सोम प्रदोष २०२६: प्रदोष काळात शिव मंदिरात जाणे शुभ; पण नंदीसमोर तीनदा टाळ्या वाजवण्याचे काय कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 07:25 IST2026-03-16T07:21:00+5:302026-03-16T07:25:01+5:30

Som Pradosh 2026: सोमवार १६ मार्च रोजी सोम प्रदोष आहे, प्रदोष काळात शिव मंदिरात जाणे शुभ मानले जाते, त्याबरोबरच जी प्रथा पाळली जाते त्याबद्दल जाणून घेऊ, 

Som Pradosh 2026: It is auspicious to visit a Shiva temple during Pradosh; but what is the reason for clapping three times in front of Nandi? | सोम प्रदोष २०२६: प्रदोष काळात शिव मंदिरात जाणे शुभ; पण नंदीसमोर तीनदा टाळ्या वाजवण्याचे काय कारण?

सोम प्रदोष २०२६: प्रदोष काळात शिव मंदिरात जाणे शुभ; पण नंदीसमोर तीनदा टाळ्या वाजवण्याचे काय कारण?

सोमवार, १६ मार्च २०२६ रोजी 'सोम प्रदोष(Som Pradosh 2026) आहे. सोमवार आणि प्रदोष असा दुग्धशर्करा योग आल्यामुळे या दिवसाला शिवभक्तीमध्ये विशेष महत्त्व आहे. त्यामुळे सोमवारी न विसरता शिवमंदिरात जा, कारण प्रदोष काळ अर्थात सूर्यास्ताच्या वेळी शिवाचे दर्शन घेणे शुभ मानले जाते. त्याबरोबरच पाळली जाते एक प्रथा, त्याबद्दल जाणून घेऊ. 

Astrology: 'अच्छे दिन' येण्यापूर्वी मिळतात 'हे' शुभ संकेत; ओळखा तुमच्या आयुष्यातील ६ दैवी बदल!

शिव मंदिरात गेल्यावर अनेकजण शिवलिंगासमोर किंवा नंदीसमोर तीन वेळा टाळ्या वाजवतात, पण त्यामागे नेमके काय शास्त्र आणि पौराणिक कथा आहेत, हे जाणून घेणे रंजक ठरेल.

भगवान शिव हे अत्यंत भोळे दैवत मानले जातात. श्रद्धेने वाहिलेले एक बेलपत्रही त्यांना प्रसन्न करण्यासाठी पुरेसे असते. शिव मंदिरात गेल्यावर आपण कळत-नकळत तीन वेळा टाळ्या वाजवतो. या प्रथेमागे तीन मुख्य कारणे सांगितली जातात:

१. तीन टाळ्यांचे आध्यात्मिक महत्त्व

पहिली टाळी: ही टाळी महादेवाला आपली उपस्थिती सांगण्यासाठी वाजवली जाते. "हे ईश्वरा, मी तुझ्या दारी आलो आहे," हा भाव त्यामागे असतो.

दुसरी टाळी: आपण देवाकडे काही मागायला विसरलो तरी महादेवाने आपले घर धन-धान्याने भरलेले ठेवावे, या प्रार्थनेसाठी दुसरी टाळी वाजवली जाते.

तिसरी टाळी: ही टाळी महादेवाची शरणागती प्राप्त करण्यासाठी असते. आपले सर्वस्व ईश्वराच्या चरणी अर्पण केल्याचा हा संकेत आहे.

२. पौराणिक उदाहरणे आणि प्रचिती

शिव मंदिरात टाळी वाजवण्याच्या या प्रथेला काही पौराणिक कथांचाही आधार आहे:

रावण आणि लंका: असे मानले जाते की, लंकापती रावणाने महादेवासमोर तीन वेळा टाळ्या वाजवून त्यांची स्तुती केली होती, ज्यामुळे त्याला सोन्याची लंका आणि अफाट राज्य प्राप्त झाले.

प्रभू श्रीराम आणि रामसेतू: जेव्हा प्रभू श्रीराम लंकेला जाण्यासाठी सेतू बांधत होते आणि काम पूर्ण होत नव्हते, तेव्हा त्यांनी शिवलिंगासमोर तीन वेळा टाळ्या वाजवून शंकराची आराधना केली. तेव्हा महादेव प्रसन्न झाले आणि समुद्रातील दगडांवर 'राम' नाव लिहिताच ते दगड पाण्यावर तरंगू लागले.

Numerology: वेलची की चांदीचे नाणे? तुमच्या जन्मतारखेनुसार तुमच्यासाठी काय आहे 'लकी'?

३. सोम प्रदोषला काय करावे?

सोमवार हा महादेवाचा दिवस आहे आणि त्यात प्रदोष तिथी असल्याने या दिवशी शिव पूजन केल्यास दुप्पट फळ मिळते.

सकाळी लवकर उठून स्नान करावे.

सायंकाळी प्रदोषाच्या वेळी (सूर्यास्ताच्या सुमारास) शिव मंदिरात जाऊन बेलपत्र अर्पण करावे.

मंदिरात शांत चित्ताने बसून वरील शिव स्वरूपाचे ध्यान करावे. 

मंदिरातून निघण्याआधी तीनदा टाळ्या वाजवून देवाला अनन्यभावे शरण जावे. 

Web Title : सोम प्रदोष २०२६: शिव मंदिर दर्शन और ताली बजाने का महत्व।

Web Summary : 16 मार्च, 2026 को सोम प्रदोष शिव भक्तों के लिए शुभ है। गोधूलि बेला में शिव मंदिर जाना और नंदी के सामने तीन बार ताली बजाना आध्यात्मिक अर्थ रखता है, जो उपस्थिति, इच्छाओं और समर्पण का प्रतीक है। इस प्रथा की जड़ें पौराणिक कथाओं में हैं, जो आशीर्वाद और दिव्य संबंध प्रदान करती हैं।

Web Title : Som Pradosh 2026: Significance of Shiva temple visit and clapping.

Web Summary : Som Pradosh on March 16, 2026, is auspicious for Shiva devotees. Visiting Shiva temples during twilight and clapping three times before Nandi holds spiritual meaning, signifying presence, wishes, and surrender. This practice has roots in mythology, offering blessings and divine connection.