हिंदू पंचांगानुसार एका वर्षात दोन आयन असतात, म्हणजेच वर्षातून दोनदा सूर्याच्या स्थितीत बदल होतो आणि या बदलाला उत्तरायण आणि दक्षिणायन म्हणतात. शास्त्रानुसार सूर्य जेव्हा मकर राशीतून मिथुन राशीत जातो, तेव्हापर्यंतच्या काळाला उत्तरायण म्हणतात. हा कालावधी ६ महिन्यांचा असतो, त्यानंतर सूर्य कर्क राशीतून धनु राशीत जातो, त्या काळाला दक्षिणायन म्हणतात. हा कालावधीही सहा महिन्यांचा आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार एका वर्षात सहा ऋतू असतात. जेव्हा सूर्य उत्तरायणात येतो तेव्हा शिशिर, वसंत आणि उन्हाळा असे तीन ऋतू येतात आणि जेव्हा सूर्य दक्षिणायनमध्ये असतो तेव्हा पावसाळा, शरद ऋतू आणि हेमंत ऋतू असतात. १४ जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर उत्तरायण सुरू झाले आहे.
मृत्यू कधी, कुठे, कसा घेरेल सांगता येत नाही, यावर भाष्य करताना प्रेमानंद महाराज म्हणतात...
वैदिक काळात उत्तरायणाला देवयान आणि दक्षिणायनाला पितृयान म्हणतात. मकर संक्रांतीनंतर, माघ महिन्यात, उत्तरायणापासून सर्व शुभ कार्ये सुरू होतात. सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलत असला तरी ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याचे मकर राशीत जाणे फार महत्वाचे मानले जाते. हे दोन्ही मुख्य ग्रह एका राशीत एका स्थानी असताना त्यांच्या आशिर्वादात आलेले मरण मोक्षदायी ठरते असे म्हणतात.
तसे असले, तरी मृत्यू आपल्या हाती नाही, परंतु तो चांगल्या पद्धतीने यावा, अशी आपल्या सर्वांचीच इच्छा असते. विशेषत: हिंदू धर्मशास्त्राच्या मान्यतेनुसार दक्षिणायनात मृत्यू येऊ नये अशी प्रार्थना केली जाते. म्हणून पितामह भीष्म यांनीदेखील उत्तरायण सुरू होईपर्यंत मृत्यू लांबवला होता. कारण, त्यांना त्यांच्या पुण्याईमुळे इच्छामरणाचा वर मिळाला होता.
पितामह भीष्मांची शरपंजरी:
भीष्माचार्यांना इच्छा असेल, तेव्हाच मरण येईल असा वर मिळाला होता. त्यामुळे युद्धात शिखंडीला पुढे करून अर्जुनाने त्यांच्यावर बाण मारताच ते घायाळ होऊन पडले. त्या वेळी दक्षिणायन होते. अंधाराचे प्राबल्य होते. मात्र उत्तरायणात अंधार कमी कमी होऊ लागतो आणि शुभ कार्याला सुरुवात होते. म्हणून आपल्याला मृत्यू उत्तरायण सुरू झाल्यानंतरच मिळावा, अशी भीष्माचार्यांनी इच्छा प्रगट केली. त्यांच्या इच्छेप्रमाणे अर्जुनाने बाणांची शय्या तयार केली आणि त्यावर पडलेले भीष्माचार्य उत्तरायणाची वाट बघत २८ दिवस शरशय्येवर पडून राहिले. शेवटी उत्तरायणात माघी शुद्ध अष्टमीला त्यांनी प्राण सोडले. तो दिवस भीष्माष्टमी म्हणून स्मरणात ठेवला जातो.
भीष्मांचार्यांच्या या अवस्थेवरून एखादा माणूस बरेच दिवस आजारी असून मरायला टेकला असेल आणि त्याचा प्राण जात नसेल, तर तो शरपंजरी पडला आहे असा शब्दप्रयोग रूढ झाला.
उत्तरायण आणि मृत्यूचा गूढ संबंध:
गूढ शास्त्रानुसार, उत्तरायणात सूर्याचे तेज पृथ्वीवर थेट आणि अधिक सकारात्मक असते. 'उपनिषदां'मध्ये 'अर्चिमार्ग' (प्रकाशाचा मार्ग) सांगितला आहे. असे मानले जाते की, या काळात प्राण सोडणारा आत्मा सूर्याच्या किरणांचा आधार घेऊन उच्च लोकांमध्ये (ब्रह्मलोकात) जातो, जिथून पुनर्जन्म घ्यावा लागत नाही. हाच तो 'गूढ' मार्ग आहे ज्याची वाट भीष्म पाहत होते.
अध्यात्म सांगते की, उत्तरायणात मानवी शरीरातील 'सुषुम्ना नाडी' आणि 'सहस्रार चक्र' अधिक सक्रिय होण्यास मदत होते. हे एक प्रकारे विश्वाचे 'द्वार' (Gateway) उघडण्यासारखे आहे. दक्षिणायन हे 'चंद्राचे' (मनाचे/मोहाचे) प्रतीक आहे, तर उत्तरायण 'सूर्याचे' (बुद्धीचे/ज्ञानाचे) प्रतीक आहे.
भीष्माचार्यांनी काळ का थांबवला? यातील गूढ हे आहे की, त्यांच्याकडे 'इच्छामरणा'चा वर होता, पण तो प्रत्यक्षात आणण्यासाठी 'योगाग्नी'ची गरज होती. उत्तरायणातील प्राणवायू आणि सौरऊर्जा या योगसाधनेला पूरक असते. त्यांनी आपल्या प्राणांना 'ब्रह्मरंध्रा'त रोखून धरले होते. ज्या क्षणी सूर्याने मकर राशीत प्रवेश केला, त्या क्षणी विश्वाची ऊर्जा बदलली आणि त्यांनी आपले प्राण विसर्जित केले.
निसर्गातील बदल आत्म्याच्या प्रवासावर परिणाम करतात, हा एक मोठा गूढ सिद्धांत आहे. उत्तरायणात दिवस मोठा होतो, म्हणजेच ज्ञानाचा प्रकाश वाढतो. भीष्मांना आपला देहत्याग अशा वेळी करायचा होता जेव्हा 'सत्त्व' गुण सर्वोच्च असतो. दक्षिणायन हे 'तामसिक' आणि 'राजसिक' ऊर्जेचे प्रतीक मानले जाते, तर उत्तरायण हे पूर्णपणे 'सात्त्विक' आहे.
होलाष्टक २०२६: होळीपूर्वीचे ८ दिवस का मानले जातात अशुभ? जाणून घ्या नियम आणि महत्त्व
"भीष्माचार्यांनी केवळ काळ थांबवला नव्हता, तर त्यांनी निसर्गाच्या सर्वोच्च ऊर्जेशी स्वतःचे अनुसंधान साधले होते. शास्त्र सांगते की, मृत्यू ही केवळ शरीराची समाप्ती नाही, तर तो आत्म्याचा प्रवास आहे. दक्षिणायनाचा काळ हा 'पितृयानाचा' म्हणजे पुन्हा जन्माला येण्याचा मार्ग दर्शवतो, तर उत्तरायणाचा काळ हा 'देवयानाचा' म्हणजे जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून कायमची सुटका करून घेणारा मार्ग मानला जातो. भीष्मांना माहीत होते की, ज्या क्षणी सूर्य उत्तरायणात प्रवेश करेल, त्या क्षणी विश्वाचे 'महाद्वार' उघडेल आणि आपल्यासारख्या योद्ध्याला थेट मोक्षप्राप्ती होईल. हेच ते गूढ आहे, ज्यासाठी गंगेच्या या पुत्राने २८ दिवस बाणांच्या शय्येवर मृत्यूला दारात उभं केलं होतं."
Web Summary : Uttarayana marks the sun's northward journey, considered auspicious in Hinduism. Bhishma Pitamah, blessed with choosing his death, waited for Uttarayana to attain salvation. This period is believed to bring a peaceful departure and spiritual progress, highlighting the desire for a good death free from suffering.
Web Summary : उत्तरायण सूर्य की उत्तर दिशा की यात्रा है, जिसे हिंदू धर्म में शुभ माना जाता है। भीष्म पितामह ने मोक्ष प्राप्ति के लिए उत्तरायण का इंतजार किया। यह अवधि शांतिपूर्ण विदाई और आध्यात्मिक उन्नति लाती है, जो पीड़ा से मुक्त एक अच्छी मृत्यु की इच्छा को उजागर करती है।