१७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या सूर्यग्रहणाच्या(Solar Eclipse 2026) काळात वास्तुदोष आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी ज्योतिष अभ्यासक डॉ. योगेश शर्मा यांनी सुचवलेला हा 'लिंबूचा उपाय' अत्यंत प्रभावी मानला जात आहे. जरी हे ग्रहण भारतात दिसणार नसले, तरी खगोलीय ऊर्जेचा प्रभाव आपल्या वातावरणावर नक्कीच असतो.
मंगळवार, १७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणारे सूर्यग्रहण अनेक राशींसाठी परिवर्तनाचे ठरणार आहे. जरी हे ग्रहण भारतात दृश्यमान नसले, तरी ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून दुपारी ४:१५ ते सायंकाळी ७:१५ या दरम्यान ग्रहणाचा प्रभाव दाट असणार आहे. या काळात वातावरणात असलेल्या विशिष्ट ऊर्जेचा वापर करून आपण आपल्या घरातील किंवा कामाच्या ठिकाणची 'निगेटिव्हिटी' (नकारात्मकता) काढून टाकू शकतो.
काय आहे हा विशेष उपाय?
डॉ. योगेश शर्मा यांच्या सांगण्यानुसार, जर तुमच्या व्यवसायात प्रगती होत नसेल, नोकरीत सतत अडथळे येत असतील किंवा वास्तूमध्ये अस्वस्थता जाणवत असेल, तर हा विधी नक्की करून पहा:
साहित्य: ४ पिवळी लिंबं (डाग नसलेली) आणि ४ पाण्याची भांडी (काचेचे बाऊल किंवा तांबे वापरल्यास उत्तम).
कृती:
१. वेळ: मंगळवारी दुपारी ४:१५ ते सायंकाळी ७:१५ या काळात हा विधी सुरू करावा.२. मांडणी: चारही भांड्यांमध्ये पाणी भरा आणि प्रत्येकात एक पिवळे लिंबू टाका.३. दिशा: ही चारही भांडी तुमच्या घराच्या किंवा ऑफिसच्या चार दिशांच्या चार कोपऱ्यांत ठेवा. (उत्तर-पूर्व, उत्तर-पश्चिम, दक्षिण-पूर्व, दक्षिण-पश्चिम).४. हेतू: असे मानले जाते की, लिंबू आणि पाणी हे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचे काम करतात. ग्रहणाच्या काळात ही शोषणशक्ती अधिक तीव्र असते.
सोमवती अमावास्या २०२६: सोमवती अमावास्येला ग्रहणाचे सावट! या काळात काय करावे आणि काय टाळावे?
ग्रहणानंतर काय करावे?
>> ग्रहण काळ संपल्यावर किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी ही लिंबं पाण्यातून काढून घ्यावीत.
>> ही लिंबं सन्मानाने आणि श्रद्धेने एखाद्या पिंपळाच्या झाडाच्या पारावर ठेवून यावीत.
>> लक्षात ठेवा, हे करताना कोणाशीही बोलू नये आणि मागे वळून पाहू नये.
या उपायाचा सकारात्मक परिणाम:
>> वास्तू: घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन शांतता लाभते.
>> व्यवसाय: व्यापारात येणारे अडथळे दूर होऊन नवीन संधी उपलब्ध होतात.
>> नोकरी: कामाच्या ठिकाणी असलेले तणावाचे वातावरण निवळते. पाहा व्हिडीओ -
Web Summary : During the 2026 solar eclipse, a lemon remedy is suggested to remove negative energy from homes and businesses. This involves placing lemons in water-filled containers in the four corners of a space. The lemons should be respectfully placed under a Peepal tree after the eclipse.
Web Summary : 2026 के सूर्य ग्रहण के दौरान, घर और व्यवसाय से नकारात्मक ऊर्जा को दूर करने के लिए एक नींबू उपाय सुझाया गया है। इसमें एक जगह के चारों कोनों में पानी से भरे कंटेनरों में नींबू रखना शामिल है। ग्रहण के बाद नींबू को सम्मानपूर्वक पीपल के पेड़ के नीचे रख देना चाहिए।