

२. उगवता सूर्य (Rising Sun) - पूर्व दिशा
सूर्य हा उर्जेचा स्रोत आहे. पूर्व दिशेला उगवत्या सूर्याचे चित्र लावल्याने घरामध्ये नवीन उत्साह आणि सकारात्मकता येते. यामुळे समाजात मान-सन्मानही वाढतो.

Numeroloy: अंकशास्त्र सांगतंय तुमच्या जन्मतारखेचं गुपित; तुमचं मॅजिकल गिफ्ट तुम्हाला माहित आहे का?

३. सात धावणारे घोडे (Seven Horses) - दक्षिण दिशा
धावणारे घोडे हे प्रगती आणि यशाचे प्रतीक आहेत. व्यवसायात किंवा करिअरमध्ये गती हवी असेल, तर दक्षिण भिंतीवर सात घोड्यांचे पेंटिंग लावावे.

४. बांबू (Bamboo) - पूर्व दिशा
बांबूचे झाड हे दीर्घायुष्य आणि सातत्यपूर्ण विकासाचे प्रतीक आहे. पूर्व दिशेला बांबूचे चित्र लावल्याने घरातील सदस्यांची प्रगती आणि वैयक्तिक विकास वेगाने होतो.

५. मंडला आर्ट (Mandala) - पश्चिम दिशा
मंडला आर्ट हे विश्वातील समतोलाचे दर्शन घडवते. पश्चिम दिशेला हे चित्र लावल्याने मनाला स्थिरता मिळते आणि आयुष्यात ताळमेळ (Harmony) राखण्यास मदत होते.

Ram Navami 2026: रामनवमीला मनगटावर बांधा ११ गाठींचा 'हा' धागा; तुमचे आणि कुटुंबाचे होईल संरक्षण!

६. मोर (Peacock) - दक्षिण-पूर्व (आग्नेय)
मोर हा सौंदर्यासोबतच समृद्धी आकर्षित करण्यासाठी ओळखला जातो. घराच्या आग्नेय कोपऱ्यात मोराचे चित्र किंवा पिसे लावल्याने ऐश्वर्य आणि संपत्ती वाढते.

७. पर्वत (Mountain) - दक्षिण दिशा
पर्वत हे स्थिरतेचे प्रतीक आहेत. जीवनात वारंवार येणारे चढ-उतार थांबवण्यासाठी आणि वैभव टिकवून ठेवण्यासाठी दक्षिण दिशेला पर्वताचे चित्र लावणे अत्यंत शुभ मानले जाते.

Chankya Niti: जगात फसवणूक टाळायचीय? मग चाणक्य नीतीनुसार चतुर व्यक्तीची 'ही' १० लक्षणे नक्की शिकून घ्या!

८. बुद्ध (Buddha) - उत्तर-पूर्व (ईशान्य)
ईशान्य कोपरा हा देवाचा कोपरा मानला जातो. येथे भगवान बुद्धांचे चित्र किंवा मूर्ती ठेवल्याने मानसिक शांती मिळते आणि घरातील नकारात्मक विचार नष्ट होतात.

९. कुटुंबाचे चित्र (Family Photo) - उत्तर दिशा
नात्यांमध्ये प्रेम आणि जिव्हाळा टिकवून ठेवण्यासाठी घराच्या उत्तर भिंतीवर कुटुंबाचा हसता-खेळता फोटो लावावा. यामुळे घरातील सदस्यांचे एकमेकांशी असलेले संबंध अधिक घट्ट होतात.

.............................

Lokmatbhakti.com हे Lokmat Media Group द्वारे चालवले जाणारे एक आध्यात्मिक प्लॅटफॉर्म असून येथे कुंडली, अंकशास्त्र, जुळवणी अहवाल आणि वास्तु सल्ला यांसारख्या सेवा उपलब्ध आहेत. या सेवांमधील अहवाल पारंपरिक वैदिक पद्धतींवर आधारित असून ते अनुभवी तज्ञांकडून तपासून तयार केले जातात. त्यामुळे दिल्या जाणाऱ्या माहितीची अचूकता आणि विश्वासार्हता सुनिश्चित केली जाते. याशिवाय, प्लॅटफॉर्मवर प्रकाशित होणारे धार्मिक आणि ज्योतिष विषयक लेख देखील विश्वसनीय संदर्भांवर आधारित असल्याने वाचकांचा विश्वास कायम राखला जातो.
 

Web Title : वास्तु टिप्स: भाग्य के लिए दीवारों पर कौन सी तस्वीरें लगाएं?

Web Summary : वास्तु शास्त्र के अनुसार, तस्वीरें घर की ऊर्जा को प्रभावित करती हैं। उत्तर में झरने वित्त को बढ़ावा देते हैं। पूर्व में सूर्योदय सकारात्मकता लाता है। दक्षिण में सात घोड़े करियर में उन्नति करते हैं। ईशान कोण में बुद्ध शांति को बढ़ावा देते हैं। उत्तर में पारिवारिक तस्वीरें बंधन मजबूत करती हैं।

Web Title : Vastu Tips: Which Pictures on Which Walls for Luck?

Web Summary : Vastu Shastra says pictures impact home energy. Waterfalls in the north boost finances. Sunrise in the east brings positivity. Seven horses in the south enhance career progress. Buddha in the northeast promotes peace. Family photos in the north strengthen bonds.