Tarot Card: स्वामींचं नाव घेत एक कार्ड निवडा आणि पुढच्या आठवड्याचे साप्ताहिक भविष्य जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 17:46 IST2026-01-03T17:45:37+5:302026-01-03T17:46:04+5:30
Tarot Card: टॅरो मार्गदर्शन वाचण्यासाठी मनामध्ये एखादा विषय किंवा प्रश्न ठेवून तीनपैकी कोणताही एक नंबर निवडा आणि नंबरप्रमाणे मार्गदर्शन वाचा.

Tarot Card: स्वामींचं नाव घेत एक कार्ड निवडा आणि पुढच्या आठवड्याचे साप्ताहिक भविष्य जाणून घ्या
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन
४ ते १० जानेवारी
===============
सुमेध रानडे,
टॅरो कार्ड रीडर, पुणे
===============
नंबर १:
वैयक्तिक आयुष्य - घरात एखादी नवीन सुरुवात होण्याची शक्यता आहे. घरातील सदस्यांच्या बाबतीत सुखद घटना घडेल!
नोकरी/व्यवसाय - नोकरी व्यवसायात एखाद्या व्यक्तीमुळे किंवा घटनेमुळे तुम्ही मागे पडू शकता. अशावेळी तुमच्या मनाचा कौल घ्या, आतला आवाज ऐका आणि पुढे चाला.
फायनान्स - आर्थिक बाबतीत पूर्वी नजरचुकीने सुटलेली गोष्ट लक्षात येण्याची शक्यता आहे. अती खर्च टाळा!
रिलेशनशिप - एखाद्या मुद्द्यावरून शीत युद्धासारखी परिस्थिती येऊ शकते. अबोला धरला जाऊ शकतो. शांततेने आणि संयमाने प्रश्न सोडवा, मनातलं बोलून दाखवा!
शिक्षण/परीक्षा - आत्मचिंतन आणि पाठांतर करण्यासाठी उत्तम काळ! नुसते वरवरचे वाचण्यापेक्षा सखोल अभ्यास गरजेचा राहील!
खरेदी/विक्री - खरेदी विक्री संदर्भात महत्त्वाचे विचारमंथन आणि चिंतन होईल. एकापेक्षा अधिक पर्याय समोर येतील पण प्रत्यक्षात उतरायला वेळ लागेल.
कोर्ट कचेरी - संभ्रम आणि गूढता निर्माण होईल अशा घडामोडी घडतील. त्यामुळे द्विधा मनस्थिती राहील. ठोस निर्णय लागणार नाही!
नंबर २:
वैयक्तिक आयुष्य - घरात एखादा महत्वाचा निर्णय घ्यावा लागेल. भावनेचा अभाव राहील. वैयक्तिक जीवनात नातेसंबंधात एक प्रकारचा कोरडेपणा जाणवेल.
नोकरी/व्यवसाय - नोकरी व्यवसायात योग्य ते फळ मिळेल. जितके कष्ट तितके फळ. त्यामुळे प्रामाणिक प्रयत्न करा!
फायनान्स - आर्थिक बाबतीत कोणताही शॉर्ट कट किंवा इझी मनी पासून लांब राहा. कायदेशीर आणि विश्वासार्ह ठिकाणी गुंतवणूक करा. पैसे देताना घेताना रीतसर नोंद करा!
रिलेशनशिप - एकाच्या प्रश्नाला दुसऱ्याचा प्रतिप्रश्न आणि या सगळ्यातून तुटक वागणूक अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे जपून बोला!
शिक्षण/परीक्षा - जेवढा अभ्यास तितके मार्क असा न्याय राहील त्यामुळे अभ्यासात दुर्लक्ष नको! परीक्षेत कशाप्रकारचे प्रश्न असतात याचा अभ्यास करणे गरजेचे!
खरेदी/विक्री - खरेदी विक्री संदर्भात योग्य ती किंमत लावल्यास किंवा दिल्यास मनाप्रमाणे घडेल. म्हणून वस्तूची योग्य किंमत नक्की काय याचा अभ्यास करा!
कोर्ट कचेरी - कोर्ट व्यवहारात महत्वाचा टप्पा गाठला जाण्याची शक्यता आहे! त्यामुळे या बाबतीत पूर्ण प्रयत्न करा.

नंबर ३:
वैयक्तिक आयुष्य - घरात एखादी आनंदी घटना घडेल, सण समारंभ, धार्मिक कार्यक्रम यातून आनंद मिळेल. घरात लग्न ठरण्याचा किंवा त्याबाबतीत महत्वाच्या घटना घडण्याचा संभव!
नोकरी/व्यवसाय - नोकरी व्यवसायात वरिष्ठांकडून चांगली मदत मिळेल. केलेले काम दिसून येईल. त्यामुळे चुकीला जागा ठेवू नका. नियमानुसार वागा!
फायनान्स - आर्थिक बाबतीत योग्य व्यक्तीचा सल्ला तुम्हाला लाभदायक ठरेल. मागे केलेल्या गुंतवणुकीचे फळ मिळेल. कोणाकडून पैसे येणे असतील तर ते मिळतील!
रिलेशनशिप - या बाबतीत पुढचे पाऊल टाकले जाण्याची शक्यता आहे. साखरपुडा, विवाह या बाबतीत अनुकूलता मिळेल!
शिक्षण/परीक्षा - स्वतःचे तर्क बाजूला ठेवून शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे अभ्यास केलात तर उत्तम यश मिळेल! कष्टाचे उत्तम फळ मिळेल!
खरेदी/विक्री - खरेदी विक्री संदर्भात चांगल्या घटना घडतील. मनाप्रमाणे व्यवहार होईल. फक्त कोणताही कुमार्ग नको, फसवणूक नको नाहीतर प्रकरण अंगाशी येईल!
कोर्ट कचेरी - कोर्ट व्यवहारात मोठ्या व्यक्तींच्या मार्गदर्शनामुळे किंवा हस्तक्षेपामुळे तुमचा फायदा होईल त्यामुळे मोठ्यांचे मार्गदर्शन नक्की घ्या!
या मार्गदर्शना बद्दल आम्हाला तुमचा अभिप्राय नक्की ईमेल द्वारे सांगा. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर ईमेल द्वारे विचारू शकता -
संपर्क : sumedhranade531@gmail.com
श्रीस्वामी समर्थ