Utpatti Ekadashi 2025: भगवान विष्णुंना कमळ प्रिय आहेच; पण 'या' ८ फुलांबद्दल माहितीय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 07:00 IST2025-11-15T07:00:00+5:302025-11-15T07:00:02+5:30

Utpatti Ekadashi 2025: आज उत्पत्ति एकादशी, त्यानिमित्त आपण उपासाबरोबरच भगवान विष्णुंना आवडणारी उपासना आणि ८ पुष्प याबद्दल जाणून घेणार आहोत.

Utpatti Ekadashi 2025: Lord Vishnu loves lotus; but do you know about these 8 flowers? | Utpatti Ekadashi 2025: भगवान विष्णुंना कमळ प्रिय आहेच; पण 'या' ८ फुलांबद्दल माहितीय का?

Utpatti Ekadashi 2025: भगवान विष्णुंना कमळ प्रिय आहेच; पण 'या' ८ फुलांबद्दल माहितीय का?

आज उत्पत्ति एकादशी(Utpatti Ekadashi 2025) आहे. त्यानिमित्त भगवान विष्णुंना प्रिय असलेले कमळ आणि तुळस तुम्ही अर्पण करत असाल तर त्याबरोबरच आणखी आठ फुलं त्यांच्या आवडीची आहेत. आजच्या एकादशीनिमित्त त्या फुलांबद्दल जाणून घेऊ. 

2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार

बालपणी सुधा मूर्ती यांना त्यांच्या आजोबांनी एक श्लोक शिकवला होता. त्यात, भगवान महाविष्णूंना प्रिय असलेली आठ पुष्पे कोणती, याची माहिती दिली होती. आजोबांनी अर्थासकट सांगितलेला श्लोक सुधा मूर्ती यांच्या बालमनावर ठसला. ती शिकवण आयुष्यभर आपल्या आचरणात आणून सुधा मूर्तींनी विष्णूभक्तीत कायमस्वरूपी आठ पुष्पे अर्पण केली. ती आठ पुष्पे कोणती, ते आपणही जाणून घेऊया.

अहिंसा प्रथमं पुष्पम् पुष्पम् इन्द्रिय निग्रहम् ।
सर्व भूतदया पुष्पम् क्षमा पुष्पम् विशेषत:।
ध्यान पुष्पम् दान पुष्पम् योगपुष्पम् तथैवच।
सत्यम् अष्टविधम् पुष्पम् विष्णु प्रसिदम् करेत।।

अर्थ : जाणते-अजाणतेपणी हिंसा न करणे, अर्थात अहिंसा, हे पहिले पुष्प, मनावर नियंत्रण ठेवणे हे दुसरे पुष्प, सर्वांवर प्रेम करणे हे तिसरे पुष्प, सर्वांना क्षमा करणे हे चौथे पुष्प, दान करणे, ध्यान करणे, योग करणे ही विशेष पुष्प आहेत. आणि नेहमी खरे बोलणे, सत्याची कास धरणे हे आठवे पुष्प आहे. जो भक्त भगवान महाविष्णूंना ही आठ पुष्पे अर्पण करतो, तो त्यांच्या कृपेस पात्र होतो. 

उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!

ही सर्व पुष्पे कुठे सापडतील? 

तर आपल्या देहरूपी वाटिकेत! या सर्व गोष्टी आपल्या वागणुकीशी निगडीत आहेत. म्हणून मोठे लोक नेहमी सांगतात, 'आचार बदला, विचार बदलेल.' कोणतीही कृती, विचारपूर्वक केली पाहिजे. आपले विचार चांगले असले, तर हातून वाईट काम, चुकीचे काम घडणारच नाही. कोणावर हात उगारणार नाही, अपशब्द बोलणार नाही, अतिरिक्त माया, संपत्ती गोळा करणार नाही, अनावश्यक गोष्टी साठवणार नाही, मनात कोणाबद्दल द्वेष ठेवणार नाही. कोणाही प्राणीमात्राचा, जीवजीवांचा दु:स्वास करणार नाही. ध्यान, दान, योग याबाबतीत सदैव तत्पर राहेन आणि शाळेतली शिकवण, म्हणजे `नेहमी खरे बोलेन.' 

Utpatti Ekadashi 2025: उत्पत्ती एकादशीला 'या' ६ उपायांनी पापमुक्त व्हा; पाहा पूजाविधी!

मोठं व्यक्तिमत्त्व एका रात्रीत घडत नाही, त्यासाठी मनावर उत्तम संस्कारांचा, विचारांचा पगडा असावा लागतो. सुधा मूर्तींना ते वैभव लाभले. त्यांच्यासारखे आपले चरित्र घडवायचे असेल तर आपणही आपली वैचारिक वाटिका खुलवण्याचा प्रयत्न करूया!

Web Title : उत्पत्ति एकादशी 2025: कमल से परे, विष्णु के 8 पसंदीदा फूल जानिए

Web Summary : उत्पत्ति एकादशी में विष्णु को कमल और तुलसी के अलावा, आठ गुण भी प्रिय हैं जिन्हें फूलों के रूप में दर्शाया गया है। इनमें अहिंसा, आत्म-नियंत्रण, करुणा, क्षमा, दान, ध्यान, योग और सत्य शामिल हैं। इन गुणों को विकसित करने से भगवान विष्णु प्रसन्न होते हैं और आध्यात्मिक विकास होता है।

Web Title : Utpatti Ekadashi 2025: Beyond Lotus, Know Vishnu's 8 Favorite Flowers

Web Summary : Utpatti Ekadashi highlights not just lotus and tulsi for Vishnu, but also eight virtues represented as flowers. These include non-violence, self-control, compassion, forgiveness, charity, meditation, yoga, and truthfulness. Cultivating these virtues pleases Lord Vishnu and leads to spiritual growth.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.