Vastu Tips: प्रत्येकाच्या घरात गणेश मूर्ती असतेच, पण ती चुकीच्या दिशेला तर ठेवली नाही ना? आजच तपासून बघा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 16:24 IST2026-03-05T16:19:22+5:302026-03-05T16:24:43+5:30
Vastu Tips: आपल्या घरात गणपतीची मूर्ती असते, पण तिचे पावित्र्य जपत वास्तुशास्त्राचे नियम पाळले असता मिळते सुख समृद्धी!

Vastu Tips: प्रत्येकाच्या घरात गणेश मूर्ती असतेच, पण ती चुकीच्या दिशेला तर ठेवली नाही ना? आजच तपासून बघा!
वास्तुशास्त्रानुसार घरात देवाची मूर्ती किंवा फोटो ठेवताना काही विशिष्ट नियम पाळणे अत्यंत महत्त्वाचे असते. गणपती हा अडथळे दूर करणारा (विघ्नहर्ता) मानला जातो, परंतु त्याच्या मूर्तींच्या संख्येबाबत वास्तुशास्त्रात महत्त्वाचे संकेत दिले आहेत. ६ मार्च रोजी हिंदू वर्षातील शेवटची संकष्ट चतुर्थी(Sankashti Chaturthi 2026) आहे, त्यानिमित्त दिलेले वास्तु नियम वाचा आणि आवश्यकतेनुसार बदल करा.
अनेकांना बाप्पाबद्दल असलेल्या प्रेमापोटी घरात वेगवेगळ्या स्वरूपातील गणपतीच्या मूर्ती गोळा करण्याची आवड असते. मात्र, वास्तुशास्त्रानुसार मूर्तींची संख्या आणि त्यांची दिशा चुकल्यास घरात नकारात्मकता येऊ शकते.
१. मूर्तींची संख्या किती असावी?
वास्तुशास्त्रानुसार, घराच्या देवघरात गणपतीची केवळ एकच मूर्ती असणे सर्वात शुभ मानले जाते.
दोन मूर्ती: जर तुम्हाला दोन मूर्ती ठेवायच्या असतील, तर त्या कधीही एकमेकांसमोर किंवा पाठ करून ठेवू नका.
तीन मूर्ती: वास्तुशास्त्रात 'तीन' ही संख्या गणपतीच्या मूर्तींसाठी अत्यंत अशुभ मानली जाते. एकाच ठिकाणी किंवा एकाच घरात तीन गणपती असल्यास घरातील कामात अडथळे येतात आणि मानसिक शांतता भंग पावते.
६ मार्च विशेष योग: पर्समध्ये ठेवा 'हे' पान; पैशाला पैसा जोडला जाईल आणि हॉस्पिटलच्या फेऱ्या थांबतील!
२. सोंड कोणत्या बाजूला असावी?
डाव्या बाजूची सोंड (वाममुखी गणपती): घरगुती पूजेसाठी डाव्या बाजूला सोंड असलेली मूर्ती सर्वोत्तम मानली जाते. ही मूर्ती शांतता, आनंद आणि समृद्धीचे प्रतीक आहे.
उजव्या बाजूची सोंड (सिद्धिविनायक): उजव्या बाजूची सोंड असलेल्या गणपतीची पूजा करणे कठीण असते आणि त्याचे नियम कडक असतात. म्हणून, संसारी माणसाने डाव्या सोंडेचा गणपती ठेवावा.
Soul Science: मी श्रीमंत घरात का जन्माला आलो नाही? मनाला सलणाऱ्या या प्रश्नाचे उत्तर मिळवा!
३. मूर्तीची दिशा कोणती असावी?
बाप्पाची मूर्ती ठेवण्यासाठी उत्तर, ईशान्य किंवा पूर्व दिशा सर्वात उत्तम मानली जाते. गणपतीचे तोंड दक्षिण दिशेला कधीही नसावे.
बाप्पाची पाठ घराच्या कोणत्याही मुख्य भागाकडे नसावी, कारण गणपतीच्या पाठीमागे 'दारिद्र्य' वस्ती करते असे मानले जाते. मूर्ती नेहमी भिंतीला लागून असावी.
४. मूर्तीचे स्वरूप कसे असावे?
बसलेला गणपती (बैठकीचा): घरासाठी नेहमी बसलेल्या स्वरूपातील गणपतीची मूर्ती निवडा. यामुळे घरात लक्ष्मी स्थिर राहते.
धातू किंवा माती: शक्यतो मातीची, चांदीची किंवा पितळाची मूर्ती पूजेसाठी वापरावी. प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती पूजेसाठी टाळावी.
Numerology: आयुष्यात नक्की काय करायचंय? अंकशास्त्राच्या मदतीने शोधा तुमच्या जीवनाचं खरं ध्येय!
हे टाळा (Vastu Tips):
तुटलेली किंवा खंडित झालेली मूर्ती घरात ठेवू नका.
बेडरूममध्ये किंवा बाथरूमच्या भिंतीला लागून गणपतीची मूर्ती ठेवू नका.
पायऱ्यांखाली देवघर किंवा गणपतीची मूर्ती बसवू नका.