Vastu Shastra: दुःखं, आजार आणि आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी तुळशीजवळ दिवा लावताना म्हणा 'हे' दोन श्लोक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 13:14 IST2022-07-14T13:14:19+5:302022-07-14T13:14:44+5:30
Vastu Shastra: दररोज तुळशीची पूजा करणाऱ्या व्यक्तीला धन, सुख आणि समृद्धी प्राप्त होते. आरोग्य चांगले राहते. म्हणून दिवसातले काही क्षण तुळशीच्या सान्निध्यात काढावेत.

Vastu Shastra: दुःखं, आजार आणि आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी तुळशीजवळ दिवा लावताना म्हणा 'हे' दोन श्लोक!
तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मात पूजनीय मानले जाते. या कारणास्तव तुळशीचे रोप बहुतेक घरांमध्ये आढळते. वेद-शास्त्र तसेच वास्तुशास्त्रात तुळशी रो पाला अतिशय महत्त्व आहे. वेदांमध्ये तुळशीच्या रोपाची पूजा करण्याची अनेक कारणे सांगितली आहेत. तुळशीला वृंदा असेही म्हणतात. नैवेद्यातही आपण तुळशीचे पान ठेवून देवाला नैवेद्य अर्पण करतो. असे म्हणतात, की वैकुंठ हे स्वर्गाचे प्रवेशद्वार किंवा भगवान विष्णूचे निवासस्थान आहे. तिथे जाण्यासाठी अर्थात मोक्षप्राप्तीसाठी शेवटच्या क्षणीही तोंडावर तुळशीची पाने ठेवली जातात. शांती आणि समृद्धीसाठी दररोज तुळशीची पूजा केली जाते.
वास्तूनुसार तुळस वास्तुदोष दूर करण्यास मदत करते. तुळशीची पूजा केल्यानंतर परिक्रमा करणे फायदेशीर मानले जाते. असे केल्याने मनातील वाईट विचार आणि नकारात्मकता दूर होण्यास मदत होते. तुळशीपूजेबाबत वास्तुशास्त्रात अनेक नियम आणि मंत्र सांगितले आहेत. तुळशीला पाणी घालण्यापासून ते तुळशीचे पान तोडण्यापर्यंत तिची पूजा करताना कोणता मंत्र जप करावा. त्याचे तपशीलवार वर्णन केले आहे. त्याचप्रमाणे, जर एखाद्या व्यक्तीला धनप्राप्तीसह प्रत्येक क्षेत्रात यश मिळवायचे असेल, तर तुळशीच्या रोपाची पूजा करताना हे दोन दिव्य मंत्र जरूर म्हणावेत.
असे म्हणतात, की दररोज तुळशीची पूजा करणाऱ्या व्यक्तीला धन, सुख आणि समृद्धी प्राप्त होते. आरोग्य चांगले राहते. म्हणून दिवसातले काही क्षण तुळशीच्या सान्निध्यात काढावेत. तसेच पूजेच्या वेळी पुढील मंत्र अवश्य म्हणावेत.
१. तुळशी स्तुति मंत्र :
देवी त्वं निर्मिता पूर्वमर्चितासि मुनीश्वरैः
नमो नमस्ते तुलसी पापं हर हरिप्रिये।।
तुलसी श्रीर्महालक्ष्मीर्विद्याविद्या यशस्विनी।
धर्म्या धर्मानना देवी देवीदेवमन: प्रिया।।
लभते सुतरां भक्तिमन्ते विष्णुपदं लभेत्।
तुलसी भूर्महालक्ष्मी: पद्मिनी श्रीर्हरप्रिया।।
२. तुळशी नामाष्टक मंत्र
वृंदा वृंदावनी विश्वपूजिता विश्वपावनी।
पुष्पसारा नंदनीय तुलसी कृष्ण जीवनी।।
एतभामांष्टक चैव स्त्रोतं नामर्थं संयुतम।
य: पठेत तां च सम्पूज्य सौश्रमेघ फलंलमेता।।