शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
4
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
5
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
6
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
7
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
8
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
9
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
10
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
11
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
12
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
13
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
14
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
15
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
16
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
17
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
18
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
19
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
20
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी

Sankashti Chaturthi May 2022: वैशाख संकष्ट चतुर्थी: ‘असे’ करा गणपती बाप्पाचे विशेष व्रत; पाहा, महत्त्व आणि चंद्रोदय वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 5:05 AM

Vaishakh Sankashti Chaturthi May 2022: आज वैशाख महिन्यातील संकष्टी चतुर्थी असून, तुमच्या शहरातील चंद्रोदय वेळ आणि काही मान्यता जाणून घ्या...

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥ कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाच्या पूजनाने होते. हाती घेतलेले कार्य निर्विघ्नपणे पार पडावे, यासाठी बाप्पाला प्रार्थना केली जाते. गणपती बाप्पाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक गणेश व्रते करतात. प्रत्येक मराठी महिन्यातील शुद्ध आणि वद्य पक्षात येणाऱ्या चतुर्थीला गणपती व्रत केले जाते. यातील वद्य पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी (Sankashti Chaturthi 2022) व्रत करण्याची प्राचीन परंपरा सुरू आहे. मे महिन्यातील वैशाख संकष्ट चतुर्थीचा शुभ मुहूर्त, विविध शहरांमधील चंद्रोदय वेळा आणि व्रतपूजनाची सोपी पद्धत जाणून घ्या... (Vaishakh Sankashti Chaturthi May 2022 Date)

वैशाख संकष्ट चतुर्थी: गुरुवार, १९ मे २०२२

वैशाख वद्य चतुर्थी प्रारंभ: गुरुवार, १९ मे २०२२ रोजी रात्रौ ८ वाजून २५ मिनिटे.

वैशाख वद्य चतुर्थी समाप्ती: शुक्रवार, २० मे २०२२ रोजी सायंकाळी ०५ वाजून २९ मिनिटे.

भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची परंपरा आहे. संकष्ट चतुर्थी व्रत प्रदोष काळी केले जाते. तसेच यामध्ये चंद्रोदय आणि चंद्रदर्शन महत्त्वाचे असल्यामुळे वैशाख महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे व्रताचरण आणि पूजन गुरुवार, १९ मे २०२२ रोजी करावे, असे सांगितले जाते. प्रत्येक संकष्टीला गणेशभक्त आपापल्या परिने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत-पूजत असतात. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. संकष्टीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदाचे फुल आणि दुर्वांची जुडी अर्पण करतो. कारण या दोन्ही गोष्टी बाप्पाला प्रिय असतात. परंतु या दोन्ही गोष्टी उपलब्ध नसतील तर पर्याय म्हणून तुळशी दल बाप्पाला वाहू नये. एकवेळ हात जोडून मनोभावे नमस्कार करावा पण तुळशी कदापि वाहू नये असे शास्त्र सांगते. 

असे करावे संकष्ट चतुर्थीचे व्रत 

संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करते वेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे. यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूप, दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य  द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दूर्वा वाहून उपवास सोडावा. (Vaishakh Sankashti Chaturthi May 2022 Chandrodaya Timing)

विविध शहरांतील चंद्रोदय वेळ

शहरांची नावेचंद्रोदयाची वेळ
मुंबईरात्रौ १० वाजून ४७ मिनिटे
ठाणेरात्रौ १० वाजून ४७ मिनिटे
पुणेरात्रौ १० वाजून ४२ मिनिटे
रत्नागिरीरात्रौ १० वाजून ४१ मिनिटे
कोल्हापूररात्रौ १० वाजून ३६ मिनिटे
सातारारात्रौ १० वाजून ३९ मिनिटे
नाशिकरात्रौ १० वाजून ४६ मिनिटे
अहमदनगररात्रौ १० वाजून ४० मिनिटे
धुळेरात्रौ १० वाजून ४४ मिनिटे
जळगावरात्रौ १० वाजून ४१ मिनिटे
वर्धारात्रौ १० वाजून २७ मिनिटे
यवतमाळरात्रौ १० वाजून २९ मिनिटे
बीडरात्रौ १० वाजून ३५ मिनिटे
सांगलीरात्रौ १० वाजून ३५ मिनिटे
सावंतवाडीरात्रौ १० वाजून ३६ मिनिटे
सोलापूररात्रौ १० वाजून ३१ मिनिटे
नागपूररात्रौ १० वाजून २६ मिनिटे
अमरावतीरात्रौ १० वाजून ३१ मिनिटे
अकोलारात्रौ १० वाजून ३४ मिनिटे
औरंगाबादरात्रौ १० वाजून ३९ मिनिटे
भुसावळरात्रौ १० वाजता ४० मिनिटे
परभणीरात्रौ १० वाजून ३२ मिनिटे
नांदेडरात्रौ १० वाजून २९ मिनिटे
उस्मानाबादरात्रौ १० वाजून ३२ मिनिटे
भंडारारात्रौ १० वाजून २४ मिनिटे
चंद्रपूररात्रौ १० वाजून २३ मिनिटे
बुलढाणारात्रौ १० वाजून ३७ मिनिटे
मालवणरात्रौ १० वाजून ३८ मिनिटे
पणजीरात्रौ १० वाजून ३५ मिनिटे
बेळगावरात्रौ १० वाजून ३३ मिनिटे
इंदौररात्रौ १० वाजून ४४ मिनिटे
ग्वाल्हेररात्रौ १० वाजून ४३ मिनिटे

 

टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थीganpatiगणपती