Taurus features: कोणत्याही परिस्थितीत आपले ध्येय गाठणारी बुद्धिमान रास म्हणजे वृषभ रास; जाणून घ्या आणखी वैशिष्ट्ये!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 04:44 PM2022-05-10T16:44:18+5:302022-05-10T16:47:42+5:30

Taurus features: वृषभ राशीचा सर्वात मोठा मोठा गुण म्हणजे अथक परिश्रम करण्याची करण्याची तयारी, बुद्धिमत्ता आणि कधीही हार न मानणारी मानणारी दुर्दम्य इच्छाशक्ती! या गुणांच्या जोरावर ते त्यांची सर्व स्वप्नं पूर्ण करतात.

Taurus features: The wise pile that achieves your goal in any situation is Taurus pile; Learn more features! | Taurus features: कोणत्याही परिस्थितीत आपले ध्येय गाठणारी बुद्धिमान रास म्हणजे वृषभ रास; जाणून घ्या आणखी वैशिष्ट्ये!

Taurus features: कोणत्याही परिस्थितीत आपले ध्येय गाठणारी बुद्धिमान रास म्हणजे वृषभ रास; जाणून घ्या आणखी वैशिष्ट्ये!

Next

आज आपण वृषभ राशीच्या लोकांबद्दल बोलणार आहोत. वृषभ ही कालपुरुषाच्या कुंडलीतील दुसरी राशी आहे. या राशीचे प्रतीक बैल आहे. बैलाचा संबंध शेतीशी आणि शेतीचा संबंध पृथ्वीशी असतो. त्यामुळे ही पृथ्वी तत्त्वाची रास आहे. बैल अर्थात नंदी हा शिव शंकराच्या कुटुंबाचा सदस्य आहे. ही दक्षिण दिशेची रास आहे.या राशीची आणखीही स्वभाव वैशिष्ट्ये जाणून घेऊ. 

वृषभ राशीचा सर्वात मोठा मोठा गुण म्हणजे अथक परिश्रम करण्याची करण्याची तयारी, बुद्धिमत्ता आणि कधीही हार न मानणारी मानणारी दुर्दम्य इच्छाशक्ती! या गुणांच्या जोरावर ते त्यांची सर्व स्वप्नं पूर्ण करतात.

वृषभ राशीचे लोक स्वतःचे नशीब बलवत्तर करतात आणि दुसऱ्यांनाही प्रोत्साहन देतात. ते खूप चांगले सल्लागार असतात. प्रामाणिक सल्ला देतात. कोणाचीही फसवणूक करत नाहीत. त्यांचे बालपणीचे जीवन संघर्षमय असू शकते, परंतु आयुष्याचा मध्य आणि शेवट आनंदी होतो. ते धार्मिक वृत्तीचे असतात. संकटकाळातही ते आपला मानसिक तोल जाऊ देत नाहीत. मात्र, त्यांना आयुष्यात खूप मेहनत करावी लागते.

व्यक्तिमत्वात चुंबकीय आकर्षण : या राशीचे लोक मोजकेच बोलतात परंतु मार्मिक भाष्य करतात. आपल्या बोलण्याने ते कोणालाही दुखवत नाहीत. त्यांच्या स्वभावामध्ये नैसर्गिकरित्या चुंबकीय आकर्षण असते. त्यांच्या बोलण्याचा समोरच्या व्यक्तीवर चटकन प्रभाव पडतो. त्यामुळे त्यांना मित्रपरिवाराची कमतरता कधीच भासत नाही. 

धार्मिक स्थळाचे आकर्षण : वृषभ राशीच्या लोकांना धार्मिक स्थळी फिरायला खूप आवडते. प्रेक्षणीय स्थळांपेक्षा तीर्थक्षेत्राकडे त्यांचा अधिक ओढा दिसून येतो. या राशीच्या लोकांसाठी धार्मिक स्थळे उर्जाकेंद्राप्रमाणे त्यांना प्रेरणा देतात. धार्मिक वृत्ती असल्यामुळे देव दर्शन, पूजा विधी, सण संस्कृती यात त्यांना विशेष रस असतो. 

ग्रहांचे पाठबळ : वृषभ राशीचे लोक स्पष्ट वक्ता असतात. ते आपल्या कुटुंबाला प्राधान्य देतात. या लोकांमध्ये आपुलकीची भावना अधिक असते. या राशीला शनीचे पाठबळ अधिक मिळते. बुध ग्रहदेखील शुभ फळ देतो. वृषभ राशीच्या कुंडलीत बुध उच्चीचा असेल तर ती व्यक्ती खूप बुद्धिमान असते. 

Aries Ascendant People: हरलेली लढाई जिंकायची कशी, हे मेष राशीच्या लोकांकडून शिकायला हवे; वाचा त्यांचे स्वभाववैशिष्ट्य!

आरोग्याची काळजी : वृषभ राशीच्या लोकांनी आग आणि विद्युत प्रवाहापासून स्वतःला सांभाळावे. या राशीच्या लोकांसाठी गुलाबी रंग शुभ असतो. फिकट शुभ्र रंगाचे कपडे त्यांचे व्यक्तिमत्त्व खुलवतात. या राशीच्या लोकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नियमित व्यायाम केला पाहिजे. अन्यथा विविध आजार त्यांना पटकन जडू शकतात. 

कल्पनाशक्ती हा मुख्य गुण आहे : तृतीय घराचा स्वामी चंद्र असल्यामुळे या राशीच्या लोकांना संगीत, नाट्य यात विशेष रस असतो. जर चंद्र उच्च स्थानावर असेल तर ते खूप कल्पक बनतात. पराक्रमाचा स्वामी चंद्र अधिक कल्पनाशक्ती देतो. अशा लोकांचे जीवन संघर्षाने भरलेले असते परंतु ते आपल्या प्रयत्नांनी आयुष्याचा मनमुराद आनंद घेतात आणि इतरांना देतात. 

Web Title: Taurus features: The wise pile that achieves your goal in any situation is Taurus pile; Learn more features!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.