साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन२९ मार्च ते ४ एप्रिल===============सुमेध रानडे,टॅरो कार्ड रीडर, पुणे===============
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन वाचण्यासाठी १/२/३ पैकी कोणताही एक नंबर निवडा. नंबर निवडताना मनामध्ये एखादा विषय किंवा प्रश्न ठेवून नंबर निवडा आणि मग त्या नंबर साठी तुमच्या विषयानुसार किंवा प्रश्ननुसार मार्गदर्शन वाचा!
नंबर १:
वैयक्तिक आयुष्य - घरात संपूर्ण जबाबदारी अंगावर घेऊ नका. इतरांची मदत घ्या. त्याचप्रमाणे स्वतःवर आलेली कामे पूर्णपणे झटकू ही नका!नोकरी/व्यवसाय - नोकरी व्यवसायात तुमच्या हाताखाली असलेल्यांना कामे नीट वाटून द्या. कोणावर अन्याय होत नाही ना याचा विचार करा.फायनान्स - आर्थिक बाबतीत स्वार्थी विचार सोडून इतरांना मदत करण्याची गरज आहे. गरिबांना मदत करा. दानधर्म करा.रिलेशनशिप - प्रेमाच्या बाबतीत स्वतःला मागे ओढू नका. नात्यामध्ये मोकळेपणाने वागा. शेअर करा. असे केल्याने तुम्हाला तसेच परत मिळेल!शिक्षण/परीक्षा - आज जे कष्ट कराल ते उद्या फळतील. हा न्याय तुम्हाला उत्तम लागू पडेल. त्यामुळे काळजी न करता कष्ट करा.खरेदी/विक्री - खरेदी विक्री संदर्भात चोख व्यवहार होतील. अतिरेक खर्च नको!कोर्ट कचेरी - कोर्टाच्या कामात मध्यस्थी होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे सर्वस्वी तुमच्या बाजूने निकाल लागेल अशी अपेक्षा ठेवू नका!आरोग्य - आरोग्याच्या बाबतीत संतुलन राखा. अती खाणे किंवा अती श्रम यांच्यामुळे तब्येतीवर वाईट परिणाम होऊ शकतो. पथ्य सांभाळा!प्रवास - प्रवासामुळे एखादी संधी मिळण्याची शक्यता आहे. प्रवासात इतरांना मदत करा!
नंबर २:
वैयक्तिक आयुष्य - घरात एक प्रकारचे समाधान आणि दुःखावर फुंकर अनुभवला मिळेल. साध्या सोप्या गोष्टींतून आनंद मिळवा!नोकरी/व्यवसाय - नोकरी व्यवसायात तुम्हाला समतोल राखण्याची गरज आहे. धीराने काम करा. मध्यम मार्ग निवडा.फायनान्स - आर्थिक बाबतीत मागचे नुकसान भरून निघण्याची शक्यता आहे. विवेक बुद्धी वापरून निर्णय घ्या.रिलेशनशिप - प्रेमाच्या बाबतीत दोघांनी एकत्र येऊन काहीतरी चांगलं करा. जसे की बागकाम, एखादी छोटी सहल, एखादे वर्कशॉप चित्रकला इत्यादी. त्यातून प्रेमात आनंद मिळेल!शिक्षण/परीक्षा - प्रामाणिकपणा आणि खरेपणा तुम्हाला पुढे घेऊन जाईल. मेहनत गरजेची आहे हे लक्षात ठेवा. एकत्र पेक्षा एकट्यात अभ्यास करा.खरेदी/विक्री - खरेदी विक्री संदर्भात मध्यम मार्ग निघेल. टोकाचा निर्णय किंवा अतिरेक अपेक्षा ठेवू नका.कोर्ट कचेरी - कोर्टाच्या कामात मध्यस्थी होण्याची शक्यता आहे. निकाल तुमच्या बाजूने न लागता सुवर्णमध्य साधला जाईल.आरोग्य - आरोग्याच्या बाबतीत संयम ठेवण्याची गरज आहे. कुठल्याच गोष्टीचा अतिरेक नका. शक्यतो बाहेरचे पेय पदार्थ टाळा.प्रवास - प्रवासातून मन शांत होईल. मागे घडलेल्या घटनांचा त्रास कमी होईल. मनाला उभारी येईल!
नंबर ३:
वैयक्तिक आयुष्य - घरात किंवा कुटुंबात मानसिक समाधान चांगले राहील. एखादी आनंदी घटना घडेल. पाहुण्यांचे येणेजणे होईल.नोकरी/व्यवसाय - नोकरी व्यवसायात तुमच्या कष्टाला योग्य स्थान मिळेल. वरिष्ठांकडून कौतुक होऊ शकते. कामाच्या ठिकाणी नातेसंबंध टिकवा. भांडणे नको!फायनान्स - आर्थिक बाबतीत तुम्हाला अपेक्षित यश मिळण्याचा संभव आहे. योग्य मार्गदर्शन घेऊन गुंतवणूक करा.रिलेशनशिप - प्रेमाच्या बाबतीत एकमेकांना समजून घ्याल. प्रेम व्यक्त होईल. कविता गाणे सहल अशा कलेतून प्रेम बहरुन येईल!शिक्षण/परीक्षा - या बाबतीत लेखनावर जास्त भर द्या. वाटत असेल तितके सोपे नसण्याची शक्यता आहे म्हणून तयारी चांगली करा. अती आत्मविश्वास धोक्याचा!खरेदी/विक्री - खरेदी विक्री संदर्भात हवे तसे व्यवहार होण्याची शक्यता आहे. नात्यातील व्यक्ती किंवा मित्रमैत्रिणी सोबत असलेले उत्तम होईल!कोर्ट कचेरी - कोर्ट व्यवहारात जपून विश्वास ठेवा. एखाद्या व्यक्ती आपला गैरफायदा तर घेत नाही ना याचा नीट विचार करा. कुणामुळे तुम्ही बदलू नका.आरोग्य - आरोग्याच्या बाबतीत मानसिक स्थितीचा शरीरावर परिणाम होण्याची आहे. राग द्वेष करू नका. पाणी भरपूर प्या. बाहेरचे पेय पदार्थ टाळा.प्रवास - प्रवासात अनुकूलता मिळेल. विशेष करुन नदी किंवा समुद्रकिनारी जाणारा प्रवास सुखद अनुभव देईल!
या मार्गदर्शनाबद्दल आम्हाला तुमचा अभिप्राय नक्की ईमेल द्वारे सांगा आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर तेही ईमेल द्वारे विचारू शकता.ईमेल संपर्क: sumedhranade531@gmail.com
श्रीस्वामी समर्थ.
Web Summary : Weekly tarot guidance (March 29-April 4) by Sumedh Ranade offers insights into personal life, career, finance, relationships, education, business, court matters, health, and travel based on chosen number.
Web Summary : सुमेध रानडे द्वारा साप्ताहिक टैरो मार्गदर्शन (29 मार्च-4 अप्रैल) व्यक्तिगत जीवन, करियर, वित्त, रिश्तों, शिक्षा, व्यवसाय, अदालती मामलों, स्वास्थ्य और यात्रा में अंतर्दृष्टि प्रदान करता है, जो चुने हुए नंबर पर आधारित है।