Tarot Card: आनंददायी घटनांचा काळ, स्वामींचे नाव घेत निवडा एक कार्ड आणि जाणून घ्या साप्ताहिक मार्गदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 10:10 IST2026-01-10T10:08:26+5:302026-01-10T10:10:51+5:30
Tarot Card: टॅरो मार्गदर्शन वाचण्यासाठी मनामध्ये एखादा विषय किंवा प्रश्न ठेवून तीनपैकी कोणताही एक नंबर निवडा आणि नंबरप्रमाणे मार्गदर्शन वाचा.

Tarot Card: आनंददायी घटनांचा काळ, स्वामींचे नाव घेत निवडा एक कार्ड आणि जाणून घ्या साप्ताहिक मार्गदर्शन
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन
११ ते १७ जानेवारी
===============
सुमेध रानडे,
टॅरो कार्ड रीडर, पुणे
===============
नंबर १:
वैयक्तिक आयुष्य - घरात एखादी चांगली घटना घडेल. जखमांवर फुंकर घातली जाईल. एकोप्याने वागा!
नोकरी/व्यवसाय - नोकरी व्यवसायात एखाद्या चांगली गती आणि दिशा मिळेल. कष्ट भरपूर केले तर फळ नक्कीच उत्तम मिळेल!
फायनान्स - आर्थिक बाबतीत चांगला मोबदला मिळण्याचा काळ आहे! विश्वासार्ह आणि नैतिक मूल्ये जपलेल्या ठिकाणी गुंतवणूक करा!
रिलेशनशिप - प्रेमाच्या बाबतीत मनासारख्या घटना घडतील. एक टप्पा गाठला जाईल. एकमेकांना समजून घ्या!
शिक्षण/परीक्षा - कष्टाचे उत्तम फळ मिळेल आणि त्याचबरोबर नशिबाची साथ राहील. त्यामुळे परीक्षा चांगली जाण्याची शक्यता आहे!
खरेदी/विक्री - खरेदी विक्री संदर्भात तुमच्या अपेक्षा पूर्ण होण्याचा संभव आहे. अडकून राहिलेली कामे मार्गी लागतील.
कोर्ट कचेरी - रखडलेल्या कामांना गती मिळेल नवीन दिशा किंवा नवी चालना मिळेल. नव्या दृष्टिकोनातून प्रश्न सुटतील!

नंबर २:
वैयक्तिक आयुष्य - घरात जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. लहानांबरोबर वेळ घालवायला मिळेल. कुटुंबात आनंदी आनंद राहील!
नोकरी/व्यवसाय - नोकरी व्यवसायात इतरांच्या सहकार्याने तुम्ही काम करु शकणार आहात त्यामुळे सगळ्यांना मदत करा!
फायनान्स - आर्थिक बाबतीत घेण्यापेक्षा तुम्ही दुसऱ्यांना काय देऊ शकता याचा विचार करा! दानधर्म किंवा अडचणीत सापडलेल्या व्यक्तीला मदत नक्की करा!
रिलेशनशिप - प्रेमाच्या बाबतीत साधेपणा ठेवून वागलात तर उत्तम होईल. मागे एकमेकांना दिलेली साथ आठवा आणि किरकोळ भांडणे विसरा!
शिक्षण/परीक्षा - अभ्यास करताना पूर्वी परीक्षेत आलेल्या प्रश्नांची चांगली उजळणी करा. साध्या सोप्या प्रश्नांचा अभ्यास करा!
खरेदी/विक्री - खरेदी विक्री संदर्भात चांगले व्यवहार घडतील. समोर चांगली व्यक्ती असेल तर तिच्यासाठी तुमचा अट्टाहास सोडा. सवलत द्या!
कोर्ट कचेरी - कोर्ट व्यवहारात सच्चा आणि प्रामाणिक लोकांचा सल्ला घ्या. जुन्या ओळखीच्या लोकांकडून मदत मिळण्याचा संभव!
नंबर ३:
वैयक्तिक आयुष्य - घरात तुमच्याकडून एखादी वैयक्तिक कामगिरी पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्याबद्दल कुटुंबात तुम्ही उठून दिसाल, सगळ्यांचे प्रेम मिळवाल!
नोकरी/व्यवसाय - नोकरी व्यवसायात तुम्ही एखाद्या महत्वाच्या टप्प्यावर पोहचाल. वरिष्ठांकडून कौतुक होण्याची शक्यता आहे, फक्त गर्व किंवा बडेजावपणा करु नका!
फायनान्स - आर्थिक बाबतीत एखादा फायदा संभवतो. दिलेले पैसे परत मिळू शकतात.
रिलेशनशिप - प्रेमाच्या बाबतीत पुढचे पाऊल पडेल. तुमच्या कष्टाचं चीज होईल. जोडीदाराकडून तुम्हाला चांगली आदराची वागणूक मिळेल.
शिक्षण/परीक्षा - तुमच्या आत्मविश्वासात भर पडेल. मागे केलेल्या अभ्यासाचे चांगले फळ मिळेल. फक्त कोणताही चुकीचा मार्ग निवडू नका नाहीतर पकडले जाल!
खरेदी/विक्री - खरेदी विक्री संदर्भात तुम्ही आघाडीवर याल. तुमच्या मताला किंमत येईल. फक्त अती महत्त्वाकांक्षा नको!
कोर्ट कचेरी - कोर्ट व्यवहारात तुमच्या म्हणण्याला किंवा तुमच्या बाजूला न्याय मिळेल. पण काही लोकांच्या डोळ्यात तुम्ही खुपणार त्यामुळे यश मिळाले तर दिखावेबाजी करू नका!
या मार्गदर्शनाबद्दल आम्हाला तुमचा अभिप्राय नक्की ईमेल द्वारे सांगा. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर ईमेल द्वारे विचारू शकता.
संपर्क - sumedhranade531@gmail.com
श्रीस्वामी समर्थ.