उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 13:52 IST2025-11-14T13:50:16+5:302025-11-14T13:52:00+5:30
Utpatti Ekadashi 2025: यंदा १२ नोव्हेंबर रोजी उत्पत्ती एकादशी आहे, त्यानिमित्त पुढे दिलेले तुळशीचे उपाय आर्थिक स्थैर्य आणि सुबत्ता देईल.

उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
उत्पत्ती एकादशीचे (Utpatti Ekadashi 2025) व्रत कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकादशी तिथीला केले जाते. पौराणिक मान्यतेनुसार, याच तिथीला एकादशी उत्पन्ना देवीचा जन्म झाला होता, म्हणून या तिथीला 'उत्पन्ना एकादशी' असेही म्हणतात. या दिवशी व्रत केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि मोक्ष मिळतो, अशी श्रद्धा आहे.
Utpatti Ekadashi 2025: उत्पत्ती एकादशीला 'या' ६ उपायांनी पापमुक्त व्हा; पाहा पूजाविधी!
उत्पत्ती एकादशीच्या दिवशी श्री हरी भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि माता तुळशीची पूजा करणे अत्यंत पवित्र मानले जाते. तुळशीला माता लक्ष्मीचेच स्वरूप मानले जाते. त्यामुळे या दिवशी तुळशीशी संबंधित काही खास उपाय केल्यास घरात धन-समृद्धी येते आणि लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो.
१. तुळशीला दोन चमचे दूध घाला :
सकाळच्या वेळी स्नान आणि ध्यानानंतर तुळशीच्या रोपाला कच्चे दूध अर्पण करा. एकादशी आणि रविवारी तुळशीला पाणी घालायचे नाही असे शास्त्रात म्हटले असल्याने दूध घालून झाल्यावर पाणी घालू नका आणि दूध देखील नाममात्र अर्पण करा. हा उपाय केल्याने धन-समृद्धीची माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आर्थिक समस्या दूर होते.
२. तुळशीजवळ दिवा लावा आणि मंत्र जप करा
उत्पत्ती एकादशीच्या शुभ मुहूर्तावर तुळशी मातेची पूजा करताना तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. मात्र मेणाचा दिवा लावू नका. दिवा लावल्यानंतर भगवान विष्णूंच्या मंत्रांचा (उदा. 'ओम नमो भगवते वासुदेवाय') जप अवश्य करावा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते.
सूर्य गोचर २०२५: १६ नोव्हेंबर, बुधादित्य योगात 'या' ७ राशींच्या व्यक्तिमत्त्वाला मिळेल नवी झळाळी!
३. तुळशीला प्रदक्षिणा
उत्पत्ती एकादशीच्या पूजनाच्या वेळी तुळशीला प्रदक्षिणा घालणे अत्यंत शुभ फलदायी मानले गेले आहे. जर तुमची तुळस खिडकीत असेल तर तुळशीला नमस्कार करून स्वतःभोवती ११ प्रदक्षिणा घाला. या सोप्या उपायाने कुटुंबातील सर्व बाधा आणि संकटे दूर होतात.
४. विष्णूंना तुळशीचे पान अर्पण करा
या दिवशी भगवान विष्णूंची पूजा पूर्ण विधी-विधानाने करावी. पूजा संपल्यानंतर नैवेद्यामध्ये तुळशीचे पान (Tulsi Leaves) अर्पण करायला विसरू नका. तुळशीचे पान अर्पण केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात.
Vastu Tips: तिजोरीत स्थिर लक्ष्मी हवी? घरात करा हे ६ बदल, पैसा टिकेल आणि वाढेलही!
५. तुळशीचे वाळलेले पान जवळ ठेवा
या दिवशी तुळशीच्या रोपातून नैसर्गिकरित्या गळून पडलेले वाळलेले पान घेऊन, ते गुलाबी रंगाच्या किंवा केशरी रंगाच्या कापडात बांधून आपल्या तिजोरीमध्ये किंवा पर्समध्ये ठेवा. या उपायामुळे लक्ष्मीची कृपा तुमच्यावर टिकून राहते आणि धन स्थिर राहण्यास मदत होते.
उत्पत्ती एकादशी हा एकादशी शक्तीचा जन्मदिवस असल्याने, तुळशीशी संबंधित हे उपाय करणे अक्षय पुण्य देणारे आणि पापमुक्ती करणारे मानले जातात.