Tarot Card: स्वप्नपूर्तीकडे नेणारा आठवडा; जाणून घ्या तुमचे साप्ताहिक टॅरो भविष्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 11:42 IST2025-08-16T11:41:22+5:302025-08-16T11:42:08+5:30
Tarot card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्डपैकी एक कार्ड निवडून तुम्ही तुमचे साप्ताहिक भविष्य जाणून घेऊ शकता.

Tarot Card: स्वप्नपूर्तीकडे नेणारा आठवडा; जाणून घ्या तुमचे साप्ताहिक टॅरो भविष्य!
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन
१७ ते २३ ऑगस्ट
===============
सुमेध रानडे,
टॅरो कार्ड रीडर, पुणे
===============
नंबर १: राशी : वृषभ/सिंह/वृश्चिक/कुंभ
काय घडू शकते?
हा तुमच्यासाठी नवीन काहीतरी घेऊन येणार आहे. नवीन भौतिक आनंद, सुख सोयी अनुभवता येतील. अडकलेले काम सुटेल. कौटुंबिक सुख समृद्धी राहील. एकूण परिस्थिती सुधारेल. तब्येत चांगली होईल. घर, गाडी, नोकरी, व्यवसाय, जमिनीचे काम यासंदर्भात प्रगती होईल. हा काळ तुम्हाला उत्कृष्ट समाधान देऊन जाणार आहे!
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही सावकाश आणि चिकाटीने काम करण्याची गरज आहे. भौतिक, आर्थिक, व्यावहारिक गोष्टींकडे जास्त लक्ष द्या. त्यामध्ये नवीन सुरुवात करू शकता. कामाच्या ठिकाणी एखादी नवीन योजना मांडा. नवीन सुरुवात करायची असेल तर करा. या काळात जुने ते झटकून नव्या उमेदीने मार्गक्रमण करा!
नंबर २: राशी : मिथुन/कन्या/धनू/मीन
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी, तुम्ही आहात त्या मार्गावर पुढे नेणारा असणार आहे. बुध्दी पेक्षा भावनांचा पगडा राहील. मध्यम गतीने कामे पुढे सरकतील. लोकांचे यांचे सहकार्य लाभेल. उत्तम नातेसंबंध जोडले जातील. तुम्हाला आतून प्रसन्न वाटेल, दुसऱ्यांना तुम्ही आनंद देऊ शकाल. एखादा छंद किंवा कला यातून तुम्हाला समाधान मिळेल. प्रवास आनंद देईल.
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही लोकांपर्यंत कसे पोचता येईल याचा विचार करायचा आहे. इतरांना तुमच्या बरोबर घेऊन चाला. तुम्हाला कृतीशील होण्याची गरज आहे. तुमच्यातील चांगुलपणाने लोकांचे मन जिंका. पण कोणाच्या कुठल्याही आमिषाला भुलू नका. "मन जीता ते जग जीता" याप्रमाणे स्वतःचे आणि इतरांचे मन जिंकलात तर तुमचा खरा विजय होईल!
नंबर ३: राशी : मेष/कर्क/तूळ/मकर
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी एकाच वेळी अनेक पर्याय घेऊन येणार आहे. निरनिराळ्या गोष्टींमुळे निर्णय घ्यायला अवघड जाईल. मल्टी टास्किंग करावं लागेल. पण यांपैकी कोणतीही गोष्ट हवी तशी पुढे सरकणार नाही. एकूण थोडी तारांबळ उडण्याची शक्यता आहे. हवे ते साध्य होण्यासाठी अजून वेळ लागेल त्यामुळे संयम आणि सबुरीने काम करा.
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही बऱ्याच गोष्टींमधून एक दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. खूप काही करायला जाऊ नका, फसवणूक संभवते. वरवर आकर्षक वाटणाऱ्या कुठल्याही गोष्टीला भुलू नका. लोभ मोह यांच्या पासून जाणीवपूर्वक लांब राहा. स्वप्नरंजन करत बसू नका, हवेत बोलत राहू नका, प्रत्यक्षात कृती करा.
संपर्क : ९५६१०९३७४०
श्रीस्वामी समर्थ.