तिलकुंद चतुर्थी २०२६: २२ जानेवारी: माघी गणेश जयंती आणि तिलकुंद चतुर्थी; जाणून घ्या महत्त्व आणि पूजा विधी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 07:25 IST2026-01-20T07:21:01+5:302026-01-20T07:25:02+5:30

Maghi Ganesh Chaturthi 2026: २२ जानेवारी २०२६ रोजी 'तिलकुंद चतुर्थी' आणि 'माघी गणेश जयंती' साजरी केली जाते, पण कोणते विधी करावे ते जाणून घेऊ.

Tilakund Chaturthi 2026: January 22: Maghi Ganesh Jayanti and Tilakund Chaturthi; Know the importance and worship rituals! | तिलकुंद चतुर्थी २०२६: २२ जानेवारी: माघी गणेश जयंती आणि तिलकुंद चतुर्थी; जाणून घ्या महत्त्व आणि पूजा विधी!

तिलकुंद चतुर्थी २०२६: २२ जानेवारी: माघी गणेश जयंती आणि तिलकुंद चतुर्थी; जाणून घ्या महत्त्व आणि पूजा विधी!

माघ महिन्यातील शुक्ल चतुर्थी ही 'गणेश जयंती(Maghi Ganeshotsav 2026) म्हणून साजरी केली जाते. याच दिवसाला 'तिलकुंद चतुर्थी(Tilakund Chaturthi 2026) असेही म्हणतात. यंदा २२ जानेवारी रोजी हा सण असून, या दिवशी गणेशाची उपासना केल्याने सर्व संकटे दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात, अशी श्रद्धा आहे.

तिलकुंद चतुर्थीचे महत्त्व

'तिल' म्हणजे तीळ आणि 'कुंद' म्हणजे कुंदाची पांढरी फुले. या दिवशी भगवान गणेशाला तीळ आणि कुंदाची फुले अर्पण करण्याची परंपरा आहे.

आरोग्य आणि समृद्धी: माघ महिन्यातील थंडीच्या काळात तिळाचे सेवन आणि दान आरोग्यासाठी उत्तम मानले जाते.

पापमुक्ती: या दिवशी व्रताचे पालन केल्याने वर्षभरातील सर्व चतुर्थींचे पुण्य मिळते, असे शास्त्रात सांगितले आहे.

माघी गणेश जयंती: महोत्कट विनायकाचा अवतार

भाद्रपदातील गणपती हा 'पार्थिव' (मातीचा) असतो, तर माघातील गणपती हा 'जन्मोत्सव' म्हणून साजरा केला जातो. कश्यप ऋषी आणि माता अदिती यांच्या उदरी याच तिथीला गणरायाने 'महोत्कट विनायक' रूपात जन्म घेतला होता. दुष्ट देवांतक आणि नरांतकाचा वध करण्यासाठी हा अवतार झाला होता.

पूजा विधी (कशी करावी पूजा?)

१. स्नान: सकाळी लवकर उठून तिळाचे उटणे लावून स्नान करावे. स्नानाच्या पाण्यात थोडे तीळ टाकणे शुभ मानले जाते. 
२. संकल्प: गणपतीसमोर बसून व्रत आणि पूजेचा संकल्प करावा. 
३. स्थापना: पाटावर लाल वस्त्र अंथरून त्यावर गणपतीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. 
४. अभिषेक: शक्य असल्यास गणपतीच्या मूर्तीवर अभिषेक करावा. 
५. अर्पण: बाप्पाला लाल फुले, कुंदाची फुले, दुर्वा आणि शेंदूर अर्पण करावा. 
६. नैवेद्य: या दिवशी तिळाच्या लाडूंचा किंवा तिळगुळाचा नैवेद्य दाखवणे अनिवार्य आहे. २१ मोदकांचा नैवेद्यही अर्पण केला जातो. 
७. आरती व मंत्र: 'ओम गं गणपतये नमः' या मंत्राचा जप करून आरती करावी.

Web Title : तिलकुंद चतुर्थी 2026: तिथि, महत्व और पूजा विधि जानिए

Web Summary : माघी गणेश जयंती के रूप में भी जानी जाने वाली तिलकुंद चतुर्थी 22 जनवरी को है। मान्यता है कि इस दिन गणेश की पूजा करने से बाधाएं दूर होती हैं। तिल और कुंद के फूल अर्पित करना पारंपरिक है। यह त्योहार महोत्कट विनायक के रूप में गणेश के जन्म का उत्सव है, जिसमें तिल स्नान और तिल के मिठाई चढ़ाना शामिल है।

Web Title : Tilakund Chaturthi 2026: Date, Significance, and Puja Rituals Explained

Web Summary : Tilakund Chaturthi, also known as Maghi Ganesh Jayanti, falls on January 22nd. It's believed worshipping Ganesha on this day removes obstacles. Offering sesame seeds and Kunda flowers is traditional. The festival celebrates Ganesha's birth as Mahotkat Vinayak, with specific rituals including sesame baths and offering sesame sweets.