Tarot Card: निराशेने खचून न जाता आत्मविश्वासाने पुढे नेणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 15:30 IST2025-09-05T15:29:48+5:302025-09-05T15:30:30+5:30

Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्डपैकी एक कार्ड निवडून तसेच राशीनुसार दिलेले उपाय जाणून घेत होणाऱ्या बदलांना सामोरे जा. 

Tarot Card: A week that moves forward with confidence without being discouraged by disappointment; Read the weekly tarot prediction! | Tarot Card: निराशेने खचून न जाता आत्मविश्वासाने पुढे नेणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

Tarot Card: निराशेने खचून न जाता आत्मविश्वासाने पुढे नेणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन
७ ते १४ सप्टेंबर
===============
सुमेध रानडे,
टॅरो कार्ड रीडर, पुणे
===============

नंबर १: (राशी: वृषभ/सिंह/वृश्चिक/कुंभ)

काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी चांगला फलदायी ठरणार आहे. अपेक्षित यश मिळण्याच्या मार्गावर आहे. जे काही करत आहात त्यातून चांगले निष्पन्न निघणार आहे. थोडा विलंब होऊ शकतो पण परिणाम चांगला मिळेल. या काळात स्त्रियांचे वर्चस्व राहील. भाग्याची साथ राहील. एखादी चांगली बातमी मिळेल.

तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही तुमचा खर्च सांभाळण्याची गरज आहे. उधळपट्टी बंद करुन पैशाचे नीट नियोजन करण्याची गरज आहे. विनाकारण कोणाबद्दलही वाईट विचार करु नका. त्याचबरोबर स्वार्थी विचार न करता इतरांना देखील लागेल तशी मदत करण्याची गरज आहे. "आज जे पेराल तेच उद्या उगवेल" हे लक्षात ठेवा. त्यामुळे चांगल्या गोष्टीत गुंतवणूक करा.

नंबर २: (राशी: मिथुन/कन्या/धनू/मीन)

काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. पुष्कळ घडामोडी पटापट घडण्याचा हा काळ असणार आहे. काही लोकांबद्दल तुमचे मत बदलेल. तुमच्या विचारसरणीला धक्का लागू शकतो. विभक्त होणे किंवा फूट पडणे किंवा मतभेद होऊन वाद होणे अशी परिस्थीती निर्माण होऊ शकते पण तुमचे संयम आणि धैर्य तुम्हाला यातून तारून नेईल!

तुम्ही काय करावे?
या आठवड्यात कशीही परिस्थीती आली तरी खचून न जाता, तिला धीराने सामोरे जायचे आहे. लहानसहान भांडणे विकोपाला नेऊ नका, संयम आणि शांतता ठेवा. काही निरुपयोगी गोष्टी सोडून द्या. बदल हाच विश्वाचा नियम आहे आणि यातून काहीतरी चांगलेच होईल हा विश्वास ठेवा आणि त्या बदलत्या गोष्टींत सहभागी व्हा.

नंबर ३: (राशी: मेष/कर्क/तूळ/मकर)

काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी काही अडचणींचा आणि अडथळ्यांचा असणार आहे. कदाचित संभाषण व्यवस्थित होणार नाहीत, व्यवहार चोख होणार नाहीत. ताणतणाव जास्त जाणवू शकतो. पण या सगळ्यात, थोड्या प्रमाणात तुम्ही पुढे वाढणार आहात. परिस्थिती तुमच्या हातात नसेल पण मनःस्थिती नक्कीच तुमची तुम्हीच सुधारू शकता!

तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्हाला तुमच्या सकारात्मकतेचा कस लावावा लागणार आहे. तुम्ही स्वतःच स्वतःला बांधून घेतले आहे का याकडे लक्ष द्या. न्यूनगंड बाळगू नका. हातपाय गाळून बसू नका. तुमच्याकडे कौशल्य आहे, शक्ती आहे, त्यांचा नीट वापर करा. "मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण!" हे तुकोबांचे वचन लक्षात ठेवा!

संपर्क : ९५६१०९३७४०

श्रीस्वामी समर्थ.

Web Title: Tarot Card: A week that moves forward with confidence without being discouraged by disappointment; Read the weekly tarot prediction!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.