उत्पत्ती एकादशी २०२५: नशिबात जे नाही तेही मिळवायचे असेल तर काय करावे? प्रेमानंद महाराजांनी दिले उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 12:30 IST2025-11-15T12:28:46+5:302025-11-15T12:30:14+5:30
Utpatti Ekadashi 2025: आज उत्पत्ती एकादशीच्या मुहूर्तावर प्रेमानंद महाराजांचे मार्गदर्शन तुम्हाला उपयोगी ठरेल आणि परमार्थ साधून जीवनही सुखी होईल.

उत्पत्ती एकादशी २०२५: नशिबात जे नाही तेही मिळवायचे असेल तर काय करावे? प्रेमानंद महाराजांनी दिले उत्तर
मनुष्याच्या मनात अनेकदा प्रश्न येतो की, कर्म आणि नशीब यांच्या पलीकडे जाऊन आपल्याला हवे असलेले ध्येय कसे साध्य करावे? ज्या गोष्टी आपल्या भाग्यात लिहिलेल्या नाहीत, त्या मिळवण्यासाठी काय उपाय आहेत? याच गहन प्रश्नाचे उत्तर देताना वृंदावन येथील प्रसिद्ध अध्यात्मिक वक्ते प्रेमानंद महाराजांनी अत्यंत सोपा आणि प्रभावी मार्ग सांगितला आहे. नशिबाला दोष न देता, जीवनात अलौकिक सुख आणि अंतिम समाधान म्हणजेच ईश्वरप्राप्ती कशी करावी, याबद्दल महाराजांनी केलेले मार्गदर्शन प्रत्येक साधकासाठी प्रेरणादायी आहे.
सूर्य गोचर २०२५: १६ नोव्हेंबर, बुधादित्य योगात 'या' ७ राशींच्या व्यक्तिमत्त्वाला मिळेल नवी झळाळी!
१. भगवंताचा 'नाम जप' करा :
महाराज सांगतात की, जीवनातील कोणत्याही मोठ्या संकटावर मात करण्याची किंवा नशिबाची दिशा बदलण्याची क्षमता केवळ भगवंताच्या नामात आहे. दररोज नित्यनियमाने नाम जप करणे, हे साधे वाटणारे कृत्य तुमच्या मनाला स्थिरता देते आणि तुम्हाला आध्यात्मिक बळ प्रदान करते. परमेश्वराच्या नावाचे स्मरण तुमच्या सभोवतालचे नकारात्मक वातावरण दूर करते आणि नशिबात नसलेल्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेली सकारात्मक ऊर्जा व दृढ संकल्पना निर्माण करते. नामजप हा थेट परमेश्वराशी जोडणारा सोपा आणि प्रभावी मार्ग आहे.
२. महिन्यातून दोनदा 'एकादशी व्रत' करा:
प्रेमानंद महाराज भक्तांना महिन्यातून दोनदा येणाऱ्या एकादशीचे व्रत नियमितपणे करण्याचे विशेष आवाहन करतात. कारण, एकादशी हे व्रत केवळ उपास किंवा धार्मिक विधी नाही, तर ते आत्म-शुद्धीचे सर्वात मोठे साधन आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार, एकादशीचा दिवस भगवान विष्णूंना समर्पित आहे. या दिवशी व्रत केल्याने शारीरिक आणि मानसिक शुद्धि होते. एकादशीला केलेले व्रत आणि प्रार्थना, इतर दिवशी केलेल्या व्रतांपेक्षा हजार पटीने अधिक फळ देते. हे व्रत मनुष्याला भोग आणि आसक्तीपासून दूर ठेवून, भगवंताच्या चरणी लीन होण्याची संधी देते, ज्यामुळे जीवनातील अडथळे दूर होतात आणि भाग्यात नसलेल्या गोष्टी प्राप्त करण्याची क्षमता वाढते.
Vastu Tips: तिजोरीत स्थिर लक्ष्मी हवी? घरात करा हे ६ बदल, पैसा टिकेल आणि वाढेलही!
३. सत्याची कास कधीही सोडू नका :
महाराजांच्या मते, बाह्य साधनांसोबतच सत्याच्या मार्गावर ठाम राहणे आवश्यक आहे. कोणताही स्वार्थ साधण्यासाठी सत्याचा त्याग करू नका. सत्य हे परमेश्वराचे रूप आहे. जो सत्यनिष्ठ राहतो, त्याचे मन शुद्ध राहते आणि अशा व्यक्तीला भगवंताचे आशीर्वाद नेहमी प्राप्त होतात. सत्याच्या बळावर तुम्ही मोठमोठी संकटे लीलया पार करू शकता आणि नशिबापेक्षाही मोठे यश मिळवू शकता.
४. देवावर आणि भक्तीवर दृढ विश्वास ठेवा:
प्रेमानंद महाराज सांगतात की, यश मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा आधार म्हणजे तुमचा देवावर आणि तुमच्या भक्तीवर असलेला अढळ विश्वास. तुम्ही करत असलेल्या नामजपाला आणि व्रताला योग्य फळ तेव्हाच मिळते, जेव्हा तुमच्या मनात जराही संशय नसतो. 'मी जे काही करत आहे, ते परमेश्वराच्या प्राप्तीसाठी करत आहे' ही भावना आणि विश्वास तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे घेऊन जातो.
Utpatti Ekadashi 2025: भगवान विष्णुंना कमळ प्रिय आहेच; पण 'या' ८ फुलांबद्दल माहितीय का?
नशिबात नसलेले सुख आणि ईश्वरप्राप्तीचे फळ :
या चार मार्गांचे पालन केल्यास, प्रेमानंद महाराज खात्री देतात की, साधकाला केवळ नशिबात नसलेले सगळी सुखं (भौतिक आणि मानसिक) प्राप्त होतील असे नाही, तर जीवनाचे अंतिम ध्येय असलेली ईश्वरप्राप्ती देखील साध्य होईल. नाम जप, एकादशी व्रत, सत्य आणि भक्तीवरील विश्वास या चार स्तंभांच्या आधाराने आपले जीवन परमार्थमय बनते, ज्यामुळे नशिबाची बंधने तुटतात आणि मनुष्य जीवनात खरी शांती व आनंद मिळवतो.