Utpatti Ekadashi 2025: उत्पत्ती एकादशीला 'या' ६ उपायांनी पापमुक्त व्हा; पाहा पूजाविधी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 12:52 IST2025-11-14T12:51:26+5:302025-11-14T12:52:26+5:30
Utpatti Ekadashi 2025: यंदा १५ नोव्हेंबर रोजी उत्पत्ती एकादशी आहे, दिलेल्या उपायांनी लाभ होईल आणि विष्णुकृपा प्राप्त होईल; कशी ते जाणून घ्या.

Utpatti Ekadashi 2025: उत्पत्ती एकादशीला 'या' ६ उपायांनी पापमुक्त व्हा; पाहा पूजाविधी!
Utpanna Ekadashi 2025: उत्पन्ना एकादशी(Utpanna Ekadashi 2025) हे नाव उत्पन्ना मातेने कार्तिक एकादशीला घेतलेल्या अवतारावरून सिद्ध झाले. देवीचे हे रूप आणि जगाचे पालनकर्ते विष्णू यांच्या कृपेने या तिथीला केलेल्या उपासनेमुळे हातून कळत नकळत घडलेल्या पापांचे क्षालन होते. या एकादशीला उत्पत्ती एकादशी(Utpatti Ekadashi 2025) असेही म्हणतात. त्यासाठी पुढे दिलेले ६ उपाय जरूर करा.
सूर्य गोचर २०२५: १६ नोव्हेंबर, बुधादित्य योगात 'या' ७ राशींच्या व्यक्तिमत्त्वाला मिळेल नवी झळाळी!
विष्णू -लक्ष्मी अभिषेक
ज्योतिष शास्त्र सांगते, की यादिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी यांना पंचामृताने अभिषेक करा आणि खिरीचा नैवेद्य अर्पण करताना तुळशीचे पान अर्पण करा. असे केल्याने त्या दोहोंची कृपा होऊन तुमच्या आर्थिक मार्गात येणारे अडथळे दूर होतील आणि तुमचे उत्पन्न वाढेल.
तुळशीचा उपाय
एकादशीची तिथी सुरू झाल्यापासून ती पूर्ण होईपर्यंत म्हणजे ८ आणि ९ डिसेंबर रोजी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा. तुळशी ही हरिप्रिया म्हणून ओळखली जाते. ती जशी विष्णूंना प्रिय आहे तशीच ती लक्ष्मीलाही प्रिय आहे. त्यामुळे एकादशीच्या तिथीला सायंकाळी न विसरता लावलेला दिवा लाभदायी ठरेल.
पंचज्योतींचा दिवा
एकादशीला विष्णू पूजा आपण करतोच, त्या दिवशी आपल्या समईच्या पाचही कडांना पाच वाती लावून विष्णूंची पूजा केली असता ती पंचेंद्रियांनी समर्पित पूजा मानली जाते. किंवा तुमच्याकडे पंचारतीचा दिवा असेल तर त्यातही तुपाच्या वाती लावून विष्णूंना ओवाळले असता ती परिपूर्ण पूजा मानली जाते. त्यामुळे आपल्या दैनंदिन कामातील तसेच यशाच्या मार्गातील अडथळे दूर होतात.
कोणत्या देवाची उपासना ठरते शीघ्र फलदायी? प्रेमानंद महाराजांनी दिले चपखल उत्तर!
शंखपुजा
उत्पत्ती एकादशीला विष्णू पूजेबरोबर शंखपुजाही करा. शंख नादामुळे घरात सकारात्मक लहरी निर्माण होतात आणि विष्णूंचा वास आपल्या घरात राहतो. अकारण होणारे कलह, वाद, आजारपण यातूनही सुटका हवी असेल तर रोजच्या देव पूजेत शंखपुजा करा आणि एकादशीला शंखपुजा करून तो दक्षिण दिशेने ठेवा.
या वस्तूंचे करा दान
हिंदू धर्मात दानाचे महत्त्व अधिक आहे. अन्नदान, वस्त्र दान, जलदान इ प्रकारचे दान गरजू व्यक्तीला केले असता शतपट पुण्य लाभते. म्हणून एकादशी सारख्या तिथीच्या औचित्याने यथाशक्ती दान धर्म करावा. सध्या हिवाळा सुरू असल्यामुळे थंडीपासून बचाव करणारे कपडे, औषधं, जीवनावश्यक वस्तूंचे दान केल्यास विष्णू कृपा प्राप्त होते आणि उत्पन्नाच्या संधी वाढून आर्थिक स्थिती मजबूत होते असे ज्योतिष शास्त्रात म्हटले आहे.