वास्तुशास्त्रानुसार झाडू हा केवळ घर स्वच्छ करण्याचे साधन नसून तो 'लक्ष्मीचे प्रतीक' मानला जातो. झाडूच्या योग्य वापरामुळे आणि ठेवणीमुळे घरात सकारात्मकता येते, तर चुकीच्या पद्धतीमुळे दारिद्र्य ओढवू शकते. प्रसिद्ध ज्योतिषी शिरीष कुलकर्णी यांनी झाडूच्या बाबतीत काही अत्यंत महत्त्वाचे नियम सांगितले आहेत, त्यावर आधारित हा लेख!
अनेकांना वाटते की झाडू कुठेही ठेवला तरी चालतो, पण ज्योतिषशास्त्रानुसार झाडूची दिशा आणि तो ठेवण्याची पद्धत तुमच्या आर्थिक स्थितीवर थेट परिणाम करते. झाडूचा अपमान म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मीचा अपमान मानला जातो. म्हणूनच, ज्योतिषी शिरीष कुलकर्णी यांनी सांगितलेले हे नियम प्रत्येकाने पाळायला हवेत.
झाडू कधी खरेदी करावा आणि कधी फेकावा?
खरेदीसाठी शुभ वार: नवीन झाडू खरेदी करायचा असेल, तर तो बुधवारी किंवा शुक्रवारी खरेदी करावा. हे दोन्ही वार लक्ष्मी आणि कुबेराशी संबंधित असल्याने शुभ मानले जातात.
जुना झाडू कधी टाकावा: जर झाडू जुना झाला असेल किंवा तुटला असेल, तर तो शनिवारी घराबाहेर काढावा. शनिवारी जुनी वास्तू किंवा घरातील कचरा (अडगळ) बाहेर काढणे शुभ असते.
झाडू कोणत्या दिशेला ठेवावा?
झाडूच्या दिशेचा वास्तूवर मोठा परिणाम होतो:
वर्ज्य दिशा: झाडू कधीही ईशान्य (North-East) कोपऱ्यात ठेवू नका. ही दिशा देवदेवतांची मानली जाते, तिथे झाडू ठेवल्याने घरातील बरकत जाते.
योग्य दिशा: झाडू नेहमी दक्षिण (South) किंवा पश्चिम (West) दिशेला ठेवावा.
गुप्त ठेवा: झाडू कधीही उघड्यावर किंवा येणाऱ्या-जाणाऱ्या व्यक्तीच्या नजरेस पडेल असा ठेवू नये. तो नेहमी लपवून किंवा कोणाच्याही दृष्टीस पडणार नाही अशा जागी ठेवावा.
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक असतात नशिबाचे धनी; आयुष्यभर लाभतं अमाप सुख-समाधान!
झाडू ठेवण्याची योग्य स्थिती
शिरीष कुलकर्णी यांच्या मते, झाडू कसा ठेवला आहे यालाही तितकेच महत्त्व आहे:
आडवा झाडू: झाडू नेहमी आडवा करून ठेवावा. असे करणे अत्यंत शुभ मानले जाते.
उभा झाडू टाळा: झाडू कधीही भिंतीला टेकवून उभा ठेवू नये. उभ्या झाडूमुळे घरात पैसा टिकत नाही.
उलटा झाडू: झाडू कधीही उलटा (केर काढायचा भाग वर करून) ठेवू नका. असे केल्याने घरात विनाकारण वादविवाद आणि भांडणे होतात.
February Grahan 2026: १५ दिवसांत दोन मोठी ग्रहणं! दुर्मिळ योग; चुकूनही करू नका 'या' चुका!
इतर काही महत्त्वाचे नियम:
१. पायाचा स्पर्श टाळा: झाडूला कधीही पाय लावू नका किंवा तो ओलांडून जाऊ नका.२. सायंकाळी केर काढू नका: सूर्यास्तानंतर घराचा झाडू काढणे टाळावे, यामुळे लक्ष्मी घरातून बाहेर जाते असे मानले जाते.
Web Summary : According to Vastu Shastra, the broom symbolizes Lakshmi. Buy it on Wednesday or Friday. Discard old brooms on Saturday. Always keep it hidden in the South or West direction, horizontally. Avoid placing it in the North-East. Never touch it with your feet or sweep at dusk.
Web Summary : वास्तु शास्त्र के अनुसार, झाड़ू लक्ष्मी का प्रतीक है। इसे बुधवार या शुक्रवार को खरीदें। पुराने झाड़ू को शनिवार को बाहर निकालें। हमेशा इसे दक्षिण या पश्चिम दिशा में छिपाकर क्षैतिज रूप से रखें। उत्तर-पूर्व में रखने से बचें। कभी भी पैर न लगाएं और शाम को न झाड़ू लगाएं।