'पाणीच पाणी चोहीकडे' अशी स्वप्ने पडतात का? हे आहे त्याचे फळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 03:41 PM2021-06-25T15:41:20+5:302021-06-25T15:41:46+5:30

स्वप्नांचे अर्थ जाणून घेण्याबद्दल आपल्या मनात कुतूहल असते. त्यांचा अर्थ जाणून घ्यावा, परंतु त्यावर पूर्णपणे विसंबून राहणे चुकीचे ठरेल!

Is there a dream of 'water only to water'? This is its fruit! | 'पाणीच पाणी चोहीकडे' अशी स्वप्ने पडतात का? हे आहे त्याचे फळ!

'पाणीच पाणी चोहीकडे' अशी स्वप्ने पडतात का? हे आहे त्याचे फळ!

googlenewsNext

दिवसभरात आपण जे बोलतो, बघतो, विचार करतो त्या सर्व गोष्टी अंतर्मनात घोळत राहातात. जागृतपणीच नाही, तर झोपेतही त्यासंबंधी विचार सुरू असतात. मात्र, विचारांचा क्रम मागे पुढे झाल्याने स्वप्नांचा गुंता होतो आणि स्वप्नांचा अर्थबोध न झाल्याने असे स्वप्न का पडले, या प्रश्नाची विचारांमध्ये भर पडते. जसे की, अनेक दिवस सातत्याने नदी, समुद्र, तलाव दिसणे. बुडणे, पोहणे, जलप्रवास करणे इ. गोष्टी दिसत राहतात. त्यांचे फळ काय असू शकते, याबद्दल आपल्याला उत्सुकता असते. जाणून घेऊया,अशा जलशिवारयुक्त स्वप्नांबद्दल स्वप्नज्योतिष काय सांगते ते...!

  • पाणी पाहिले तर - शत्रूवर विजय मिळतो.
  • पाणी पित असणे - पुढील काळ उत्तम येत आहे.
  • पाण्यात डुबत असलेले पाहणे - पुढे त्रास आहे.
  • पाण्याचा महापुर, समुद्र, बर्फाचे डोंगर दिसणे - नोकरीत मानमान्यता, पदवी प्राप्त होणी, नोकरी नसेल तर नोकरी प्राप्त होणे. याचे असेही सूचक आहे, की त्रासाचे दिवस संपून सुगीचा काळ सुरू होत आहे.
  • पाणी गढूळ दिसणे - दु:खकारक स्थिती
  • पाणी निर्मळ दिसणे - आनंददायक स्थिती
  • खारे पाणी दिसणे - दु:खनाश होणे
  • नदी दिसणे - अनपेक्षित पैशांची अडचण, नोकरीत त्रास. धैर्य ठेवावे.
  • तलावात स्नान करणे - दु:ख नष्ट होणे
  • नदी पार करत असताना दिसणे - भाग्योदयाचे चिन्ह

  • पाण्यावर लहरी, समुद्राच्या लाटा - मानसिक त्रास
  • नदी, समुद्र वाढता दिसणे - संपत्ती मिळण्याचे लक्षण
  • पाण्याची चक्की पाहणे - कष्ट
  • पाण्यात डुबणे - दु:खकारक परिस्थिती
  • पाण्यात पोहणे - भाग्याचे लक्षण समजले जाते.
  • पाण्याने भरलेला तलाव पाहणे - सुख, मित्र प्राप्त होणे.
  • पाण्याविरहित तलाव - दारिद्र्याचे लक्षण
  • पाण्यावर जहाज, नाव पाहणे - मित्राकडून फसवणूक होणे
  • पाण्यावर बर्फ पाहिला तर - धन प्राप्त होते.
  • पाण्याचा शुभ्र धबधबा पाहणे- हातून नवीन कार्य होते. विद्येत, नोकरीत, व्यापारात यश येते. नवीन मित्रांबरोबर प्रवास घडतो.
  • पाण्यावर प्रेत दिसणे - आयुष्यवर्धक, पण प्रत्येक काम सांभाळून कराव़े 
  • समुद्रात डुबणे - प्रेमभंग
  • पाण्यात ईश्वरमूर्ती दिसणे - सत्यप्रिय मित्र मिळणे
  • कारंजे पाहणे - सुख मिळणे
  • पाणी विहरीतून काढणे, तुडुंब विहीर दिसणे - भाग्योदयाचे लक्षण
  • पाण्यात पडता पडता वाचलेला दिसणे - मानसिक त्रास, पैसा खर्च होणे

Web Title: Is there a dream of 'water only to water'? This is its fruit!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.