शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानावर बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
2
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
3
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
4
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
5
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
6
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
7
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
8
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
9
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
10
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
11
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
12
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
13
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
14
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
15
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
16
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
17
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
18
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
19
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
20
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द

Tarot Card: कासवाच्या गतीने का होईना, रोज थोडी प्रगती करा; जूनच्या पहिल्या आठवड्याचे टॅरो भविष्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 12:26 IST

Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्डपैकी एक कार्ड निवडून तुम्ही तुमचे साप्ताहिक भविष्य जाणून घेऊ शकता.

साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन१ ते ७ जून===============सुमेध रानडे,टॅरो कार्ड रीडर, पुणे===============

गुंतू नका, अडकू नका, ठेवा कामात गती, दुखवू नका मन कुणाचे, त्यानेच साधेल प्रगती!

नंबर १:

काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी एकाच वेळी अनेक पर्याय घेऊन येणार आहे. निरनिराळ्या गोष्टींमुळे निर्णय घ्यायला अवघड जाईल. मल्टी टास्किंग करावं लागेल. पण यांपैकी कोणतीही गोष्ट हवी तशी पुढे सरकणार नाही. एकूण थोडी तारांबळ उडण्याची शक्यता आहे. हवे ते साध्य होण्यासाठी अजून वेळ लागेल त्यामुळे संयम आणि सबुरीने काम करा.

तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही बऱ्याच गोष्टींमधून एक दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. खूप काही करायला जाऊ नका, फसवणूक संभवते. वरवर आकर्षक वाटणाऱ्या कुठल्याही गोष्टीला भुलू नका. लोभ मोह यांच्या पासून जाणीवपूर्वक लांब राहा. स्वप्नरंजन करत बसू नका, हवेत बोलत राहू नका, प्रत्यक्षात कृती करा.

नंबर २:

काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी वेगवान असणार आहे. अडकलेली कामे पुढच्या टप्प्यापर्यंत पोचू शकतात. ध्येयाकडे चांगली वाटचाल होईल. सतत होत असलेल्या घडामोडींमुळे अस्थिर आणि अस्वस्थ वाटू शकतं. सडेतोड बोलणाऱ्या व्यक्तींशी सामना होईल. मतभेद होऊ शकतात. तुमच्या कामांना गती आणि प्रगती मिळेल. प्रवास संभवतो.

तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही धडाडीने आणि विश्वासाने पुढे चालण्याची गरज आहे. तुमचे विचार स्पष्टपणे मांडा, रोखठोक वागा. सत्याचीच बाजू घ्या. बुद्धीचातुर्य वापरा. कोणत्याही बाबतीत वेळ गाठा, विलंब नको. संथ न होता, आहात त्या मार्गावर "तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची!" याप्रमाणे वागलात तर यश निश्चितपणे मिळेल! फक्त अभिमान नको!

नंबर ३:

काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी, तुम्ही आहात त्या मार्गावर पुढे नेणारा असणार आहे. बुध्दी पेक्षा भावनांचा पगडा राहील. मध्यम गतीने कामे पुढे सरकतील. लोकांचे यांचे सहकार्य लाभेल. उत्तम नातेसंबंध जोडले जातील. तुम्हाला आतून प्रसन्न वाटेल, दुसऱ्यांना तुम्ही आनंद देऊ शकाल. एखादा छंद किंवा कला यातून तुम्हाला समाधान मिळेल. प्रवास आनंद देईल.

तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही लोकांपर्यंत कसे पोचता येईल याचा विचार करायचा आहे. इतरांना तुमच्या बरोबर घेऊन चाला. तुम्हाला कृतीशील होण्याची गरज आहे. तुमच्यातील चांगुलपणाने लोकांचे मन जिंका. पण कोणाच्या कुठल्याही आमिषाला भुलू नका. "मन जीता ते जग जीता" याप्रमाणे स्वतःचे आणि इतरांचे मन जिंकलात तर तुमचा खरा विजय होईल!

संपर्क : ९५६१०९३७४०

श्रीस्वामी समर्थ.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष