शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

Tarot Card:  आवश्यक असेल तरच प्रवास करा; कठीण प्रसंगांची शक्यता; वाचा साप्ताहिक भविष्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 13:30 IST

Tarot Card: टॅरो मार्गदर्शन वाचण्यासाठी मनामध्ये एखादा विषय किंवा प्रश्न ठेवून तीनपैकी कोणताही एक नंबर निवडा आणि नंबरप्रमाणे मार्गदर्शन वाचा

साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन२२ ते २८ मार्च===============सुमेध रानडे,टॅरो कार्ड रीडर, पुणे===============

साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन वाचण्यासाठी १/२/३ पैकी कोणताही एक नंबर निवडा. नंबर निवडताना मनामध्ये एखादा विषय किंवा प्रश्न ठेवून नंबर निवडा आणि मग त्या नंबर साठी तुमच्या विषयानुसार किंवा प्रश्नानुसार मार्गदर्शन वाचा! 

 नंबर १: 

वैयक्तिक आयुष्य - घरात किंवा कुटुंबात मानसिक अस्थिरता राहण्याची शक्यता आहे. काहीतरी गमावण्याचा संभव आहे. मन दुखावले जाऊ शकते. संयम ठेवा!नोकरी/व्यवसाय - नोकरी व्यवसायात केलेल्या कष्टाला डावलून एखादी घटना घडेल. त्याने मनात खदखद निर्माण होऊ शकते. रागावर नियंत्रण ठेवा!फायनान्स - आर्थिक बाबतीत अपेक्षित लाभ येण्याची शक्यता खूप कमी आहे. महत्त्वाचे आर्थिक निर्णय टाळा!रिलेशनशिप - प्रेमाच्या बाबतीत एखादा अपेक्षाभंग होऊ शकतो. पण अधिक खचून न जाता तुमच्याकडे काय आहे याचा विचार करा. नकारात्मक विचार किंवा स्वतःला कमी लेखणे असे करणे टाळा!शिक्षण/परीक्षा - जास्त कष्ट करणे अत्यंत आवश्यक आहे. एखादा पेपर हवा तसा जाणार नाही. गेलेल्याचा जास्त विचार करु नका. उद्याचा विचार करा!खरेदी/विक्री - खरेदी विक्री संदर्भात एखादे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खात्री करुन मगंच पैसे गुंतवा!कोर्ट कचेरी - या बाबतीत मनाप्रमाणे यश येणे या आठवड्यात कठीण आहे. उलट समोरच्या पक्षाकडून त्रासदायक घटना घडू शकते.आरोग्य - आरोग्याच्या बाबतीत काळजी जास्त घेतलेली चांगली. विशेष करुन सर्दी खोकला व्हायरल त्रासापासून जपा. दूषित पाणी पिणे टाळा.प्रवास -  गरजेपुरताच प्रवास करा. फार जोखीम उचलू नका. अती ध्येयवादी नियोजन नको!

नंबर २: 

वैयक्तिक आयुष्य - घरात किंवा कुटुंबात एक प्रकारचा ताण येण्याची शक्यता आहे. किरकोळ गोष्टींवरून भांडणे होऊ शकतात. राग डोक्यात घालून वाईट बोलू नका!नोकरी/व्यवसाय - नोकरी व्यवसायात कुठेतरी विजय चुकण्याची शक्यता आहे. बोलण्याचे वेगळे अर्थ निघू शकतात त्यामुळे बोलताना विचार करून बोला!फायनान्स - आर्थिक बाबतीत तुम्ही गर्व करून चालणार नाही. स्वतःचा बडेजाव दाखवू नका. इतरांना आर्थिक मदत करा!रिलेशनशिप - प्रेमाच्या बाबतीत कोणा एकाचा वापर होतो आहे असं वाटू शकतं. त्यामुळे नात्यात दुरावा येण्याची शक्यता आहे. एकमेकांचा आदर करा. मोकळे बोला.शिक्षण/परीक्षा - अती शहाणा त्याचा बैल रिकामा अशी सूचना तुम्हाला दिली जात आहे. त्यामुळे स्वतःचे वर्चस्व दाखवायला जाऊ नका.खरेदी/विक्री - खरेदी विक्री संदर्भात एखादे व्यवहारापेक्षा भांडण होण्याचा संभव आहे म्हणून सध्या मोठे व्यवहार टाळलेले बरे!कोर्ट कचेरी - या बाबतीत पराभव होण्याची शक्यता आहे. वाईट पातळीवर जाऊ नका. कधीतरी स्वतःची माघार स्वीकारावीच लागते हे लक्षात ठेवा!आरोग्य - आरोग्याच्या बाबतीत कोणाबरोबर वहावत जाऊन काहीतरी खाणे पिणे केल्यामुळे त्रास होऊ शकतो. त्यामुळे जे खाल प्याल ते विचारपूर्वक करा.प्रवास -  प्रवासात अचानक नैसर्गिक अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता आहे त्यामुळे तशा तयारीने निघा. पटकन कोणावर विश्वास ठेवून प्रवासात निर्णय घेऊ नका.

नंबर ३: 

वैयक्तिक आयुष्य - घरात तुम्हाला तुमचा बराच वेळ आणि शक्ती द्यावी लागणार आहे. कुठल्यातरी गोष्टीची वाट पाहावी लागणार आहे! संयम ठेवा!नोकरी/व्यवसाय - नोकरी व्यवसायात तुमच्यावर बरेच कष्ट करण्याची वेळ येईल. धीराने वागा. एखाद्या कामाला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागेल.फायनान्स - आर्थिक बाबतीत एखादा फायदा संभवतो. दिलेले पैसे परत मिळू शकतात.रिलेशनशिप - प्रेमाच्या बाबतीत एखादे उत्तर मिळायला किंवा पुढे वाढायला वेळ लागेल. विश्वास संपादन करण्यासाठी वेळ लागेल!शिक्षण/परीक्षा - तुमच्या कष्टाचे सोने होईल. त्यामुळे प्रयत्न पूर्ण करा. प्रामाणिकपणे परीक्षा द्या!खरेदी/विक्री - खरेदी विक्री संदर्भात आर्थिक फायदा होऊ शकतो. योग्य किंमतीत व्यवहार होईल!कोर्ट कचेरी - कोर्ट व्यवहारात तुमच्या तारीख पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. तुमच्या कष्टाचे परिणाम लगेच मिळणार नाहीत.आरोग्य - आरोग्याच्या बाबतीत सुधारण व्हायला वेळ लागेल. पण चिंता कमी होईल एवढं नक्की!प्रवास - प्रवासात विनाकारण विलंब होईल. कुठे ट्रॅफिक मधे अडकण्याची किंवा गाड्यांसाठी थांबण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे हातात वेळ ठेवून निघालेले चांगले!

या मार्गदर्शनाबद्दल आम्हाला तुमचा अभिप्राय नक्की ईमेल द्वारे सांगा. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर तेही ईमेल द्वारे विचारू शकता.ईमेल संपर्क: sumedhranade531@gmail.com

श्रीस्वामी समर्थ.

English
हिंदी सारांश
Web Title : Tarot Card Reading: Travel only if necessary, weekly forecast

Web Summary : Weekly tarot guidance (March 22-28) warns of potential difficulties. Number choices reveal insights into personal life, career, finance, relationships, education, property, legal matters, health, and travel. Difficult situations are predicted, requiring caution and patience.
टॅग्स :Weekly Horoscopeसाप्ताहिक राशीभविष्यAstrologyफलज्योतिष